Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार , नवनाथ जगताप पाटील , शिवाजी पाडूळे , निखिल चव्हाण , पंकज कांबळे , यांनी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांचे मताधिक्ययावेळी उमेदवार राहुल कलाटे, मावळ लोकसभेचे शिवसेना समन्वयक संजोग वाघेरे, शहराध्यक्ष तुषार कामटे, युवा सेनेचे चेतन पवार, काँग्रेसचे कौस्तुभ नवले, महिला अध्यक्षा ज्योती, सागर चिंचवडे आदी उपस्थित होते. अरुण पवार यांनी प्रकाश इंगोले, शंकर तांबे, किशोर आट्टरगेकर, कॅप्टन बालाजी पांचाळ, प्रमोद आंग्रे (रेंट…

Read More

जैन समाजाला आपल्यासारख्या उच्च विद्याविभूषित प्रतिनिधीची आवश्यकता – ईशदर्शनाजी म. सा. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जैन समाजाच्या समस्या आणि प्रश्न समजून घेणारा उच्चविद्याविभूषित लोकप्रतिनिधी पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये निवडून येणे आवश्यक आहे. या परिसरात जैन समाजाचे संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असून आपल्यासारख्या उच्चविद्याविभूषित प्रतिनिधी निवडून आल्यास त्याचा जैन समाजाला खूप उपयोग होईल. अशी प्रतिक्रिया जैन साध्वी इशदर्शनजी म. सा. यांनी व्यक्त केली. पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या चिंचवड परिसरात प्रचार फेरी काढली होती त्यावेळी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व कल्याण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपळे सौदागर येथील हॉटेल गोविंद गार्डन बॅंकवेट हॉल याठिकाणी शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन मार्फत जेष्ठ नागरिक मेळाव्याचे (दि.०९) आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिंचवड विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी या मेळाव्याला सदिच्छा भेट देऊन सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले की, जेष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे बॅक बोन आहेत. ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा आणि कुटुंबाचा अविभाज्य घटक आहेत. ज्येष्ठ संस्कृती, समाज आणि कुटुंबाचे आधारस्तंभ असल्याने समाजाचे संतुलन टिकून आहे. प्रत्येकजण कधी तरी ‘ज्येष्ठ नागरिक’ होणारच आहे म्हणून आजपासूनच त्यांच्या आशा, अपेक्षा, समस्या आदीची जाणीव असणे गरजेचे आहे.…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वर्षभराचे साधारण ८ हजार चारशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. यातून दिघी गावाला किती निधी मिळाला. आज दिघीमध्ये खेळाचे मैदान, जलतरण तलाव, उद्यान, कुस्तीचा आखाडा, बैलगाडा घाट अशी एकही सुविधा न पुरवणाऱ्यांना दिघीमधील नागरिकांकडून मत मागण्याचा नैतिक अधिकारच नाही असे अजित गव्हाणे म्हणाले. आगामी काळात दिघीमध्ये या सर्व सुविधा पुरवण्याची ग्वाही यावेळी अजित गव्हाणे यांनी दिली. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 9) दिघी परिसरात प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मारुती भैरवनाथ मंदिर येथे प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गेल्या दहा वर्षांत काय केले? असे विरोधक वारंवार विचारतात त्यांना आरोप करू द्या आपण आपले काम त्यांना दाखवू असे सांगताना दिघी रस्त्यावरील गाठीभेटी दरम्यान भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी दिघी रस्त्यावरील वाहनतळाची उभारणी आगामी काळात दिघी व आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले. महायुतीचे भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दिघी रस्ता परिसरात भेटीगाठीचे आयोजन केले होते. गवळीनगर येथील नागरिकांच्या गाठीभेटी घेत हरिओम स्वीट चौकातील रस्त्यावरील व्यापाऱ्यांच्या महेश लांडगे यांनी गाठीभेटी घेतल्या. हरी ओम स्वीट चौक, संभाजीनगर मार्गे, आळंदी रस्त्याने या पदयात्रेची सांगता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीचा विचार केला असता पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विधानसभेचे चिंचवड २०५, पिंपरी २०६ आणि भोसरी २०७ असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचे सध्याचे कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री. कैलास महादेव कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहराला मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला जागा मिळाली नाही. त्याच प्रमाणे सध्या चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये इतर पक्ष कमकुवत असूनही काँग्रेस पक्षाला तीन विधानसभा पैकी एकही जागा मिळालेली नाही. वास्तविक पाहता महाविकास आघाडीतील इतर पक्षाकडेही उमेदवार नव्हते. तरीही श्री. कैलास कदम यांची पक्षातील निकृष्ट व अकार्यक्षम कार्य पद्धतीमुळे पिंपरी-चिंचवड शहराला विधानसभेत एकही जागा मिळालेली…

