Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आज (दि. १६ ) भूमकर चौक येथील द्रौपदा लॉन्स याठिकाणी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या सभेला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) यांच्यासह मित्रपक्ष महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे.…

Read More

सामान्य कष्टकरी वर्गाच्या प्रश्नासाठी राहिल मी सदैव दक्ष पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वराज्य शक्ती सेनेचे भोसरी मतदारसंघातील अधिकृत उमेदवार जावेद शहा यांनी जाधववाडी प्रभागात आज (दि.15) प्रचार फेरी काडली, या वेळी तेथील अनेक कष्टकरी वर्गातील मतदारांशी जावेद शहा यांनी संवाद साधून सामान्य कष्टकरी वर्गाच्या सर्वच समस्यासाठी मी सदैव दक्ष राहून प्रत्येक नागरीकांच्या समस्या दुर करण्यावर लक्ष ठेवेन असे आश्वासन दिले. यावेळी जाधववाडीमधील अनेक समस्या बाबत मतदारांशी चर्चा करुन जावेद शहा यांनी या बाबत मजूर प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचा निष्काळजीपणा यामुळे जाधववाडी प्रभागातील नागरीकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगून ही सर्व परस्थिती बदलायची असेल तर संधीसाधू उमेदवार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने गुरुनानक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ , प्रमुख उपस्थिती ॲड. अरुण खरात  होते. यावेळी ॲड. जिजाबा काळभोर, ॲड. संतोष मोरे यांनी अभिवादन केले यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग शिनगारे, उपाध्यक्ष ॲड. अजय यादव, सचिव ॲड. संदीप तापकीर, महिला सचिव ॲड. संगीता कुशलकर, सचिव ॲड. पद्मावती पाटील, खजिनदार ॲड. विशाल पोळ, हिशोब तपासणीस ॲड. प्रेरणा चंदानी, सदस्य ॲड. विजय भोंडे, ॲड. अक्षय चौधरी, ॲड. सुषमा पाटील, ॲड. पौर्णिमा मोहिते, ॲड. आरती कुलकर्णी. ॲड. रूपाली पवार तसेच माजी अध्यक्ष ॲड. प्रमिला गाडे,ॲड.…

Read More

शिवसेना उपनेते संजय राऊत आणि संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या आदेशावरून निवड चिंचवड विधानसभेत पक्षाला उभारी देण्यासाठी रात्रंदिवस झटणार – हरेश नखाते हरेश नखाते यांच्या निवडीचे चिंचवड विधानसभेतील शिवसैनिकांचा जल्लोषात स्वागत चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड शहरातील निष्ठावंत शिवसैनिक आणि उपशहरप्रमुख हरेश नखाते यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिंचवड विधानसभा प्रमुख प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते संजय राऊत आणि संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या आदेशावरून ही निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने हरेश नखाते यांच्यावर ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. मावळ लोकसभा संघटक माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, सह संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, शहर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी पिंपरी येथील मेट्रो स्टेशनला भेट देऊन प्रवाशांसोबत प्रवास करून नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला.उत्साही समर्थकांच्या टीमसह, गर्दीतून मार्ग काढत, हस्तांदोलन करत आणि प्रवाशांशी बातचीत करत डॉ.सुलक्षणा यांनी मतदारसंघाविषयीची त्यांची दृष्टी आणि निवडून आल्यास काय बदल घडवून आणण्याची अपेक्षा आहे याबद्दल उत्कटतेने सांगितले. त्यांनी उत्तम पायाभूत सुविधा, सुधारित सार्वजनिक वाहतूक आणि वाढीव सुरक्षा उपाय यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. डॉ. सुलक्षणा स्टेशनमधून परिसरातून जात असताना, त्यांनी प्रवाशांना त्यांच्या उमेदवारीचा विचार करण्याचे आवाहन केले आणि निवडून आल्यास लोकांसाठी मजबूत आवाज बनण्याचे वचन दिले. बरेच प्रवासी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आशीर्वाद घेण्यासाठी पिंपरी येथील संत शिरोमणी सावता माळी मंदिराला भेट दिली, नतमस्तक होऊन निवडणुकीत यशासाठी प्रार्थना केली. मंदिराच्या पुजाऱ्याने उमेदवाराला आशीर्वाद दिले आणि विजय भव म्हणत शुभेच्छा दिल्या. डॉ. सुलक्षणा यांनी मंदिरात उपस्थित भाविकांशी संवाद साधून त्यांचा पाठिंबा आणि मते मागितली. निवडून आल्यास जनतेच्या हितासाठी काम करण्याचे आश्वासन दिले व देवस्थानचे आभार मानले. प्रचार दौऱ्यादरम्यान जय हिंद शाळेच्या रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अपेक्षा आणि गरजा जाणून घेतल्या.डॉ. सुलक्षणा म्हणाल्या अनुभव संपन्न असलेल्या या पिढीशी बोलताना बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या आणि घरातील…

Read More

विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामस्थ, सोसायटीधारकांची वज्रमूठ महेश लांडगेंच्या पुढाकाराने झालेला विकास आम्ही विसरणार नाही..! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून च-होलीतील समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना येथे मते मागायला येण्याचा नैतिक अधिकारही नाही. महेश लांडगे आमदार झाल्यापासून च-होलीतील विकासाला चालना मिळाली आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांना सर्वाधिक मताधिक्य च-होलीतून देण्याचा निर्धार च-होलीकरांनी केला आहे. महेश लांडगे हे मागील दोन्ही निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन तिसऱ्यांदा आमदार होतील, असा विश्वास च-होलीकरांनी व्यक्त केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी च-होली परिसरातील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. आमदार लांडगे यांनी दत्तनगर, काळीभिंत, वडमुखवाडी,…

Read More

अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या विषयी असलेली नाराजी दूर करून सर्वांचे मनोमिलन घडविण्यात माजी महापौर व महायुतीचे समन्वयक योगेश बहल यांना यश आले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत माजी उपमहापौर डब्बू आसवानी व इतर माजी नगरसेवक आणि उद्योजक यांच्या सोबत बैठक घेऊन नाराजी दूर केली. त्यामुळे बहल यांच्या शिष्टाईला यश आले. यामुळे अण्णा बनसोडे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. आमदार अण्णा बनसोडे संपर्कात राहत नाहीत असे सांगून पिंपरी कॅम्पातील व्यापारी तसेच माजी महापौर डब्बू आसवानी आदींनी त्यांच्या…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी,चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात पहिल्यांदाच “भव्य विंटेज कार आणि बाईक रॅली व प्रदर्शनाचे” आयोजन नेहरूनगर, पिंपरी येथील एच.ए. मैदानावर केले असून ऐतिहासिक व दुर्मिळ कार आणि बाईक प्रत्यक्ष पाहण्याची अनोखी संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या संधीचा लाभ घ्यावा असे,आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार…

Read More

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या प्रभावी नेतृत्वाने ब्रिटिशांच्या विरोधात आदिवासी समाजाचे शोषण थांबवण्यासाठी लढा दिला. क्रांतीच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या संघर्षाने देशातील स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. आजच्या दिवशी आपण त्यांचे शौर्य, त्याग आणि कार्याची प्रेरणा घेणे आवश्यक आहे, अशा शब्दांत शंकर जगताप यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन केले. आदिवासी जणनायक, स्वातंत्र्य सेनानी व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पिंपळे गुरव येथे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी अभिवादन…

Read More