ताज्या घडामोडीपिंपरी
आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपद मिळावे – राजश्री जायभाय


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर आता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत चर्चाना सुरुवात झाली आहे. महेश लांडगे यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सचिव राजश्री जायभाय यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.



दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात २१ मतदारसंघांमध्ये महायुतीचे १८ आमदार, तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आणि १ अपक्ष आमदार निवडून आले आहेत. आमदार महेश लांडगे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असून गेल्या वेळेस त्यांचं मंत्री पद थोडक्यात हुकल होतं. यावेळेस तरी मंत्री पद मिळावे हिच त्यांना वाढदिवसाच्या दिवशीची भेटू अमूल्य ठरेल.
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड, पिंपरी आणि भोसरी असे तीन मतदारसंघ आहेत. तीनही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यातील चिंचवड व भोसरीचा गड भारतीय जनता पक्षाने; तर पिंपरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतः कडे राखण्यात यश मिळवले आहे. भोसरीतून विजयी झालेले विद्यमान आमदार महेश लांडगे हे भारतीय जनता पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. आमदार महेश लांडगे यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीला पहिल्यांदाच मंत्रिपद मिळेल.
विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (ता. २३) लागला. त्यात भोसरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी हॅट्ट्रिक साधली. भोसरीचे महेश लांडगे यांची राज्यमंत्रिपदासाठी वर्णी लागेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे यातून मंत्रिपद मिळावेअशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे.








