Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मनुष्य रुपात जन्म प्राप्त केल्यानंतर मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख होय असे उद्‌गार सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाध्या शुभारंभ प्रसंगी मानवतेच्या प्रति संदेश देताना व्यक्त केले. या तीन दिवसीय संत समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जनांनी भाग घेतला आहे. सतगुरु माताजी यांनी पुढे सांगितले, की विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे सांसारिक उपलब्धिच्या बाबतीत मानवाने खूपच प्रगती आणि विस्तार केला आहे. जेव्हा सद्‌बुद्धीने युक्त होऊन या उपलब्धिचा वापर केला जातो तेव्हा तो निश्चितच मानवासाठी शांतीसुखाचे कारण बनतो. परंतु जर यांचा…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार सुनील शेळके यांनी वडगाव शहरात जनसंवाद यात्रेनिमित्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या .वडगाव शहरातील विशाल लॉन्स, मोरया कॉलनी, साई श्रुष्टी, पंचमुखी चौक, केशवनगर, मोरया चौक, बाजार पेठ, आंबेडकर कॉलनी, माळीनगर, दिग्विजय कॉलनी, संस्कृती सोसायटी, टेल्को कॉलनी, इंद्रायणीनगर, मिलिंदनगर, कातवी गाव या भागात प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांच्या आढाव्यासह इतर प्रश्नांबाबत प्रशासनास सूचना यावेळी देण्यात आल्या. रस्ते, गटार, विद्युत व पाण्यासह कचऱ्याच्या प्रश्नाबाबत वडगाव नगरपंचायतीस देखील यावेळी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे वडगाव शहरातील मोकळ्या जागांचे सर्वे करून तेथे विकासात्मक कोणते प्रकल्प राबविता येईल याबाबत अहवाल तयार करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले .शहरातील वाढती…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती नाट्यविधाच्या वतीने आयोजित नाट्याभिवाचन अभियानाला उदंड प्रतिसाद मिळाला. साहित्यिक ,व्याख्याते राजेंद्र घावटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.उद्योजक अभय पोकर्णा, कवयित्री मीना पोकर्णा, संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र आमले, प्रफुल्ल भिष्णूरकर, सचिव लीना आढाव, प्रचिती भिष्णूरकर आणि अनेक नाट्यरसिक या प्रसंगी उपस्थित होते. नाट्यविधा संयोजक संजय चांदगुडे यांनी “धुम्रवर्ण मम्मीपप्पा व रिंकी” या लघुकथेचे अभिवाचन केले. मनोज कोल्हटकर लिखित व संजय चांदगुडे दिग्दर्शित *अथांग* या नाटकाच्या एका प्रवेशाचे अभिवाचन सौ.सुनिता बोडस, मंदार फाकटकर आणि सारंग चिंचणीकर यांनी केले. उत्तम अभिवाचन करून सर्व कलाकारांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवत मंत्रमुग्ध केले. राजेंद्र घावटे…

Read More

बाळासाहेबांची हिंदुत्वाची ज्योत आजही सर्वांना प्रकाशमान करतेय – माजी आमदार गौतम चाबुकस्वार हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहरात उत्साहात साजरी चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा आजही सबंध हिंदुस्थानात आदर्शवादी ठरत आहे. त्यांनी लावलेली हिंदुत्वाची ज्योत आजही सर्वांना प्रकाशमान करत आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणाला अनुसरून आजही अनेक शिवसैनिक तेवढ्याच निष्ठेने आणि तळमळतेने समाजासाठी झटत आहे, असं प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मा. आमदार अॅड गौतम चाबुकस्वार यांनी केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 99 वी जयंती पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात साजरी झाली. त्यावेळी शिवसैनिकांनी मार्गदर्शन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या फार्मा व्हिजनरी क्लब आणि स्कूल ऑफ मॅनेजमेंटने रेड प्लस ब्लड बँकेच्या सहकार्याने एक महत्त्वपूर्ण रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिराचे उदघाटन  कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले की, रक्तदानाच्या वाढत्या गरजेवर भर दिला आणि रक्तदात्यांनी दाखवलेल्या परोपकारी भावनेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांपैकी आकाश कुंभार आणि श्रेया वरुटे यांनी पहिले रक्तदान केले आणि 202 स्वयंसेवकांना प्रेरित केले, ज्यामुळे 192 युनिट रक्ताचा संग्रह झाला. या कार्यक्रमाचे कुशल आयोजन स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्रमुख डॉ. अमित पाटील आणि सहायक प्राध्यापक प्रुथा सांबरे यांनी केले. त्यांना प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही टीमने पूर्ण…

