Author: maharashtrabreakingnews.com

भारत दर्शन दौऱ्यासाठी  महापालिकेच्या शाळेतील १५ विद्यार्थी रवाना  पाचवी व आठवी मधील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड  पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )-  पिंपरी – चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभाग महापालिकेच्या शाळातील गुणवंत विद्यार्थ्यांना समृद्ध अनुभव देण्यासाठी दरवर्षी अभ्यास दौऱ्यावर पाठवीत आहे. यावर्षीसुद्धा महापालिकेने पाचवी व आठवी मधील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर विद्यार्थी २ डिसेंबर रोजी सहा दिवसांसाठी बंगळुरू, म्हैसूर, उटी आणि कोईम्बतूर येथे दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. मागील वर्षी भारत दर्शन अभ्यास दौरा विद्यार्थी,पालक व शिक्षकांसाठी शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवांचे मिश्रण साधणारा एक आदर्श उपक्रम ठरला. सदर यशस्वी उपक्रमातून महापालिकेने यावर्षी सुद्धा परंपरा सुरू ठेवली…

Read More

नूतन भोसरी रुग्णालयात एचआयव्ही जनजागृती कार्यक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – एचआयव्ही बाधीत ६० टक्के लोकांना क्षयरोगाचा (टीबी) चा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त असतो. एचआयव्हीची बाधा झाल्यास घाबरून न जाता योग्य औषध उपचार, सकस आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास चांगले आयुष्य जगणे सहज शक्य आहे. या आजारामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते असे मार्गदर्शन नूतन भोसरी रुग्णालयातील आयसीटीसी समुपदेशक अर्चना शिंदे यांनी केले. नूतन भोसरी रुग्णालय येथे जागतिक एड्स जनजागृती सप्ताह निमित्त आयसीटीसी विभागाच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील शाळा व अंगणवाडी शिक्षकांना एचआयव्ही, एड्स, क्षयरोग व गुप्तरोग आजारांविषयी माहिती देण्यात आली. एचआयव्ही…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारताचे माजी राष्ट्रपती आणि एक अत्यंत प्रतिष्ठित वकील डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ – २८ फेब्रुवारी १९६३) यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ३ डिसेंबर रोजी वकिलांचा दिवस साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपरी न्यायालयात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन च्या वतीने याप्रसंगी केक कापून उपस्थित वकिलांना गुलाबाचे पुष्प देत “ॲडव्होकेट्स डे” उत्साहात साजरा करण्यात आला. बदल, न्याय आणि समानतेसाठी चॅम्पियन बनवून समाज घडवण्यात वकिली महत्त्वाची भूमिका बजावते. वकील हे व्यक्ती आणि समुदायांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यासाठी सक्षम करते. वकिलांच्या प्रयत्नांद्वारे, मानवी हक्क, आरोग्यसेवा प्रवेश, पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक सुधारणा…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत   यांच्यातर्फे  हॉटेल रागा पॅलेस या ठिकाणी आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर, महाविकास आघाडीतील घटक पक्षातील मित्र पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. माजी आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार म्हणाले आजपर्यंत मी २४ निवडणुका पाहिल्या, परंतु “विधानसभा २०२४” निवडणूक म्हणजे लोकशाहीची हत्या झाली असं म्हणावं लागेल.पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना लीड आहे. म्हणूनच ईव्हीएम मशीन ने आपल्याला हरवले आहे अन्यथा आपण जिंकलो आहोत. जनतेला गुलाम बनवून ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. गुलामी च्या विरोधात लढलेल्या पुरोगामी…

