ताज्या घडामोडीपिंपरी

अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी – डॉ. सुनील भिरूड

Spread the love

 

इंद्रायणी महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -अभियांत्रिकी क्षेत्र हे झपाट्याने बदलत असून, एआय, डेटा मायनिंग अँड मशीन लर्निंग, सॉफ्ट कंप्यूटिंग, सिग्नल अँड इमेज प्रोसेसिंग या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. रोबोटीक क्षेत्राच्या माध्यमातून जग प्रचंड बदलत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात केल्यास मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांनी केले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भिरूड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे होते. यावेळी संस्थेचे सदस्य संदीप काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा. उत्तम खाडे, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
भिरूड म्हणाले, की तंत्रज्ञान माणसाला नवीन दिशा देणारे असते. त्यात नवीन शैक्षणिक धोरणाने भर घातल्यामुळे आणि तंत्रज्ञानाला ए आय ची जोड मिळाल्याने भविष्यातील तंत्रज्ञान हे विचाराच्या पलीकडे असेल. जीवनाच्या परिवर्तनाचा मार्ग हा अभियांत्रिकी शिक्षणातून जात आहे. इंद्रायणी महाविद्यालयाने इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू करून आपल्या नावलौकिकात भर घातल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. समृद्ध महाविद्यालयाच्या परंपरेत इंद्रायणी महाविद्यालयाचे नाव उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रकांत शेटे यांनी मावळ तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने आम्ही प्रयत्नशील होतो. पुढच्या वर्षी इंद्रायणी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होत असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.

प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या नावलौकिकात भर पडेल असेच विद्यार्थी महाविद्यालयामध्ये घडवले जात असल्याची भावना व्यक्त करून नुकत्याच पार पडलेल्या खो-खो स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रियंका इंगळे या माजी विद्यार्थिनीने केलेल्या दैदीप्यमान कामगिरीचे वर्णन करत बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या शासनाच्या अभिनव उपक्रमांतर्गत ‘पुस्तक परीक्षण’च्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही यावेळी करण्यात आला. महाविद्यालयाने घेतलेल्या पुस्तक वाचन स्पर्धेत सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाहक चंद्रकांत शेटे यांनी बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षिका दीप्ती कन्हेरीकर व विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन, तर उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button