ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीस उद्योगमंत्री पद मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेची मागणी

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग  न्यूज ) – पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीस उद्योगमंत्री पद मिळावे या करिता पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी यांनी  देवेंद्र फडणवीस मुंबईत जाऊन भेट घेतली व त्यांच्याकडे पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीस उद्योगमंत्री पद मिळावे अशी मागणी केली. या भेटीमध्ये संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक संजय सातव, प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, अतुल इनामदार, सचिन आदक, स्विकृत संचालक श्रीपती खुणे  आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. पिंपरी चिंचवड महानगर पालिका व एम.आय.डी.सी. औद्योगिक परिसरात साधारणपणे 20 ते २५ हजार लहानमोठे उद्योग कार्यरत आहेत. त्यापैकी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेकडे साधारणपणे ४५०० हजार लघु उद्योजक  हे सभासद आहेत.

     नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असून यामध्ये भोसरी, पिंपरी, चिंचवड, या विधानसभा मतदार संघाचा  समावेश होतो. या तीनही विधानसभा मतदार संघातील  महायुतीचे उमेदवार यांना पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने जाहीर पाठींबा दिलेला होता. या तीनही विधानसभा मतदार संघातील  महायुतीचे उमेदवार भरघोष मताधिक्याने विजयी झाले. त्यात भोसरी महेश लांडगे, पिंपरी अण्णा बनसोडे, चिंचवड शंकर जगताप तसेच विधानपरिषदेवर अमित गोरखे यांची निवड झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button