ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे विजयी

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभेच्या जातीसाठी राखीव असलेल्या पिंपरी मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे विजयी झाले आहेत. त्यांना एक लाख ८ हजार ९४९ मते मिळाली. शेवटच्या विसाव्या फेरी अखेर त्यांनी ३६६९८ मतांची आघाडी घेत विजयी घौडदौड कायम ठेवली.

पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात सरळ लढत झाली. अजित पवार गटाकडून अण्णा बनसोडे तर शरद पवार गटाकडून सुलक्षणात शिलवंत निवडणूक रिंगणात होते. बुधवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत पिंपरी मतदारसंघात दोन लाख दोन हजार ७६६ मतदारांनी मतदान केले. यात सुलक्षणा शिलवंत यांना ६९२५१ मते मिळाली. बालेवाडी येथे शनिवारी सकाळी आठ वाजता पासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. यात पहिल्या फेरीपासून अण्णा बनसोडे यांनी मतांची आघाडी कायम ठेवली.

मतमोजणीच्या २० फेऱ्या झाल्या. दरम्यान, टपाली मतदान दुपारपर्यंत जाहीर करण्यात आले नव्हते. बनसोडे यांनी शेवटच्या विसाव्या फेरी अखेर एक लाख आठ हजार ९४९ मते मिळवून ३६ हजार ६९८ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button