संविधान समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा मार्ग दाखवते : आमदार शंकर जगताप


जयभीम चौकात संविधान दिन उत्साहात साजरा



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय संविधान आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारलेले एक समान व सुदृढ समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवते, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव संयुक्त जयंती समिती – जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, औंध कॅम्प आणि अमरसिंग आदियाल स्पोर्ट क्लब यांच्या वतीने पिंपळे गुरवमधील जयभीम चौकात आमदार शंकर जगताप व सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.
या निमित्ताने भारतीय संविधानाचे प्रास्ताविक – प्रियांबल याचे सामुदायिक वाचन करीत भारतीय संविधानावर प्रबोधन करण्यात आले. यावेळी बुद्धभूषण सेवा संघाचे माजी अध्यक्ष शिवलाल कांबळे, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ श्रीकृष्ण फिरके, संयुक्त जयंतीचे माजी कार्याध्यक्ष राहुल काकडे, संयुक्त जयंतीचे सचिव विकास साळवे, सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, मुकेश पवार, नितीन कदम, विष्णू शेळके, नरेश जगताप, रमेश काशीद, सुभाष जाधव, आशिष जाधव, योगेश सासर, भालेराव मामा, आशिष सोनवणे, गणेश जगताप, नितीन काशीद, अतुल काशीद, आशिष सोनवणे, राज साळवे, विकास चव्हाण, बलजीत आदियाल, मानसिंग आदियाल, समशेरसिंग चव्हाण, युवा नेते अमरसिंग आदियाल, प्रकाश कांबळे, राकेश लोखंडे, ऍड. विलास गायकवाड, चंद्रकांत वाकोडे, संदीप नितनवरे, रवी गायकवाड, पंचशीलताई दुधारे, स्वातीताई जाधव, प्राची गायकवाड, मीनाताई जंगम, नेटके ताई, शिका चव्हाण, अर्चना सिंग, मनीषा ताई, वंदनाताई लोखंडे, माजी नगरसेविका वैशालीताई जवळकर, दुर्गाताई आदियाल आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनतीने आणि दूरदृष्टीने आपले संविधान तयार केले. हे संविधान आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांसारख्या मूल्यांवर आधारलेले एक समान व सुदृढ समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवते. आपल्या संविधानाने आपल्या देशाला लोकशाहीचा पाया दिला आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा, आपले स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक व्यक्तीला समानतेचा हक्क आहे, असे आमदार जगताप यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक महेश बनसोडे म्हणाले, की आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो.
आभार युवा नेते अमरसिंग आदियाल यांनी मानले.








