आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते चिंचवड मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २५ पुनावळे, वाकड आणि प्रभाग क्रमांक १६ रावेत, किवळे, मामुर्डी या परिसरातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.



यावेळी वाकड येथील टीपटॉप हॉटेलपासून अटलांटा २ सोसायटीकडे जाणारा १८.०० मी. रुंद डी.पी. रस्ता विकसित करणे, प्रभाग क्र. २५ पुनावळे येथील गायकवाडनगर मधील १८.०० मी. रुंद डी.पी. रस्त्याची उर्वरीत स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क. २५ पुनावळे येथील मुंबई-बैंगलोर हायवे पासून काटेवस्तीकडे जाणारा ३०.०० मी. डी.पी. रस्ता विकसीत करणे, पुनावळे येथील कोयतेवस्ती चौक ते जांबे गावाकडे जाणारा १८.०० मी. डी.पी. रस्ता विकसीत करणे, पुनावळे येथील बी.आर.टी. रोड पासून पुनावळे गावठाणातून पुनावळे मनपा दवाखाना जाणारा १८.०० मी. रुंद डी.पी. रस्ता विकसीत करणे, ताथवडे गावातून जिवननगरमार्गे MTU कंपनीकडे जाणारा १८.०० मी. डी. पी. रस्ता विकसीत करणे, रावेत व किवळे सीमेवरील (स.नं.७२,६६,६५,६४,६३,८४,१०५,१६,५६) असलेल्या १८.०० मी. डी.पी. रस्ता व उर्वरीत इतर रस्ते विकसीत करणे, मामुर्डी किवळे येथील उर्वरीत १८.०० मी. व १२.०० मी. डी.पी. रस्ते विकसीत करणे, मुकाई चौक ते शिंदे पेट्रोल पंप पर्यंतचा डी.पी. रस्ता व इतर रस्ते विकसीत करणे आदी विकासकामांचे भूमिपूजन आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना जगताप म्हणाले की, चिंचवड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या भाजप महायुतीने दिलेल्या वचनाची पूर्तता करत, स्थानिक नागरिकांच्या मुलभूत सुविधा आणि वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. यामुळे वाकड-पुनावळेकर आणि रावेत, किवळेकरांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या सुलभ वाहतूक, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर सेवा अधिक सोयीस्कर होतील. आम्ही यापुढील काळामध्ये चिंचवड विधानसभेला आणखी समृद्ध आणि सक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, विनायक गायकवाड, मनोज खानोलकर, संगीता भोंडवे, ममता गायकवाड, प्रज्ञाताई खानोलकर, बाळासाहेब ओव्हाळ, भाजपचे शहर उपाध्यक्ष विशाल आप्पा कलाटे , राम वाकडकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य भारती विनोदे, स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, दीपक भोंडवे, सोमनाथ भोंडवे नवनाथ ढवळे,राहुल काटे, रणजित कलाटे, प्रसाद कस्पटे, अमोल कलाटे, श्रीनिवास कलाटे, संभाजी शिंदे, लक्ष्मणराव कोयते, दिलीप दर्शले, किसनराव सावंत, शंकरराव गायकवाड, हेमंत कोयते, विलास बोरगे, सुरेश रानवडे, सुरेश भुजबळ, दादा ढवळे, संतोष भुजबळ, अक्षय भुजबळ, धनाजी कोयते, बाजीराव बहिरट, ऋषिकेश पांढरे, प्रमोद चव्हाण, दिपांकर घोष, धर्मराज कटके, अक्षय कळमकर , अमोल कलाटे, अक्षय कलाटे, आकाश बोडके , सनी कलाटे , अभिमान कलाटे, गबाजी वाकडकर, ॲड.चेतन कलाटे, ॲड.अमोल भुजबळ, केशरीचंद किरनापुरे, दिलीप छिद्रेवार, शांताराम गायकवाड, सिंगसाहेब, अनिल बडगुजर, जगदिश राणे, संत तुकाराम कारखान्याचे संचालक मधुकर भोंडवे, सुरेश भोंडवे, किरण भोंडवे, दादा तरस, उमेश सांडभोर, अनिल चव्हाण, संतोष म्हस्के, राजेंद्र तरस, अजय भोंडवे, कुणाल भोंडवे, कैलास कातळे, आबा घारे, शांताराम भोंडवे, सचिन गावडे, प्रशांत पाटील, राहुल पाटील, सुधीर देवकर, बाबुलाल पाटील, अशोक आढाव, विनीत पाटील, गजानन पाटील, काशिनाथ गुरव , राहुल पाटील, पुरुषोत्तम पाटील, सतीश कदम, प्रवीण धकाते, अमोल पवार, तुषार रोडे, सुशांत चासकर, जितेंद्र नंदुरकर, सुदेश राजे, रावसाहेब डोंगरे, सुर्यकांत सोनार, गायकवाड आदी उपस्थित होते.








