- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोशी गावचा इतिहास सांगतो मोशीकर ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांचा विजय निश्चित असतो. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या पाठीशी मोशीकर एकवटले आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री इथेच नक्की झाली असा विश्वास शिवसेनेच्या (उबाठा) पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी व्यक्त केला. आता ” मोशीकरांनी ठरवायचे श्री. नागेश्वर महाराजांना दंडवत घालून प्रांजळ आशीर्वाद मागणाऱ्या अजित गव्हाणे यांना निवडून आणायचे की, नागेश्वर महाराजांसमोर शड्डू ठोकणाऱ्या मग्रूर प्रवृत्तीला पुढे न्यायचे.”अशी आक्रमक भूमिका देखील सुलभा उबाळे यांनी मांडली. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कोणाच्याही दबावाला बळी पडू नका, कोणाला ही घाबरु नका. पिंपरी चिंचवड शहरात कोणावरही अन्याय होत असेल तर माझ्याशी संपर्क साधा. मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य आहे. शहरात गुंडाराज चालणार नाही, व्यापाऱ्यांना कोणी त्रास देणार नाही. आपण सर्वजण कष्टाने आपला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहोत. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे काम नाही, हा शंकर जगताप आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे असे आश्वासन, चिंचवड विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी केले. भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज थेरगाव येथील सिरवी क्षत्रिय समाज आई माताजी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘‘आमच्या च-होलीला महापौरपद देऊन शहराचे नेतृत्व करण्याची संधी देणाऱ्या आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे’’, अशी ग्वाही च-होलीकरांनी दिली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या समाविष्ट गावातील च-होलीतील आपुलकीच्या गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी ठिकठिकाणी आमदार लांडगे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. ‘भोसरी माझी आई, तर च-होली माझी मावशी’ असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले आहे. भोसरीप्रमाणेच आपले च-होलीकरवर प्रेम आहे. त्यामुळेच च-होलीच्या विकासासाठी मी कधी कमी पडणार नसल्याची ग्वाही आमदार लांडगे यांनी दिली. च-होलीतील आपुलकीच्या गाठीभेटींना ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला.…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज थेरगाव येथील रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला. चैतन्यदायी गीत, ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी थांबलेले नागरिक, औक्षणासाठी थांबलेल्या महिला – भगिनी, त्यांच्यावर होणारी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी, आणि एकच नारा “शंकर जगताप तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” या उल्हासित वातावरणात सळसळत्या तरुणाईची निघालेली उर्जावान पदयात्रेच्या माध्यमातून थेरगावकरांनी शंकर जगताप यांच्या विजयासाठी ‘वज्रमूठ’ बांधली आहे. या पदयात्रेत महिला तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्येष्ठ महिलांनी औक्षण करीत, शंकर जगताप यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांना मनापासून विजयासाठी आशीर्वाद दिला. या…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप, महाविकास आघाडीचे राहुल कलाटे आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. या प्रमुख उमेदवारांसह तब्बल २१ उमेदवार चिंचवड विधानसभेच्या रिंगणात आहेत. दरम्यान ७ जणांनी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे. चिंचवड विधानसभा निवडणुकीतील उमेदवार ०१) जगताप शंकर पांडुरंग- भारतीय जनता पार्टी ०२) कलाटे राहुल तानाजी – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार ०३) भाऊसाहेब सोपानराव भोईर- अपक्ष ०४) राजेंद्र कुंडलिक गायकवाड- बहुजन समाज पार्टी ०५) भापकर मारुती साहेबराव- महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ०६) रफीक रशीद कुरेशी- स्वराज्य शक्ती सेना ०७)…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदार संघामधे एकुण १८ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरलेली होती. वैधरित्या नामनिर्देशीत एकुण १८ उमेदवारापैकी ७ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी माघार घेतली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यात प्रमुख लढत होणार असून एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक लढविणारे उमेदवार ०१.महेश किसन लांडगे, भारतीय जनता पार्टी ०२.अजित दामोदर गव्हाणे – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार ०३.बलराज उध्दवराव कटके, बहुजन समाज पार्टी ०४.अमजद महेबूब खान, ऑल इंडिया मजलिस- ए- इन्कलाब – ए – मिल्लत ०५.जावेद रशीद शहा, स्वराज्य शक्ती सेना ०६.अरुण मारुती पवार – अपक्ष ०७.खुदबुद्दीन होबळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा धर यांच्यात थेट लढत होणार असून एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस होता. दरम्यान तब्बल २१ उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ०१) अण्णा दादू बनसोडे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), ०२) सुलक्षणा राजू धर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), ०३) सुंदर म्हसुकांत कांबळे (बहुजन समाज पार्टी), ०४) बाळासाहेब नामदेव ओव्हाळ (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी), ०५) मनोज भास्कर गरबडे (वंचित बहुजन आघाडी), ०६) राजेंद्र मानसिंह छाजछिडक (राष्ट्रीय वाल्मीकी सेना पक्ष), ०७) राहुल मल्हारी…
महापालिका,गृहनिर्माण संस्थांच्या सहाय्याने करणार जनजागृती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघातील गृहनिर्माण सोसायट्या मधील मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान घडवून आणण्याचा निर्धार महानगरपालिका, सोसायटी फेडरेशन आणि गृहनिर्माण संस्थाच्या समन्वय बैठकीत करण्यात आला असून मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत शहरतील सर्व गृहनिर्माण संस्थांना मतदार जनजागृतीसाठी आवश्यक असलेले साहित्य देखील महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येत, असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अण्णा…
आरपीआय आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह अनेकांनी घेतली आ. अण्णा बनसोडे यांच्यासाठी माघार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महायुतीचा धर्म पाळण्यासाठी सर्व मित्र पक्ष सज्ज आहेत. पिंपरी विधानसभेतून अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या अनेकांनी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली. सोमवारी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे, भाजपचे नेते व समन्वयक सदाशिव खाडे, आरपीआय आठवले गटाचे नेते परशुराम वाडेकर, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाला वाव्हळकर, बाळासाहेब भागवत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी विरोधी पक्षनेते…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका बिजलीनगर परिसरातील सफाई कामगार महिलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने मराठी अभिनेत्री रूपाली पाथरे यांच्या हस्ते ३५ महिलांना एक नवीन साडी आणि दिवाळी फराळाचे पाकीट भाऊबीज निमित्त भेट म्हणून देण्यात आली यावेळी महिलांनी संस्कार प्रतिष्ठानच्या सभासदांना ओवाळले. संस्कार प्रतिष्ठानचे हे सलग सफाई कामगार महिलांसोबत भावी साजरी करण्याचे सातवं वर्ष आहे. सफाई कामगार महिलांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. या कार्यक्रमाचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड सहाय्यक आरोग्य निरीक्षक सागर सणस, संजीत पद्मन, मीनाक्षी मेरूकर, कल्पना…
