Author: maharashtrabreakingnews.com

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला गेले तडे;  तक्रारीची तात्काळ दखल घेऊन शिल्पाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करा – सचिन चिखले *मनसेचे शहराध्यक्ष  सचिन चिखले यांचा आंदोलनाचा इशारा* पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण ताजे असताना निगडी येथे असणारे “संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या ऐतिहासिक भेटीचे भक्ती शक्ती समूह शिल्पाला व त्याच्या चौथर्‍याला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातून महापुरुषांची विटंबना होत असून भविष्यात येथे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन लवकरात-लवकर शिल्पाची दुरुस्ती करण्यात यावी,…

Read More

एचपी मुंबई शक्ती क्लब, स्पॅन महिला अ‍ॅग्रो टुरिझम प्रकल्पातर्फे आदिवासी वाडीत मदत नवी मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नवी मुंबई, खारघर हिल येथील स्पॅन महिला अ‍ॅग्रो टुरिझम प्रकल्प संस्थापिका अनिसा शेख यांच्या संकल्पनेतून हिंदुस्तान पेट्रोलियम (एच. ए.) मुंबई शक्ती क्लब यांच्या वतीने फणसवाडी येथील आदिवासी वाडीत संस्थेच्या वतीने महिलांना साडी, घोंगडी, अल्प उपहार भेट देण्यात आले. आदिवासी माता, भगिनींशी चर्चा करून संगीत, नृत्य, खेळ अश्या खेळी मेळीच्या वातावरणात हा उपक्रम साजरा झाला. यावेळी एच. पी. मुंबई शक्ती क्लबच्या अध्यक्षा संगीता अडसूळ ,सचिव राजश्री सिन्हा, लता रमेश, मनीषा राऊत,हेतल परमार, मोहिता सिन्हा, अर्चना आवाडे व स्पॅन महिला अ‍ॅग्रो टुरिझम प्रकल्प…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी येथील क्रांतीवीर हेमु कलानी यांच्या ८२ व्या पुण्यतिथी निमित्त आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटन ,पिंपरी येथील योगा ग्रुप, भारतीय सिंधु सभा, हिंदू समाज पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिकारक हेमु कलानी यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी सिंधी समाजातील सामाजिक, प्रतिष्ठीत, व्यायारी, आणि महिला यांची उपस्थित होते. हेमु कलानी यांच्या जीवनावर आधारित माहीती देताना सांगितले की हेमु कलानी यांचा जन्म २३ मार्च १९२३ रोजी सिंध प्रांतातील शिकारपुर या गावात झाला जो भाग आज पाकिस्तानात आहे आणि २१ जानेवारी १९४३ ला या दिवशी त्यांना फाशी देण्यात आली म्हणून आजचा दिवस संपूर्ण…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –   पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०- ३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत सदनिकांच्या सोडतीसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागव‍िण्यात आले होते. याची सोडत दि. २२ जानेवारी २०२५ रोजी नियोजित होती. मात्र सोडतीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पीएमआरडीएच्या पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (1 बीएचके)   प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी (२ बीएचके)  प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्र. ३०- ३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (1 आरके) प्रवर्गातील ३४७ सदनिका व एलआयजी (१ BHK) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांची सोडतीसाठी दि. ११ ऑक्टोबर…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव दाभाडे – मावळ शाखेच्या वतीने मावळ तालुक्यासाठी पै. मोहन महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ साहित्यिक गो.नी. दांडेकर करंडक आंतर शालेय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा पहिली ते चौथी प्राथमिक गट व पाचवी ते दहावी माध्यमिक गट अशा दोन विभागात होणार असून, प्राथमिक विभागाच्या स्पर्धा ११ फेब्रुवारी रोजी व माध्यमिक विभागाच्या स्पर्धा १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत श्रीरंग कलानिकेतन सभागृह, वनश्री नगर, तळेगाव दाभाडे येथे होणार आहेत. तसेच या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता होईल. या स्पर्धांसाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील विविध भागात जलवाहिन्या व जलनिस्सारण वाहिन्या टाकणे तसेच दुरुस्ती करणे, पावसाळी पाण्याची लाईन टाकणे, विविध भागातील रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती व स्थापत्य विषयक कामे करणे अशा विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आज झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक २,६, १३,१७,१८,२५ मध्ये रस्त्याची देखभाल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- औद्यगिक क्षेत्रातील वाढत्या बदलामुळे कामगार संघटना मोडकळीस येऊन कामगारांचे उदयोगधंदे संकटात आले आहे. नोकरीवरच गदा येत असल्याने वेतन करार करताना अडचणी येत होत्या. कामगार कपात आणि वेतन कपातीच्या निर्णयामुळे कामगार देशोधडीला लागत आहेत. तशातच व्यवस्थापन आणि कामगार यात समन्वय साधून वेतन करार करून माथाडी कामगारांना आणि व्यवस्थापन यामध्ये मार्ग काढून त्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्नही महाराष्ट्र मजदुर संघटना करीत आहे. शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदुर संघटना आणि महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सल्लागार समिती सदस्य, तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या प्रयत्नातून पिंपरी चिंचवड शहरातील एका नामंकित कंपनीतील युनिट्समध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांना 5250 रुपयांची घसघशीत पगारवाढ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केल्यानंतर राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन निवडणूक आयुक्तांवर असणार आहे. दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. मंत्रिपरिषदेने नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार राज्यपालांची दिनेश वाघमारेंच्या नावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने वाघमारेंच्या नियुक्तीचा एक आदेश जाहीर करण्यात आला आहे. दिनेश वाघमारे हे पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक पिंपरी चिंचवड परिसरामध्ये झाले पाहिजे, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आज विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारकाचे भूमिपूजन येत्या ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झाले पाहिजे, या मागणीसाठी आंदोलनकर्ते राजेंद्र साळवे यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन ऐतिहासिक भीमसृष्टी स्मारक पिंपरी या ठिकाणी सुरू आहे. यावेळी त्यांना भेट देऊन त्यांच्याशी आमदार गोरखे यांनी संवाद साधला. समोरच मनपा आयुक्त आणि पीएमपीएल आयुक्त यांना तत्काळ जागा सर्वे करून घेण्यात यावे असे आदेश ही दिले… पिंपरी चौक या ठिकाणी स्मारक झाल्यास शहरातीलच…

Read More

अपघातांची संख्या कमी करण्यासाठी निगडीतील शाळेभोवती रस्त्यांची पुनर्रचना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थी सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांना उत्तम पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि शाळेचा परिसर सुरक्षित रहावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह यांचा संयुक्त उपक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने निगडी परिसरातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या शाळेच्या आजुबाजुचे सार्वजनिक रस्त्यांची पुनर्रचना करण्यासाठी सात दिवसांचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. २० जानेवारी २०२५ पासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध…

Read More