Author: maharashtrabreakingnews.com

एम. एस. ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत मार्गदर्शन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च येथे सोमवारी (दि. २ डिसेंबर) परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण मार्गदर्शन” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पीसीसीओईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.     रावेत, पीसीसीओईआर मध्ये सोमवारी सकाळी दहा वाजता या “आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण मार्गदर्शन” मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. पदवीनंतर परदेशात उच्च शिक्षणासाठी (एम. एस.) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी ३० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन…

Read More

शारीरिक व मानसिक आरोग्यासह पर्यावरणासाठी अभीनव उपक्रम पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ग्रॅन्यूल्स ग्रीन हार्टफुलनेस रन या जागतिक उपक्रमाचे आयोजन 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ६ वाजता पुण्यात होणार आहे. वाघोली येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल येथे सुरू होणारी आणि नगर रोडवरून परत येणारी ही स्पर्धा हार्टफुलनेस संस्थेने युवक व क्रीडा मंत्रालय व फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. जिचा उद्देश शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वाढवणे तसेच पर्यावरणीय शाश्वतता टिकवणे हा आहे. या रनमध्ये सहभागी होणाऱ्यांना 1 किमी, 3 किमी, 5 किमी, व 10 किमी या श्रेणीमध्ये सहभागी होण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच, या उपक्रमातून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग 10,000 झाडे लावण्यासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालेला फ्रँन्क्स हॉट डॉग्स या गुर्मेट हॉट डॉग्स ब्रँडने भारतात अधिकृतरीत्या प्रवेश केला आहे! फ्रँचायझी इंडियाचा आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी विकास शाखा असलेल्या फ्रॅनग्लोबलशी भागीदारी करून या ब्रँडने भारतातील आपल्या पहिल्या आऊटलेट चिचंवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये हे आऊटलेट सुरु झाले आहे. या ऐतिहासिक आरंभाने या ब्रँडचा केवळ भारतीय बाजारपेठेत प्रवेश झालेला नाही, तर फ्रँन्क्स च्या भारतातील महत्त्वाकांक्षी वाढीसाठी पुण्यालाही लाँच पॅडचे स्थान मिळाले आहे. गतिमान खवय्येगिरी आणि साहसी खवय्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तसेच स्थानिक चवीसह जागतिक आकर्षण यांचा मिलाफ झालेल्या पुण्यात फ्रँन्क्स हॉट डॉग्सला आपले नाविन्यपूर्ण, चवदार मेनू सादर करण्यासाठी परिपूर्ण वातावरण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्यातील दुस-या टप्याची वाटचाल त्यामुळे सेवानिवृत्तीचा दिवस चांगल्या आठवणींना सोबत घेऊन साजरा करावा व त्या आठवणींमध्ये आपले पुढील आयुष्य अधिक सुंदर बनवावे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आणि सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचा-यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने केलेल्या कामकाजामुळे महापालिका यशस्वीरित्या वाटचाल करत प्रगतीपथावर पोहोचली याबाबत त्यांचेप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे नोव्हेंबर २०२४ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १७ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या २ अश्या एकूण १९ कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सामाजिक जागृती आणि मानवतावादाचा अभूतपूर्व संदेश देत, येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात “नशा मुक्त अभियान” आणि रक्तदान शिबिर यासारख्या प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना रुजवण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात एमआयटी इम्पॅक्ट स्टुडंट कौन्सिल आणि इलेक्टोरल लिटरसी क्लबने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करून केली. यानंतर “से नो टू ड्रग्स” या संदेशाने सुसज्ज जनजागृती रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने भाग घेतला. या मोहिमेत समाजाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यानंतर, विद्यार्थी व्यवहार कार्यालय व आर्म्ड फोर्सेस…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  विविध भारती म्युझिकल इव्हेंट या संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त प्रस्तुत ‘के पग घुंगरू बांध…’ या महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेल्या कराओके व्हिज्युअल चित्रपटगीतांच्या नि:शुल्क मैफलीला अमिताभप्रेमी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) संपन्न झालेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, उपाध्यक्ष संतोष बाबर, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, प्रदीप गांधलीकर, शामराव सरकाळे, चंद्रशेखर कांबळे, जितेंद्र राॅय, राजेंद्र पगारे, महेश बिरदवडे, राजेंद्र देसाई, विलास गादडे,  ॲड. स्मिता शेटे, विकी शर्मा, उषा शेटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मक प्रयत्न करा. भारतीय युवकांमध्ये खूप ऊर्जा आणि क्षमता असून ते आकाशाला देखील गवसणी घालू शकतात. पुढील काळात विकसनशील भारतात युवकांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होतील त्या संधीचे तुम्ही सोने करा असे शुभ आशीर्वाद राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी पुण्यातील युवा कलाकार ईशा अगरवाल हिला दिले.     पुण्यातील युवा अभिनेत्री व औंध, बाणेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाची साधक ईशा अगरवाल हिने प्रियांका चोप्रा ची आई मधू चोप्रा, दीपक हारके यांच्या समवेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची दिल्लीमध्ये नुकतीच भेट घेतली. यावेळी ईशा अगरवाल हिने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून चिंचवडच्या जनतेने प्रचंड आशीर्वाद देत मला भरघोस बहुमताने विजयी केले. तुम्ही माझ्यावर जे प्रेम आणि विश्वास व्यक्त केला त्या ऋणातून मी कधी मुक्त होऊ इच्छित नाही. कारण तुमचे हे ऋणच मला पुढील काळात तुमची सेवा करण्यासाठी व आपल्या चिंचवडचा विकास करण्यासाठी नेहमी प्रेरित करीत राहील. तुम्ही माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे, त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, असा शब्द नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी यावेळी दिला. चिंचवड विधानसभा निवडणुकीत आमदार शंकर जगताप यांनी विक्रमी लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला. या विजयानंतर रहाटणी – काळेवाडी परिसरातील मतदारांचे आणि महायुतीच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २५ पुनावळे, वाकड आणि प्रभाग क्रमांक १६ रावेत, किवळे, मामुर्डी या परिसरातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी वाकड येथील टीपटॉप हॉटेलपासून अटलांटा २ सोसायटीकडे जाणारा १८.०० मी. रुंद डी.पी. रस्ता विकसित करणे, प्रभाग क्र. २५ पुनावळे येथील गायकवाडनगर मधील १८.०० मी. रुंद डी.पी. रस्त्याची उर्वरीत स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क. २५ पुनावळे येथील मुंबई-बैंगलोर हायवे पासून काटेवस्तीकडे जाणारा ३०.०० मी. डी.पी. रस्ता विकसीत करणे, पुनावळे येथील कोयतेवस्ती चौक ते जांबे गावाकडे जाणारा १८.०० मी. डी.पी. रस्ता विकसीत करणे, पुनावळे येथील…

Read More

फोरमचे अध्यक्ष लॉएक फॉचोक यांनी विजय सावंत च्या संशोधनाचे केले कौतुक पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  मागील आठवड्यात बाली, इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या “१० व्या वर्ल्ड वॉटर फोरम” मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी विजय रणजीत सावंत यास मिळाली.     वर्ल्ड वॉटर फोरम मागील ३० वर्षांपासून पाणी समस्यांवर संशोधन करून उपाय सुचविणाऱ्या संशोधकांना जागतिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणारी नामांकित संस्था आहे. या संस्थेच्या वतीने दर तीन वर्षांनी जागतिक पाणी परिषद भरवली जाते. यामध्ये जगभरातील युवा संशोधक पाणी समस्या बाबत प्रबंध सादर करीत असतात. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी या दहाव्या…

Read More