Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवडकरांच्या रास्त मागणीला न्याय द्या.. सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांचे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना साकडे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या महायुतीने दैदिप्यमान असे यश प्राप्त केले. अशाच प्रकारचं अनोख यश चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे नवनिर्वाचित आमदार शंकरशेठ जगताप यांनी खेचून आणले आहे. विक्रमी मतांनी विजय संपादित करीत शंकर जगताप हे आता पिंपरी चिंचवड शहरातील एक दमदार आमदार म्हणून समोर आले आहेत. जगताप यांचा परफॉर्मन्स आणि मतदार संघातील त्यांची लोकप्रिय प्रतिमा भाजपला फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे चिंचवडकरांचा हा आवाज राज्याच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात नागरिकांना हवा आहे. भाजपच्या…

Read More

‘जनतेचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत’ शाहूनगरमध्ये एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांचा विजयोत्सव साजरा पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार बहुमतात आले आहे. राज्यातील मायबाप मतदारांनी आणि लाडक्या बहिणींनी स्पष्ट कौल महायुतीला दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा रयतेचे राज्य स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघात महायुती सरकारचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. त्याबद्दल जनतेचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, अशा भावना शिवसेना उपनेते तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी व्यक्त केल्या आहेत. विधानसभा निवडणुकांचे सकारात्मक निकाल लागताच इरफान सय्यद यांच्या शाहूनगर येथील कार्यालयात मोठ्या संख्येने कामगार, पदाधिकारी, शिवसैनिक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी विधानसभा सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांना निवडणूक निरीक्षक शितल नंदा यांच्या उपस्थितीत पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पिंपरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत १५ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी बालेवाडी येथील मतमोजणी कक्षात सुरळीत पार पडली. या निवडणुकीमध्ये अण्णा बनसोडे विजयी झाले. त्याबद्दल त्यांना बालेवाडी येथील मतमोजणी कक्षात निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख,नागू वाकसे, वेबकास्टींग नोडल अधिकारी मनोज सेठीया, निवडणूक निरीक्षक यांचे समन्वयक हरविंदरसिंह बन्सल, इनडोअर नोडल…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवडच्या आखाड्यात महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे अशी दुरंगी लढत वाटत असली तरी, अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर कुणाचा ताप वाढविणार, याविषयी चर्चा रंगली होती. मात्र अशातच आज मोजणीच्या पहिल्या फेरीपासून शंकर जगताप आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अखेर चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचेभाजपाचे उमेदवार शंकर जगताप हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांचा पराभव केला आहे. जगताप यांच्या विजयानिमित्त थेरगाव परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा केला आहे. थेरगाव येथील स्व. शंकरराव गावडे कामगार भावनांमध्ये भावनांमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार महेश लांडगे हे 63 हजार 634 मतांनी विजयी झाले. त्यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रिक केली. त्यांनी महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांचा पराभव केला. लांडगे यांच्या विजयानिमित्त भोसरी परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे. डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा केला आहे. तसेच महेश लांडगे यांच्या भोसरी येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्या फेरीचा निकाल हातात येण्यास पावणे अकरा वाजले. सुरुवातीला मतमोजणीचा वेग संथ होता. मात्र, नंतर जिल्हाधिकारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभेच्या जातीसाठी राखीव असलेल्या पिंपरी मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे विजयी झाले आहेत. त्यांना एक लाख ८ हजार ९४९ मते मिळाली. शेवटच्या विसाव्या फेरी अखेर त्यांनी ३६६९८ मतांची आघाडी घेत विजयी घौडदौड कायम ठेवली. पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात सरळ लढत झाली. अजित पवार गटाकडून अण्णा बनसोडे तर शरद पवार गटाकडून सुलक्षणात शिलवंत निवडणूक रिंगणात होते. बुधवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत पिंपरी मतदारसंघात दोन लाख दोन हजार ७६६ मतदारांनी मतदान केले. यात सुलक्षणा शिलवंत यांना ६९२५१ मते मिळाली. बालेवाडी येथे शनिवारी सकाळी आठ वाजता पासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी, चिंचवड  भोसरी या तीन ही विधानसभेत महायुतीचे तीनही उमेदवार विजयी झाले. चिंचवडच्या आखाड्यात महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे अशी दुरंगी लढत वाटत असली तरी, अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर कुणाचा ताप वाढविणार, याविषयी चर्चा रंगली होती. मात्र अशातच आज मोजणीच्या पहिल्या फेरीपासून शंकर जगताप आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अखेर चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचेभाजपाचे उमेदवार शंकर जगताप हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांचा पराभव केला आहे. जगताप यांच्या विजयानिमित्त थेरगाव परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे. डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा केला आहे.…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )-चिंचवड विधानसभा सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार  शंकर पांडुरंग जगताप यांना निवडणूक निरीक्षक  मनवेश सिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. चिंचवड विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत २१ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे मतमोजणी कक्षात सुरळीत पार पडली. या निवडणुकीमध्ये श्री. शंकर जगताप विजयी झाले. त्याबद्दल त्यांना थेरगाव येथील मतमोजणी कक्षात निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे, मतमोजणी आराखडा…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली. राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत, तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (दि. २३) रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघाची मतमोजनी ही बालेवाडी स्टेडीयम, म्हाळुंगे येथे होत होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघाची मतमोजनी पिंपरी चिंचवड मनपा कामगार भवन थेरगाव येथे होणार आहे. तसेच मावळ विधानसभा मतदार संघाची मतमोजनी नुतन पॉलेटेक्नीक्स कॉलेज, तळेगाव दाभाडे येथे होत आहे. या मतमोजनी परिसरात विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर राहणार असल्याने सदर ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. मतमोजणी शांततेत व सुरळीतपणे पार पाडणेकरीता या ठिकाणच्या वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल (दि.२३) रोजी पहाटे ०५:००…

Read More