Author: maharashtrabreakingnews.com

इंद्रायणी महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -अभियांत्रिकी क्षेत्र हे झपाट्याने बदलत असून, एआय, डेटा मायनिंग अँड मशीन लर्निंग, सॉफ्ट कंप्यूटिंग, सिग्नल अँड इमेज प्रोसेसिंग या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. रोबोटीक क्षेत्राच्या माध्यमातून जग प्रचंड बदलत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात केल्यास मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांनी केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भिरूड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे होते. यावेळी संस्थेचे सदस्य संदीप…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हितासाठी लढणारे आणि आपल्या भाषणाने अख्ख्या महाराष्ट्राला स्फूर्ती मिळवून देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि १९२१ साली इंग्लंडला जाऊन भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन इंग्रजांनी दिलेली संधी नाकारून इंग्रजांची चाकरी करण्यास नकार देऊन गांधीजींच्या इंग्रज सरकारच्या विरोधातील असहकार आंदोलन चालवले असे सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज विनम्र अभिवादन करत त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते , उपाध्यक्ष राजेश माने, संघटक निरंजन लोखंडे, विनोद गवई,मनपा सदस्य किरण साडेकर, सलीम डांगे, अनिता मोरे, विजया पाटील, रंजना काळे, अनिता जावळे, निखिल मोरे, हेमंत जाधव आदी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  आज जिथे एकीकडे देश आणि समाज संकीर्णता आणि संकुचित वृत्तीच्या भिंतींमध्ये अडकला आहे, तिथे दुसरीकडे संत निरंकारी मिशन या भिंती तोडून अमर्याद विस्ताराच्या दिशेने प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे. सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पवित्र सान्निध्यात महाराष्ट्राचा ५८ वा वार्षिक निरंकारी संत समागम २४ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित केला आहे. यामध्ये “विस्तार – अनंताच्या दिशेने” या विषयावर आध्यात्मिक विचारधारेचे दिव्य रूप सजणार आहे. सुमारे ३०० एकर च्या विस्तीर्ण क्षेत्रावर साजरा होणाऱ्या या भक्तीमय महायज्ञात देश-विदेशातील लाखो श्रद्धाळू, भक्त आणि मान्यवर सहभागी होतील. त्याचबरोबर निरंकारी संत समागम चे थेट प्रसारण मिशनच्या…

Read More

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दुर्गादेवी टेकडी निगडी प्राधिकरण या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे,माजी आमदार जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार उपजिल्हाप्रमुख दस्तगीर मणियार, युवा सेना प्रमुख चेतन पवार,शहर उपाध्यक्ष हरीश आबा नखाते, महिला उपशहर संघटिका वैभवी घोडके, चिंचवड विधानसभा संघटक संदीप भालके आकुर्डी विभाग प्रमुख गोविंदराव शिंदे, निगडी विभाग प्रमुख सतीश मरळ, युवा सेना उपशहर प्रमुख प्रवीण पाटील, युवा नेते संतोष सौंदणकर,प्रकाश देशमुख, निवास शिंदे, जगदीश पाटील,कृष्णा माने, आदी उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन युवासेना …

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘माझ्या भारतासाठी युवक आणि डिजिटल साक्षरतेसाठी युवक’ या ब्रीद वाक्याला अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर कोहिनकरवाडी तालुका खेड येथे संपन्न होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक व्यवहार हा प्रत्येक व्यक्तीला डिजिटल माध्यमातून करता आला पाहिजे, मग ते वाचन असो, एखादे तिकीट बुक करणे असो अथवा एखादा आर्थिक व्यवहार करणे असो. फक्त युवकांनी स्वतः पुरते डिजिटल ज्ञान अवगत करून थांबू नये तर समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या परीने डिजिटल- संगणक साक्षरता शिकवावी म्हणून ‘राष्ट्रीय सेवा योजना :…

Read More

राज्यस्तरीय गदिमा कवितामहोत्सव संपन्न पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  “गदिमा हे शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारे प्रतिभावंत होते. असा एकही विषय अथवा रस नाही की जो गदिमांच्या कवितेत नाही!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ यांनी  चिखली येथे व्यक्त केले . महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, आशिया मानवशक्ती विकास संस्था आणि गणेश इंटरनॅशनल स्कूल यांनी आयोजित केलेल्या ३२ व्या राज्यस्तरीय गदिमा कवितामहोत्सवात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. विठ्ठल वाघ बोलत होते. गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ कविवर्य अशोक नायगावकर यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )– कार्यालयांमध्ये महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ बद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे, तसेच त्यांचे हक्क आणि त्यांच्यावर अन्याय झाला असल्यास योग्य न्याय मिळवून देऊन अनुकूल वातावरण निर्माण करून देण्यासाठी प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ अस्तित्वात आला आहे. या अधिनियमातील कलम ४ नुसार महानगरपालिकेच्या विविध विभागांअंतर्गत महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तसेच महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची स्थापना देखील करण्यात आलेली आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मागील पंधरा वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये डिझाईन क्षेत्रात नावलौकिक कमावलेल्या व्हिनस आर्ट फाउंडेशनच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ, दिशा सोशल फाउंडेशन यांच्या सहयोगाने “पीसीएमसी डिझाईन एज्युकेशन फेअर २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन चिंचवड, ऑटो क्लस्टर येथे शुक्रवारी (दि.२४ जानेवारी) सकाळी ११ वाजता, तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी आमदार शंकर जगताप, महेशदादा लांडगे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती जगन्नाथ उर्फ नाना शिवले, माजी…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आयुक्तपशुसंवर्धन,जिल्हा.पशुसंवर्धन सर्वाचिकित्सलय औंध यांच्या वतीने   सहाय्यक डॉ.बाळासाहेब गायकवाड  चंद्रभागा गोशाळा गोसंवर्धन संस्था ट्रस्ट चिखली,भोसरी या संस्थेच्या वतीने चालणाऱ्या गोसंवर्धन कामाला पत्र देऊन सन्मानित करण्यात आले व अनुभव दाखला देण्यात आला पिंपरी चिंचवड  शहरात सर्वात अग्रेसर असणारी व गाई वाचली पाहिजे तिचे रक्षण झाले पाहिजे या साठी प्रचार प्रसार करण्याचे काम गोसेवक रामकृष्ण लांडगे हे अनेक वर्षे करत आहेत त्यांनी अनेक गाई सांभाळून देशी गोंवश सभाळण्याचे काम केले आहे त्यामुळे त्यांना सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग पुणे यांच्या हस्ते पत्र देऊन सन्मानित करण्यात आले

Read More

– पुणे जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनासाठी निधीला मंजुरी – भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मौजे तळवडे येथे त्रिवेणीनगर चौक येथील 90 मीटर रुंद रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2008 पासून या रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी प्रलंबित होते. अखेर भूमिसंपादनासाठी 15 कोटी 43 लाख 42 हजार 984 रुपयांना जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेला ‘बुस्टर’ मिळाला आहे. निगडी-भोसरी स्पाईन रस्त्याला अडथळा ठरणारी त्रिवेणीनगर चौकातील बांधकामे हटवण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील होते. मात्र, भूसंपादन आणि रस्ता बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली…

Read More