वाकड-हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर वाकड-हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी हा नागरिकांसाठी गंभीर विषय ठरला आहे.काल वाकड-हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी संदर्भात पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका अधिकारी यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करून संभाव्य उपाययोजना ठरवल्या.



जाहीरनाम्यामध्ये वाहतूक व्यवस्थापनाबाबत आग्रही भूमिका घेणार असल्याचे नमूद केले होते. त्याच अनुषंगाने काल वाकड-हिंजवडी रस्त्यावरील , कस्तुरी चौक , काळा खडक चौक , विनोदे नगर , सोनेस्ट टॉवर चौक , श्रीराम चौक , भूमकर चौक येथे वाहतूक कोंडीची ‘बॉटल नेक’ परिस्थिती सोडविण्यासाठी नागरिकांसह , स्थानिक व्यापाऱ्यांशी संवाद साधत प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना सुचवल्या. शहराच्या वाहतुकीला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी मल्टिलेव्हल इल्हीवेटर ब्रिज आणि अंडरपास निर्माणाचे प्रस्ताव तयार करण्यात येतील असा विश्वास नागरिकांना दिला.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्ते रुंदीकरण, वाहतूक सिग्नल यंत्रणा सुधारणा आणि वाहतूक पोलिसांची तैनाती वाढविणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.काही महत्त्वाच्या रस्त्यांवर एकमार्गी वाहतूक यंत्रणा अमलात आणल्याने वाहतूक सुरळीत होईल तसेच योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे वाकड-हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी निश्चित सुटेल आणि आपल्या पिंपरी-चिंचवड शहराचा विकास अधिक वेगाने होईल. असा मला ठाम विश्वास आहे.
काल याप्रसंगी पोलीस उपायुक्त श्री.बांगर साहेब , सिटी इंजिनिअर श्री.निकम , पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्या प्रा.सौ.भारती विनोदे , श्री.एस.पी.पिंजण साहेब , श्री.सुर्यवंशी साहेब ,प्रदेश सदस्य श्री.संतोष कलाटे, मा.नगरसेवक श्री.संदीप कस्पटे, मंडल अध्यक्ष श्री.प्रसाद कस्पटे , श्री.राम वाकडकर , श्री.संकेत चोंधे , श्री.श्रीनिवास कलाटे , श्री.सुरज भुजबळ, श्री.सुदेश राजे, सौ.तेजस्विनीताई ढोमसे, श्री.प्रमोद भुजबळ यांच्यासह महापालिका अधिकारी, सोसायटीचे सदस्य अणि परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते.








