पिंपरी चिंचवड महानगरपालिका काबीज करण्यास शिवसैनिक सज्ज – संतोष सौंदणकर
हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहरात उत्साहात साजरी


बाळासाहेबांची हिंदुत्वाची ज्योत आजही सर्वांना प्रकाशमान करतेय – माजी आमदार गौतम चाबुकस्वार



हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहरात उत्साहात साजरी

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा आजही सबंध हिंदुस्थानात आदर्शवादी ठरत आहे. त्यांनी लावलेली हिंदुत्वाची ज्योत आजही सर्वांना प्रकाशमान करत आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणाला अनुसरून आजही अनेक शिवसैनिक तेवढ्याच निष्ठेने आणि तळमळतेने समाजासाठी झटत आहे, असं प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मा. आमदार अॅड गौतम चाबुकस्वार यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 99 वी जयंती पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात साजरी झाली. त्यावेळी शिवसैनिकांनी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सर्वप्रथम आकुर्डीतील शिवसेना भवन आणि चिंचवडगाव येथील वेताळनगर शाखा कार्यालयात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर, उपजिल्हाप्रमुख दस्तगीर मनीयार, चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश नखाते, विभागप्रमुख संदीप भालके, विधानसभा महिला संघटिका योगिनी मोहन, वैशाली कुलथे, उपशहर संघटिका सुषमा शेलार, उपविभाग संघटिका तस्लिम शेख, शाखाप्रमुख मजीद शेख, रफिक बेग, उपविभाग प्रमुख कुदरत खान, उपशाखाप्रमुख किशोर सातपुते, मुस्तफा शेख, रमेश शेंडगे, महेश शेत संधी, कार्यकर्ते संतोष शिंदे, बाळासाहेब आगळे, सुनील बोराडे, अनिल बोराडे, विशाल आरसूळ, राकेश कोळी, राजू मासाळकर आदी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील बाळासाहेबांच्या विचारांना जागणारा शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. या ताकतीच्या जोरावरच आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका काबीज करण्याचा आमचा मनसुबा आहे. त्यासाठी आम्ही सज्जही आहोत, असा संकल्प शहरातील समस्त शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी केला आहे.
जयंतीनिमित्त चिंचवडगावातील वेताळनगर शाखेच्या वतीने आरोग्यदायी संकल्प राबविण्यात आला. परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्त, हिमोग्लोबिन, डायबेटिस आणि विविध आजारांवरील आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरिकांना विविध आजारांवरील औषध आणि गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. हे शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि तिरुमुनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.