Read More

फेरीवाल्यांवर अन्याय थांबवा अधिक तीव्र आंदोलन करू: आशा कांबळे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहर विकासात फेरीवाल्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करण्याचा अधिकार घटनेने त्यांना प्रदान केलेला आहे. हातावर पोट असलेले फेरीवाले सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांच्यावर व्यवसाय न करण्यासाठी महापालिका प्रशासन अनेक बंधने लादत आहे. बळजबरीने कारवाई करत आहे. ती कारवाई थांबवावी. तसेच रखडलेले अन्य प्रश्न त्वरित मार्गी लावावे. अन्यथा फेरीवाल्यांना सोबत घेऊन महापालिका प्रशासनाला आगामी काळात धडा शिकवू, पिंपरी चिंचवड येथील सर्व टपरी पथारी हातगाडी धारक फळभाजी विक्रेते यांना एकत्र करून आंदोलन अधिाक तीव्र करू असा इशारा पिंपरी चिंचवड महानगरपालिका फेरीवाले समिती सदस्य सौ आशा…

Read More

वाचन संस्कृतीचा विद्यार्थ्यांनी केला जागर : पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांचा उत्साहाने सहभाग चाळकवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुबंई पुरस्कृत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे आणि शिवांजली साहित्यपीठ, शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान, चाळकवाडी (ता. जुन्नर) आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची ग्रंथदिंडीने दिमाखदार सुरुवात झाली. चाळकवाडी लगतच्या महामार्गापासून सुरू झालेली ग्रंथदिंडी गावातून फिरून कविवर्य ग. ह. पाटील बालसाहित्य नगरीत (संमेलनस्थळी) आली. महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ‌‘ज्ञानदेव-तुकाराम‌’ नामाचा गजर करत ग्रंथदिंडीतील विद्यार्थ्यांनी ‌‘वाचन संस्कृती घरोघरी, तिथे फुले ज्ञानपंढरी‌’, ‌‘ग्रंथ हेच गुरू‌’, ‌‘जिथे दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक‌’, ‌‘ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- ‘’आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’’ अशी शपथ अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस संपुर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. महानगरपालिकेच्या वतीने देखील २५ जानेवारी रोजी कार्यालयीन सुट्टी असल्याने शासन निर्णयानुसार पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत आज राष्ट्रीय मतदार दिवस…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपळे सौदागर येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे सांगवी पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने सुधारीत भारतीय दंड संहिता कायदा मार्गदर्शन आणि सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी नागरिकांना सुधारित कायदे आणि सायबर सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमाबद्दल माहिती देताना , उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले , “आयपीसी, सीआरपीसी व भारतीय पुरावा कायदा या तीन कायद्यांच्या बदली आता भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवीन कायदे १…

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – निगडी प्रभाग क्रमांक 13 निगडी गाव या प्रभागात सर्व नागरिकांच्या मागणीनुसार भुयारी मार्ग करण्यात आला परंतु भुयारी मार्ग झाल्यानंतर याच भुयारी मार्गात रात्री अपरात्री गांजाडी व दारू पिणाऱ्या लोकांनी दारूचा अड्डा बनवला होता त्यामुळे असंख्य महिला व लहान मुले यांना हा त्रास सहन करावा लागत होता. या भुयारी मार्गामध्ये दारू पिणारी लोक लघवी सुद्धा करत होते त्यामुळे घाणेरडा वास , त्याचप्रमाणे दारूच्या बाटल्या गुटखा खाणारी लोक त्यांचा त्रास वाढत होता , महिला वर्गाची सतत मागणी होती एवढा छान भुयारी मार्ग झाल्यानंतर या लोकांमुळे आम्हाला त्रास होत आहे तुम्ही यावर काहीतरी उपाययोजना करा आज महानगरपालिकेच्या…

Read More