Read More

इंद्रायणी घाट व प्रदक्षिणा मार्गाची स्वयंसेवकांनी केली स्वच्छता पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वारकरी सेवा संघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने तीर्थक्षेत्र आळंदी येथे स्वच्छता अभियानांतर्गत इंद्रायणी घाटाच्या दोन्ही बाजू, तसेच आळंदीतील प्रदक्षिणा मार्गाची स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. या उपक्रमाचे परिसरातून स्वागत करीत समाधान व्यक्त करण्यात आले. या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी माऊलींचे चोपदार राजाभाऊ रंदवे, पंढरपूर देवस्थानच्या सदस्या माधवीताई निगडे, ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के, जिल्हाध्यक्ष संजय महाराज बोरगे, विलास बालवडकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते. या अभियानात सुमारे 300 स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन अभियानात आपला सहभाग नोंदवला. यावेळी पिंपरी चिंचवड वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष सौरभ शिंदे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – तळवडेतील सहयोगनगर येथील वाहतुकीच्या रस्त्यामध्ये 40 वर्षांपासून असलेला टॉवर अखेर हटविण्यात येणार आहे. त्याजागी मोनोपोल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र निविदेला महानगरपालिका स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. मोनोपोल कमी जागेत उभारल्याने सहयोगनगर ते त्रिवेणीनगर दरम्यान होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे. परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत तळवडे प्रभाग क्रमांक 12 मधील सहयोगनगर येथे वाहतुकीच्या रस्त्यामध्ये महापारेषणाचा अतिउच्च दाबाचा (220 kv EHV line) टॉवर सुमारे 40 वर्षांपासून कार्यरत आहे. तळवडे ही औद्योगिक वसाहत तसेच आयटी पार्क असल्यामुळे लोकवस्ती व वाहतूक…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –   “आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर…” या निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या सुंदर ओळी प्रत्यक्षात चुलीवर भाकरी करताना कविसंमेलन घेऊन शब्दधन  काव्यमंच या साहित्य संस्थेने कृतीत आणल्या. महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, उद्योगनगर, चिंचवड येथे संपन्न झालेल्या या कविसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी उज्ज्वला केळकर यांनी चुलीची यथोचित पूजा करून केले. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखेच्या सदस्य जयश्री श्रीखंडे होत्या; तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रणाली प्रकाशनच्या शामला पंडित होत्या. महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, उद्योगनगरचे केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती. तानाजी एकोंडे यांनी…

Read More

सुमारे दोन तास रात्री उशिरा श्रींचे सोहळ्याची सांगता आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७२९ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्या अंतर्गत आळंदी कार्तिकी वारीची सांगता श्रींचे पालखी छबिना मिरवणुकीने हरिनाम गजरात सुमारे दोन तास रात्री उशिरा श्रींचे सोहळ्याची सांगता झाली. देवस्थान तर्फे मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप व आळंदी ग्रामस्थांना तर्फे महाप्रसाद, दूध प्रसाद वाटप उत्साहात करण्यात आले. हजारो भाविक यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त अँड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळ्याचे मालक ऋषिकेश आरफळकर, माऊली महाराज जळगावकर, रोहण शिंदे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग  न्यूज ) – पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीस उद्योगमंत्री पद मिळावे या करिता पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी यांनी  देवेंद्र फडणवीस मुंबईत जाऊन भेट घेतली व त्यांच्याकडे पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीस उद्योगमंत्री पद मिळावे अशी मागणी केली. या भेटीमध्ये संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक संजय सातव, प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, अतुल इनामदार, सचिन आदक, स्विकृत संचालक श्रीपती खुणे  आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. पिंपरी चिंचवड महानगर पालिका व एम.आय.डी.सी. औद्योगिक परिसरात साधारणपणे 20 ते २५…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) “पिंपरी – चिंचवड कार्यकर्त्यांची खाण असून या भूमीने सुनीता फाटक यांच्यासारखे असंख्य समर्पित कार्यकर्ते विविध संघटनांना दिले आहेत!” असे भावपूर्ण उद्गार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त मंत्री दादा वेदक यांनी मत व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघचालक विनोद बन्सल, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभाग कार्याध्यक्षा वैदेही पटवर्धन यांची व्यासपीठावर तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सभागृहात उपस्थिती होती. दादा वेदक पुढे म्हणाले की, “निरलस, ध्येयनिष्ठ आणि निर्मळ मनाची कार्यकर्ती असे सुनीता फाटक यांचे व्यक्तिमत्त्व होते. १९८७ पासून २०२० पर्यंत त्यांनी संघटनेच्या कार्यासाठी अविरत भ्रमंती केली. आपल्या सामाजिक कार्यातून…

Read More