Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  गिलियन बेरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खाजगी आरओ प्लांट्सची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आढळून आलेल्या अशा १० आरओ प्लांटवर आज महापालिकेने कारवाई केली असून संबंधित चालकांना प्लांट तात्काळ बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती माहिती आयुक्त शेखर यांनी दिली. गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) प्रादुर्भाव व वाढत्या सार्वजनिक आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने खाजगी आरओ प्लांट्सच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये अनधिकृत खाजगी आरो वॉटर ऑपरेटर्स दूषित पाणी वापरून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिल्लीतील जनतेने लोकसभेप्रमाणेच भारतीय जनता पार्टी व मोदींवर विश्वास ठेवून एकतर्फी कौल दिला असून केजरीवाल यांच्या सत्तेला हादरा दिला आहे. दिल्ली मधील  प्रदूषणापासून ते पाणीपुरवठ्यापर्यंतचे अनेक प्रश्न केजरीवाल सरकारला हाताळता आलेले नाहीत, त्याचबरोबर अनेक विकासाची कामेही त्यांनी रखडवलेली जनतेने पाहिली आहेतत्यांनी जनतेला दिलेली अनेक आश्वासन ही आश्वासनच राहिली मात्र ते भ्रष्टाचारात स्वतः गुरफटले गेले असल्याने जनतेने हा कौल दिलेला आहे. हा विजय जनतेचा आहे, पंतप्रधान मोदी वर दाखवलेल्या विश्वासाचा आहे

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक महा विजय मिळाला आहे. त्यामुळे 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीतील या विजयाचा भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. भाजपा मध्यवर्ती कार्यालय, मोरवाडी येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आतषबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिल्लीकर जनतेने भाजपला दिलेला हा ऐतिहासिक विजय असल्याची दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी, भाजपा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस शितल शिंदे, अजय पाताडे, संजय मंगोडेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल आयोजित “पीडीसीसी” च्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत नऊ आणि अकरा वर्षाखालील मुलींच्या गटात पिंपळे सौदागरची कन्या “शालवी चासकरने” प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल पिंपरी चिंचवड भाजपा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ट्रॉफी देऊन सन्मानित केले. यावेळी  शत्रुघ्न काटे यांनी सांगितले कि,पिंपळे सौदागर मधील लहान मुले तसेच युवा वर्ग क्रीडा प्रकारात करत असलेली प्रगती हि एक खूप समाधानाची बाब आहे आणि त्यांचा खेळाडू वृत्तीला अजून चालना देण्यासाठी एक लोकसेवक या नात्याने सदैव प्रयत्नशील राहणार आहे तसेच प्रभागातील विविध खेळात पारंगत असलेल्या खेळाडूंना एक सकारात्मक दृष्टीने पुढील वाटचाल सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने पुढाकार घेणार…

Read More

रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  रहाटणीतील तिरंगा क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित गौरी सजावट, महिलांची संगीत खुर्ची, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, रनिंग, डान्स स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. स्व. भरत (अप्पा) कोकणे सांस्कृतिक मैदान यशवंतनगर रहाटनी येथील सिंहगड, राजगड, सज्जनगड कॉलनीमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, शिवाजी विद्यालय निलंगाचे प्राचार्य ॲड. दिलीप सातपुते, डॉ. नंदकुमार धुमाळ, राजश्री सावंत, शांताताई कोकणे, माजी नगरसेवक गोपाळ माळेकर, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके आदी  उपस्थित होते. यावेळी बोलताना अरुण पवार म्हणाले, तिरंगा मित्र मंडळ हे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नावारूपाला आलेले मंडळ…

Read More

दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी, गाथा पारायण, कीर्तन आदी कार्यक्रम देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  वारकरी संप्रदायात अनन्य  साधारण महत्त्व असलेला आणि एक मोठी परंपरा लाभलेला  जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिवस असलेला अर्थात माघ शुद्ध दशमीचा सोहळा आज श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने डोंगरावर दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. माघ शुद्ध दशमी हा  जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा अनुग्रह दिवस म्हणून ओळखला जातो.तो हा साक्षात्कार दिन होय. तुकोबा  स्नानाला जात असताना वाटेत सदगुरुरायांनी त्यांना गाठले, मस्तकी हात ठेवत भोजनासाठी पावशेर तुप मागितले. सदगुरुरायांनी राघवचैतन्य, केशवचैतन्य ही गुरुपरंपरा सांगत स्वतःचे नाव बाबाजी सांगत संत तुकोबारायांना…

Read More

– अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा पुढाकार – यंदा सिनेकलावंतांसोबत रंगणार खिल्लार रॅम्पवॉक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथे दि. 1 आणि 2 मार्च 2025रोजी देशी गोवंश तसेच अश्व प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून कोसा, काजळी, देवनी, खिल्लार, लाल कंधारी, साहिवाल, लाल सिंधी, गीर, ओंगोले, वेचूर अशा विविध प्रकारातील गोवंशासाठी प्रजातिनिहाय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनाच्या निमित्ताने सिने कलावंतांसह खिलार रॅम्प ऑफ देखील आयोजित करण्यात आला आहे. तसेच, पशु प्रेमींसाठी प्रदर्शनस्थळी जनावरांची खरेदी-विक्री बाजार देखील भरविण्यात येणार आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत नेहमीच तत्पर असते. शहरातील नागरिकांना स्वच्छ्तेची सवय व्हावी म्हणून महापालिकेचाआरोग्य विभाग कायम जनजागृती मोहीम राबवत असतो. कचरामुक्त पिंपरी चिंचवड शहरासाठी महापालिकेच्या वतीने घरगुती कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया केली जाते. तरीदेखील काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मोठया प्रमाणावर कचरा टाकत आहेत. यामुळे शहराचे सौंदर्य तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अशा नागरिकांना कारवाई करण्याचा इशारा देऊन ही त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी वारंवार कचरा टाकला जात असल्याने निदर्शनास येताच धडक मोहिमेंतर्गत बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वजनिक ठिकाणाचे आरोग्य दूषित केल्याप्रकरणी आरोग्य विभागामार्फत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आली. या कारवाईतून…

Read More

राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात माता रमाई आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन आज  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने पक्ष कार्यालयात माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने शहराध्यक्ष  योगेश बहल यांच्या मार्गदर्शनात महिला अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट व शहर कार्याध्यक्ष फजल शेख आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट म्हणाल्या की, आज त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आहे. माता रमाई आंबेडकर हे नाव आता एका व्यक्तीचे उरले नसून ते नाव आता समाजाची एक असीम अशी चेतना बनली आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Read More

आरोग्य सेवा मजबूत करण्यावर सरकारचा भर – अजित पवार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आधुनिक तंत्रज्ञानातील रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आरोग्य सेवेसाठी उपयुक्त आहे. योग्य निदान होऊन अनेक गंभीर आजारांवर, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करता येतात. रोबोटिक्स तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अचूक वापरामुळे रुग्णाला जीवदान मिळते. महाराष्ट्र शासन जवळपास तेराशे आरोग्यसेवा नागरिकांना देत आहे; तर केंद्र सरकारच्या १८०० आरोग्य सेवा दिल्या जातात. केंद्राप्रमाणेच अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे. या सेवा देण्यामध्ये खाजगी रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. धनश्री हॉस्पिटलने या सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. डॉ. पटवर्धन यांनी मोशी…

Read More