Read More

आमदार अण्णा बनसोडे यांना विजयी करण्याचे आवाहन पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  –  विधानसभा निवडणूक हलक्यात घेऊ नका. कोणीही गाफील राहू नका. १९९९ साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार २७० विरुद्ध २६९ असे एका खासदारामुळे पडले होते. आपल्याला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.     मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महिलांना झाला आहे. आ. अण्णा बनसोडे यांनी यासाठी चांगले काम केले. करोना काळात शहरातील नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी बनसोडे यांनी २५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तसेच इतर आरोग्यविषयक सुविधांसाठी सव्वा…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार महेशदादा लांडगे यांनी गेल्या १० वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरासाठी अनेक प्रलंबित प्रश्न व विकासकामे मार्गी लावली आहेत.  विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात काही ना काही मागण्या मांडून त्या मंजूर करून घेतल्या. शास्ती कर रद्द करण्याचा प्रश्न, उपयोगिता शुल्क वसुलीला स्थगिती, प्राधिकरण बाधितांचा साडेबारा टक्के जमिनीचा परतावा अशी अनेक उदाहरणे आहेत, असे मत बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांनी व्यक्त केले. निलेश नेवाळे म्हणाले की,  आमदार महेशदादा लांडगे हे काम करणारे आमदार आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी सरकार असताना अनधिकृत बांधकामांना शास्ती कर लागू झाला. तो आमदार लांडगे यांनी रद्द करून घेतला. उपयोगिता शुल्क स्थगित…

Read More

  चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  सांगवी येथून प्रचार शुभारंभ झाल्यापासून आतापर्यंत प्रचाराच्या पूर्वार्धात प्रत्यक्ष मतदारांना जावून भेटणे आणि त्यांच्याशी सुसंवाद साधण्यावर भर देत चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर मोठ्या उत्साहात प्रचार करीत आहेत. आज सकाळच्या सत्रात वाल्हेकरवाडी परिसरातील मतदार बंधू भगिनींच्या गाठी भेटी घेवून संवाद साधला. यावेळी भाऊसाहेब भोईर युवा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसह इतर मान्यवर देखील उपस्थित होते.   याप्रसंगी भोईर म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या युगात तांत्रिक दृष्ट्या आपण प्रगत झालो असलो तरी माणसां – माणसातील संवाद दुरावत चालला आहे. तो प्रत्यक्ष भेटीतून घडावा. त्यातून आपल्यातील स्नेह वाढत जावा याच उद्देशाने प्रचाराच्या पहिल्या…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय (आठवले) व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातील नवी सांगवी परिसरात भव्य पदयात्रा काढत नागरिकांना अभिवादन केले. या पदयात्रेत जेष्ठ नागरिक, महिला व युवकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे आता चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे. शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज नवी सांगवी परिसरातील कृष्णा नगर, सह्याद्री कॉलनी, विद्यानगर, ज्ञानेश पार्क, नंदनवन कॉलनी, गुरुदत्त कॉलनी, साईनाथ कॉलनी, विनायक नगर, सुयोग कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी या भागात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी लाडक्या बहिणींकडून जगताप यांचे औक्षण केले…

Read More