Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी – चिंचवड शहरामध्ये ६ लाखाहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत. नोंदणीकृत मालमत्तांना मालमत्ताकराचे बिल वेळेमध्ये पोहोचवण्यासाठी करसंकलन विभागाकडून ‘प्रकल्प सिध्दी’उपक्रम राबविण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शहरातील महिला बचत गटांच्या महिलांना शहरामध्ये मालमत्ताकराचे बिल वाटप करण्यासाठी नेमण्यात आले. प्रकल्प सिध्दी उपक्रमाच्या माध्यमातून करसंकलन विभागाने निर्माण केलेल्या मोबाईल अँप्लिकेशनच्या माध्यमातून मालमत्ताधारकांची माहिती अपडेट करण्यात आली. त्यासोबत, मालमत्तांचे अक्षांश-रेखांश, बिल वाटप केल्याची वेळ, बिल वाटप करतानाचा फोटो आदी माहितीचे संकलन करण्यात आले. चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल महिन्यामध्येच ऑनलाईन स्वरुपामध्ये मालमत्ता कराची बिले उपलब्ध करण्यात आली. त्याबरोबरच, करसंकलन विभागाने नागरिकांना सवलतींचा लाभ मिळावा यासाठी बिलाच्या वितरण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुराम, आनंदनगर, इंदिरानगर आदि परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुराम, आनंदनगर, इंदिरानगर आदी परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड वावर आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, कामगार यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेत खूप जोर जोरात भुंकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेत नागरिकांची निद्रानाश होते. लहान मुले घाबरून जागे होतात.…

Read More

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची मोशी येथील वसतिगृहाला भेट पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोशी, पिंपरी चिंचवड येथील २५० क्षमतेच्या मुलींचे शासकीय वस्तीगृहाची भेट देऊन पाहणी केली. या वसतिगृहाचे काम समाधानकारक असल्याचे सांगून चांगले काम करणाऱ्या वसतीगृहांचा राज्यातील इतर वसतीगृहांनी आदर्श घ्यावा, असेही ते म्हणाले. यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, सहआयुक्त प्रमोद जाधव, पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, पुणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, गृहप्रमुख श्रीमती मीनाक्षी येमले, गृहपाल श्रीमती प्रमिला आमले आदींसह कर्मचारी व वसतीगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. आपल्यासमोर विद्यार्थ्यांच्या हिताला कायम प्राधान्य…

Read More

पिंपरी  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून तीन लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र मालमत्ता प्राध्यान्याने जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, विभागाने शनिवार, दिनांक, 28 डिसेंबर व रविवार, दिनांक, 29 डिसेंबर यादिवशी सुद्धा जप्तीची धडक मोहिम राबविली. यामध्ये शनिवारी 65 मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून रविवारी 63 मालमत्तावर जप्तीची कारवाई करण्यात आली. करसंकलन विभागाची जप्तीच्या धडक मोहीम लक्षात घेऊन आणि आपली मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून शनिवारी 139 मालमत्ता धारकांनी 2 कोटी 91 लाख 13 हजार 770 तसेच रविवारी 89 मालमत्ताधारकांनी 1 कोटी 80 लाख 24 हजार 13 इतका…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  चिंचवड कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक सभा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. ही पालक सभा विज्ञान आणि कला व वाणिज्य अशा दोन टप्प्यात झाली .या सभेत पालकांचा उत्फुर्त प्रतिसाद होता . महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांनी पालकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इयत्ता अकरावीचे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे पण पुढे बारावीच्या दृष्टीने मुलांना नियमित अभ्यासाची सवय असणे गरजेचे आहे. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांच्या अभ्यासाकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.तसेच अभ्यासाच्या दृष्टीने मुलांनी प्रत्येक तासीकेला नियमित हजर राहणे आवश्यक आहेत.मुलांच्या प्रगतीसाठी शिक्षक आणि पालक दोघांचे सहकार्य…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. सचिन सस्ते असे या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. त्याच्यावर पॉक्सोसह ॲट्रॉसिटीनुसार (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या़ंनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने आणि पोलीस निरिक्षक धुमाळ यांच्यासोबत चर्चा केली. पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपी पोलिसाला २५ डिसेंबर रोजी एका दिवसाकरिता बंदोबस्तासाठी पाठवलं होतं. त्याला विसापूरच्या पायथ्याखाली बंदोबस्त दिला होता. यावेळी जेवताना त्याने मद्य प्राशन केले. त्यानंतर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर वाकड-हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी हा नागरिकांसाठी गंभीर विषय ठरला आहे.काल  वाकड-हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी संदर्भात पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका अधिकारी यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करून संभाव्य उपाययोजना ठरवल्या. जाहीरनाम्यामध्ये वाहतूक व्यवस्थापनाबाबत  आग्रही भूमिका घेणार असल्याचे नमूद केले होते. त्याच अनुषंगाने काल वाकड-हिंजवडी रस्त्यावरील , कस्तुरी चौक , काळा खडक चौक , विनोदे नगर , सोनेस्ट टॉवर चौक , श्रीराम चौक , भूमकर चौक येथे वाहतूक कोंडीची ‘बॉटल नेक’ परिस्थिती सोडविण्यासाठी नागरिकांसह ,…

Read More

आदिवासी उत्सव समिती पुणे व पिंपरी चिंचवड आयोजित धानोरी येथे शोभायात्रा पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी उत्सव समिती पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.२९ डिसेंबर) सकाळी दहा वाजता, धानोरी पुणे येथील चैतन्य गगनगिरी कार्यालय येथे या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता धानोरी येथील आदिवासी भीमाशंकर तरुण मित्र मंडळ, मुंजाबा वस्ती येथून चैतन्य गगनगिरी मंगल कार्यालयापर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजन समिती सदस्य विठ्ठल कोथेरे, पांडुरंग ढेंगळे, पांडुरंग तळपे, माजी नगरसेविका…

Read More

राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात डॉ.मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली अर्पण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज  माजी भारत देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे शहराध्यक्ष  योगेश  बहल यांच्या हस्ते डॉ.मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बहल म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांनी १९४८ साली पंजाब विद्यापीठातून त्यांनी उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली. तत्कालीन पंतप्रधान असतांना, डॉ.मनमोहन सिंहांच्या आधार कार्ड संकल्पनेचं…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन पर्वानिमित्त  दि.३ जानेवारी २०२५ रोजी महापालिकेच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन बैठकीचे आयोजन शुक्रवार दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील तिसऱ्या मजल्यावर करण्यात आले आहे.          महापालिकेच्या वतीने थोर महापुरुषांच्या विचार व कार्यांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रबोधन पर्व साजरे करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना व त्यांचे प्रतिनिधी, नागरिक यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या…

Read More