- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ व सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या सूचना पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच सर्व आवश्यक सुविधा नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीत पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा तसेच वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. पालखी मार्गावर येणाऱ्या वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अधिक मासाचे औचित्य साधून तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, रावेत तसेच ओम साई ग्रुप, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृष्णायन’ या तीन दिवसीय भागवत कथाकथनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, रावेत येथे दिनांक ११ ते १३ जून या कालावधीत संपन्न झालेल्या ‘कृष्णायन’ या कृष्ण कथेला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. पंढरपूर येथील रहिवासी प्रवचनकार विनया कुलकर्णी – उत्पात यांनी श्रीमद् भागवत कथेतील दहाव्या स्कंधातील कथेत यशोदा मातेच्या घरी बालपण, माती खाणे, उखळाला बांधले जाणे, गोपींच्या घरी माखनचोरी करणे पूतना, बकासूर, तृणावर्त अशा राक्षसांचा वध, कालियामर्दन, रासलीला, गोपीप्रेम, यांद्वारे भक्तीचा सर्वोच्च मार्ग दाखवला. तसेच…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू इंग्लिश स्कूल, माण, तालुका मुळशी आणि दिलासा संस्था, पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक १५ जून २०२६ हा शाळेचा पहिला दिवस प्रार्थना, वृक्षारोपण, कविता सादरीकरण, एस एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याने गाजला; आणि विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, मान्यवर अभ्यागत या सर्वांसाठी संस्मरणीय ठरला. न्यू इंग्लिश स्कूल, माण इथल्या शाळेतील पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला. रंगीत खडूंनी फळ्यावर कार्यक्रमाची रूपरेषा लिहिली. सोनचाफा आणि बकुळीचे झाड लावण्यासाठी खड्डे तयार केले. पाहुण्यांच्या स्वागतासाठी हळद, कुंकू, निरांजन, फुलाचे ताट सजवले; आणि शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्साहात जय्यत तयारी केली होती.…
काँग्रेस कार्यकारणी आठवड्याभरात जाहीर करू – नरेंद्र बनसोडे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अंतर्गत पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांची बैठक काल संभाजीनगर चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे होते. बैठकीची सुरुवात वंदे मातरम सामूहिक गायनाने करण्यात आली. नितीन सोनवणे, रितिका शर्मा आणि विल्यम साळवी या तीन सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश या बैठकी अंतर्गत करण्यात आला. काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्याचे कौतुक केंद्रीय नेतृत्वाकडून करत त्यांना पाठबळ दिल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला राज्यसभेच्या जागांवर निवडून आलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पवन…
“सकारात्मकतेने आयुष्य सुंदर होते निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” जेष्ठ नागरिकांनी समाजाचे दीपस्तंभ बनावे. उत्तर आयुष्यात सेवा हा धर्म मानत आंधळ्याचा डोळा, पांगळ्याचा पाय आणि अनाथांचा नाथ होता आले पाहिजे. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी स्वतः सकारात्मक राहून मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करता आला पाहिजे.” असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले आहे. प्राधिकरणाच्या सेक्टर २८ मधील संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये संत ज्ञानेश्वर हास्य योग संघाच्या एकविसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राजेंद्र घावटे यांचे “जगणे सुंदर आहे” या विषयावर व्याख्यान झाले. या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर , प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, ह.भ.प. किसन महाराज चौधरी , माजी…
देहूगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी “आषाढी वारी आरोग्य अभियान २०२६” अंतर्गत देहूगाव येथे अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवसानिमित्त सीपीआर (CPR) व प्राथमिक उपचार (First Aid) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम देहूगाव श्री संत तुकाराम महाराज संस्थान, संत तुकाराम अन्नदान मंडळ, आनंदक्षेत्र, MESMA Doctors Association, फोर्टिस हॉस्पिटल मुंबई तसेच सेंट जॉन इंटरनॅशनल अँब्युलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. यावेळी MESMA Doctors Association चे राज्याध्यक्ष डॉ. श्यामसुंदर सोनवणे, “CPR Man of India” व MESMA चे राज्य उपाध्यक्ष डॉ. मंजीत सिंग अरोरा, MESMA Doctors Association चे राज्य उपाध्यक्ष डॉ.…
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञानमंदिरात शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक – आमदार शंकर जगताप परीक्षेत गुण मिळविण्यासोबत व्यक्तिमत्त्व विकास घडविणे हा देखील शिक्षणाचा उद्देश – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर उत्साही आणि आनंदी वातावरणात शाळा प्रेवेशोत्सव उपक्रम साजरा पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, जिज्ञासू वृत्ती जोपासावी आणि अभ्यासासोबतच खेळ, कला व संस्कार यांनाही तितकेच महत्त्व द्यावे. पालक, शिक्षक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडणार…
पिंपळे गुरव येथील मनपा शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजचे युग स्पर्धा, नवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) आहे. या बदलत्या काळात महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात आणि ते कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नयेत, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये दर्जेदार व आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रत्येक शाळेत आवश्यक पायाभूत सुविधा, डिजिटल साधने आणि विद्यार्थी-अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर आमचा मुख्य भर राहील, असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी भाविकांसाठी विविध प्रकारच्या मूलभूत व आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये तसेच सर्व सुविधा सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडून व्यापक तयारी करण्यात येत असते. या पार्श्वभूमीवर आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन, मुक्काम व्यवस्था तसेच विविध विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मंगळवार, दि. १६ जून २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता महापालिका मुख्य प्रशासकीय भवन, पिंपरी येथील तिसऱ्या मजल्यावरील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सत्ताधारी भाजपची नावे निश्चित होत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा रखडलेला प्रस्ताव अखेर दफ्तरी दाखल करण्यात आला. अर्धवट विषय असल्याचे सांगून दुरुस्तीसह सुधारित विषय आणण्याचे आदेश महापौर रवी लांडगे यांनी सोमवारी प्रशासनाला दिले. सर्व प्रक्रिया करुन प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यानंतर दफ्तरी दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचे ८४, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ३७, शिवसेनेचे (शिंदे) सहा आणि एक अपक्ष असे १२८ नगरसेवक निवडून आले आहेत. दहा स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक होणार आहेत. प्रशासनाने मार्च महिन्यात…
