Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर येथील  (शनिवारी दि. ११) बासुरी बँक्वेट हॉल याठिकाणी शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन मार्फत परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आयुष्यमान भारत योजना नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी आरोग्य विमा या आरोग्य योजने मार्फत देण्यात येत असते तसेच प्रति कुटुंब ५ लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळेल. आयुष्मान भारत पीएम जन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  गुरुवारी पुणे भेटीवर आले असतांना पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी यांनी भोसरीचे आमदार  महेश लांडगे यांच्या सह मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली. व पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात औद्योगिक आस्थापनांना येणाऱ्या विविध समस्या विषयीचे निवेदन दिले. यावेळेस भोसरीचे आमदार  महेश लांडगे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष – संदीप बेलसरे, सचिव – जयंत कड, संचालक – संजय सातव, अतुल इनामदार, स्विकृत संचालक – रामदास जैद उपस्थित होते.  पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात औद्योगिक आस्थापनांना येणाऱ्या समस्या खालील प्रमाणे आहेत.   १. LBT नोटीशीबाबत.:-         पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना LBT ची बाकी…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने दिव्यांगांसाठी आयोजित केला जाणारा भारतातील पहिला उत्सव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने पर्पल जल्लोष –दिव्यांगांचा महाउत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा तीन दिवसीय महोत्सव चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शनी केंद्र येथे १७ , १८, १९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. भारतातील कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणारा हा दिव्यांगांसाठीचा पहिलाच भव्य उत्सव असून दिव्यांगांच्या कल्याणासाठी उचललेले एक अग्रगण्य पाऊल असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. पर्पल जल्लोष…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रोटरी क्लबच्या पहिले मराठी साहित्य संमेलनामध्ये जेष्ठ रोटरी साहित्यिक डॉ. अशोककुमार पगारिया यांचा साहित्य निर्मिती बद्दल विशेष सत्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिध्द कवी  अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा.मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला, प्रा डॉ अशोककुमार पगारिया यांची ‘ संघर्षयात्रेची यशवंत गाथा ” , हे आत्मचरित्र, जिंदगी जिंदादिली का नाम है,हे शेरोशायरी वरील पुस्तक, विचार वैभव,हे संतांच्या शिकवणुकीवरील पुस्तक, कथा कोरोनाची,लढा कोरोनाशी,हा कविता संग्रह तसेच याला जीवन ऐसे नाव,अशी साहित्य निर्मिती झाली आहे.

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, मंगल प्रवाह सोशल कॅम्पिनिंग आणि लोकजागर ॲक्टिव्हिटी यांच्या वतीने लहुवंदना पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे शौर्य, त्याग आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण करून देणारी लहुवंदना वर्तमान पिढीने समजावून घ्यावी, पाठ करावी अन् त्याद्वारे त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची प्रेरणा आणि सामाजिक क्रांतीची जाणीव निर्माण व्हावी हाच स्पर्धेचा उद्देश आहे. ही स्पर्धा वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन गटांत होईल. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी तसेच शाळाबाह्य विद्यार्थी आणि कार्यकर्ते स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. यासाठी बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक असून रविवार, दिनांक २६…

Read More

सांगवी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे गुरव येथे लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप ‘शक्तिस्थळ’ या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. या विशेष सोहळ्याचे आयोजन आज , शनिवार, ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मारुती मंदिराजवळ, पिंपळे गुरव गावठाण, पुणे येथे करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार व नागरी विमान वाहतूक खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष विजय उर्फ आप्पा रेणुसे यांच्यासह आमदार महेशदादा लांडगे, शंकर मांडेकर, अण्णा बनसोडे, उमाताई…

Read More

पिंपरी,, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सातत्याने नदीपात्रात राडाराडा टाकण्याचा आरोप होतो. मात्र, नदीपात्रालगतच्या मूळ मालकांना महापालिकेने अद्याप मोबदला दिलेला नाही. उलट या जागामालकांना त्रास देण्याचे काम महापालिका अधिकारी करीत आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय नदीसुधार प्रकल्प होऊ देणार नाही. प्रसंगी महापालिकेच्या विरोधात कोर्टात जाऊ, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. रावेत ते सांगवी दरम्यान पवना व मुळा नदीच्या दोन्ही बाजूंनी मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्यांचे स्वतःचे सातबारे आहेत. पिंपळे गुरवमधील सर्वे क्रमांक २ व ३४ मधील शेतकरी आजपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती करायचे. आजही काही शेतकरी शेती करीत आहेत. असे असतानाही महापालिकेने पुररेषेचे कारण दाखवत शेतकऱ्यांना…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवारपासून (१० जानेवारी) ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. दरवर्षीच्या १८ मार्च या कालावधीत होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा काही दिवस लवकर परीक्षा होणार आहे. कुलाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ३, डूडूळगाव येथील १ अनधिकृत पत्राशेड बांधकामावर अंदाजे ६१६८ चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि इ क्षेत्रीय धडक कारवाई पथकामार्फत ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांनी कार्यकारी अभियंता सुर्यकांत मोहिते, उपअभियंता राजेश जगताप, कनिष्ट अभियंता संदीप वैद्य यांच्या अधिपत्याखाली महापालिका अतिक्रमण धडक पथक, ३ बीट निरीक्षक, २३ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, १  पोलीस उपनिरीक्षक, ५ पुरुष पोलीस, ४ महिला पोलीस, ५ मजूर यांच्या उपस्थितीत २…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी -चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासनमान्य ‘ब’ वर्ग ग्रंथालयामधील हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय व श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय यांचे संयुक्त विद्यमाने १४ आणि १५ जानेवारी २०२५ रोजी चिंचवड येथील हुतात्मा चापेकर स्मारक येथे ग्रंथ प्रदर्शन व सामुहिक वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या या ग्रंथ प्रदर्शनामध्ये वाचकांना विनामुल्य वाचन साहित्य उपलब्ध असणार आहे. तसेच याठिकाणी विविध…

Read More