महायुतीचे उमेदवार महेश लांडगे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यात भोसरीत होणार लढत
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदार संघामधे एकुण १८ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरलेली होती. वैधरित्या नामनिर्देशीत एकुण १८ उमेदवारापैकी ७ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी माघार घेतली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यात प्रमुख लढत होणार असून एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणूक लढविणारे उमेदवार
०१.महेश किसन लांडगे, भारतीय जनता पार्टी
०२.अजित दामोदर गव्हाणे – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार
०३.बलराज उध्दवराव कटके, बहुजन समाज पार्टी
०४.अमजद महेबूब खान, ऑल इंडिया मजलिस- ए- इन्कलाब – ए – मिल्लत
०५.जावेद रशीद शहा, स्वराज्य शक्ती सेना
०६.अरुण मारुती पवार – अपक्ष
०७.खुदबुद्दीन होबळे (तन्वीरशेठ) – अपक्ष
०८.गोविंद हरीभाऊ चुनचुने – अपक्ष
०९.डोळस हरिश बाजीराव – अपक्ष
१०.रफीक रशीद कुरेशी – अपक्ष
११.शलाका सुधाकर कोंडावार – अपक्ष
माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे
०१.परमेश्वर गोविंदराव बुर्ले
०२.रामा मोहन ठोके
०३.गायकवाड सुरज चंद्रकांत
०४.दत्तात्रय कोंडीबा जगताप
०५.बापूसाहेब ऊर्फ सुभाष मारुती वाघमारे
०६.रवि बाबासाहेब लांडगे
०७.संतोष काळुराम लांडगे