Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे प्रदीर्घ आणि सर्वंकष संविधान हा केवळ नियम कायद्यांचा संचय नसून स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मानवी मूल्यांना प्रवर्धित  करणारा मानवतेचा जाहिरनामा आहे , असा सुर महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादामध्ये  सहभागी वक्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली  दि.२६ आणि २७ नोव्हेंबर २०२४     रोजी दोन दिवसीय प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आले आहे.  त्यानिमित्ताने दि. २६ रोजी सायंकाळच्या सत्रात  “भारतीय संविधानाला अभिप्रेत समाजव्यवस्था” या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.  या परिसंवादामध्ये नाट्य लेखक,दिग्दर्शक, कलावंत  प्रा.…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टर ने यांच्या क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथे गुणवत्ता स्पर्धा २०२४ आयोजित करून यावर्षीचा गुणवत्ता महिना साजरा केला हे सलग ११ वे वर्ष होते. या कार्यक्रमात ३५ संस्थां मधील ३०७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात ६९ केस स्टडी, ३ स्किट, ३८ पोस्टर्स आणि ३८ स्लोगन या स्पर्धेत एकूण १४८ संघांचा समावेश होता. संघांनी त्यांची गुणवत्ता सुधार केस स्टडी, स्लोगन, पोस्टर आणि स्किट सादर केले. या समारंभाचे उद्घाटन सरबजीत सिंग भोगल-टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लि., कोम्पोजिट डिव्हिजन चे सीनियर जनरल मॅनेजर-ऑपरेशन्स हेड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या, क्वालिटी सर्कल…

Read More

 पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध वैचारिक, सांस्कृतिक,प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. “ये मेरा संविधान, ये तेरा संविधान, हम सबका संविधान, भारत का संविधान” अशा संविधान गौरवाच्या ओळींनी निर्मिक आर्ट्स याग्रुपच्या तरुणांनी  उपस्थित रसिकांची मने जिंकली. सुप्रसिद्ध गायक चेतन चोपडे यांनी संविधानातील मूल्यांना उजागर करणारी गीते सादर करत प्रेक्षकांना विवेकी होण्याचे आवाहन केले.  २६ नोव्हेंबर रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळच्या सत्रात गायक मारुती जकाते, बापू माने, अनिरुद्ध सूर्यवंशी, सुनील गायकवाड, निहाल लगाडे आणि गायिका सुमन चोपडे यांनी गीतगायनाच कार्यक्रम सादर केला.  त्यानंतर संगीतकार मंगलसिंग सोळंके, गायक अरुण खरात,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र विधानसभेत भाजपा महायुतीला दणदणीत विजय मिळवल्याबद्दल व चिंचवड विधानसभेत शंकर जगताप यांचा लाखाच्या मताधिक्याने विजय मिळविल्याबद्दल चिंचवड येथील नगरसेवक सुरेश भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालया बाहेर ढोल ताशाच्या जल्लोषात नागरिकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा साजरा करण्यात आला. या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य महेश कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेविका कांता मोंढे, शहर उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, शहर सचिव मधुकर बच्चे, रवींद्र प्रभुणे, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष दिपाली कलापुरे, प्रदीप सायकर, शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक नारायण लांडगे, तुकाराम चौधरी,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२४-२५ आजपासून महाराष्ट्रातील अनेक केंद्रांवर सुरु झाली.पिंपरी-चिंचवड केंद्रावरील ह्या स्पर्धेचे उद्घाटन २६/११/२०२४ ला सायंकाळी ७ वाजता प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे झाले.ह्या प्रसंगी प्रमुख पाहुण्या मा.आमदार सौ.ऊमाताई खापरे, अ.भा.म.ना.प.मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष मा.भाऊसाहेब भोईर,शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी डाॅ.संजीवकुमार पाटील,सेन्साॅर बोर्ड सदस्य रंगकर्मी नरेंद्र आमले,रंगभूषाकार बाळ जुवाटकर,रंगकर्मी माधव जैगळेकर,परिक्षक राहुल वैद्य,मुकुंद मराठे व अनुया बाम उपस्थित होते. दीपप्रज्वलन व नटराजपूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन झाले.मा.आमदार उमा खापरे व भाऊसाहेब भोईर ह्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.स्पर्धेचे केंद्र समन्वयक राजेंद्र बंग ह्यांनी ह्यावर्षी केंद्रावर एकूण १७ नाट्यप्रयोग होणार असून आजपासून १२ डिसेंबर पर्यंत…

Read More

जयभीम चौकात संविधान दिन उत्साहात साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय संविधान आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारलेले एक समान व सुदृढ समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवते, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले. संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव संयुक्त जयंती समिती – जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, औंध कॅम्प आणि अमरसिंग आदियाल स्पोर्ट क्लब यांच्या वतीने पिंपळे गुरवमधील जयभीम चौकात आमदार शंकर जगताप व सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूल रहाटणी येथे ‘भारतीय संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी संतोष जाधव (विस्तार अधिकारी पिं.चिं. म.न.पा.) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामूहिक उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार,दीपक नागरगोजे (सरचिटणीस युवा मोर्चा बी.जे.पी) विलास पोळ (सामाजिक कार्यकर्ते) युवराज प्रगणे (उद्योजक) गोरख रोकडे व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या वेळी शाळा ते छत्रपती श्री.शिवाजी महाराज चौक, विमल गार्डन, कोकणे चौक शाळा अशी संविधान दिंडी काढण्यात आली. यामध्ये पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर आता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत चर्चाना सुरुवात झाली आहे. महेश लांडगे यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या  जिल्हा सचिव राजश्री जायभाय यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले  आहे की, विधानसभा निवडणुकीत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात २१ मतदारसंघांमध्ये महायुतीचे १८ आमदार, तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आणि १ अपक्ष आमदार निवडून आले आहेत. आमदार महेश लांडगे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असून गेल्या वेळेस त्यांचं मंत्री पद थोडक्यात हुकल होतं. यावेळेस तरी मंत्री पद मिळावे हिच त्यांना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारतीयांमध्ये स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय ही मूल्ये रुजविण्यासाठी भारतीय संविधानाची भुमिका महत्वपूर्ण राहिली असून गेल्या ७५ वर्षात जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशाने संविधानाच्या मार्गाने वाटचाल करीत विविध यशाची शिखरे गाठली असून भारतीय संविधानाचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधान दिनाची उत्साहात सुरूवात करण्यात आली. त्यानंतर भीमसृष्टी, पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त २६ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानावर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनही अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते कार्यक्रम स्थळी असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अभिवादनाच्या वेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता चंद्रकांत कुंभार, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे, किसन केंगले, अभिजित डोळस, विकास गायकांबळे, तुकाराम गायकवाड,ओंकार पवार, पियुष घसिंग, श्रेयश जाधव, सचिन महाजन यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पिंपरी येथील भीमसृष्टी येथील भारतीय संविधान फलकास देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या समवेत “आम्ही,भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्या वतीने मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व स्मारकास पुष्पहार अर्पण करून सामूहिक संविधान प्रस्तावना वाचन शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष बहल म्हणाले की, संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपले हक्क बहाल करत असले तरी त्यात दिलेली मुलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे…

Read More