ताज्या घडामोडीपिंपरी
एचपी मुंबई शक्ती क्लब समाजकार्यात सदैव कटिबद्ध असणारी संस्था – जेष्ठ समाजसेविका अनिसा शेख


एचपी मुंबई शक्ती क्लब, स्पॅन महिला अॅग्रो टुरिझम प्रकल्पातर्फे आदिवासी वाडीत मदत
नवी मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नवी मुंबई, खारघर हिल येथील स्पॅन महिला अॅग्रो टुरिझम प्रकल्प संस्थापिका अनिसा शेख यांच्या संकल्पनेतून हिंदुस्तान पेट्रोलियम (एच. ए.) मुंबई शक्ती क्लब यांच्या वतीने फणसवाडी येथील आदिवासी वाडीत संस्थेच्या वतीने महिलांना साडी, घोंगडी, अल्प उपहार भेट देण्यात आले. आदिवासी माता, भगिनींशी चर्चा करून संगीत, नृत्य, खेळ अश्या खेळी मेळीच्या वातावरणात हा उपक्रम साजरा झाला.
यावेळी एच. पी. मुंबई शक्ती क्लबच्या अध्यक्षा संगीता अडसूळ ,सचिव राजश्री सिन्हा, लता रमेश, मनीषा राऊत,हेतल परमार, मोहिता सिन्हा, अर्चना आवाडे व स्पॅन महिला अॅग्रो टुरिझम प्रकल्प अनिसा शेख, कर्मचारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई ठिकाणी सुंदर हिरवेगार स्वर्ग पाहून निसर्गाच्या संवर्धनासाठी निसर्ग प्रेमी अनिसा शेख व सिडको विभागाचे कौतुक करून शक्ती क्लब च्या वतीने अनिसा शेख यांचा सन्मान, सत्कार करण्यात आला.
दरम्यान, एच. पी. ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि गॅस अशा महत्त्वपूर्ण उत्पादनामध्ये जगभरात नावाजलेली उद्योजक संस्था आहे. मुंबई शक्ती क्लब म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियममधील व्यवस्थापकीय विभागातील अधिकार्यांच्या पत्नींची संघटित सामाजिक कार्य करणारी महत्व पूर्ण संस्था आहे. एच. पी. परिवार नेहमी देश सेवा करत असताना समाजातील अंतिम टप्प्यापर्यंत शैक्षणिक, अध्यात्मिक, वैद्यकीय, शोषित, वंचित, गरीब, गरजू अशा विविध माध्यमातून सकारात्मक पद्धतीने सहकार्य करण्यासाठी समाजकार्यात सदैव कटिबद्ध असणारी ही संवेदनशील संस्कृती परंपरा जपत आहे.








