Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकाराम महाराज जयंतीचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघ या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नवीन समर्थ विद्यालयात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ या संकल्पनेतून वृक्षदान व वृक्षरोपण करण्यात आले. तसेच भंडारा डोंगरावरील झाडांना टँकरद्वारे पाणी घालून जीवनदान दिले. मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा समितीचे अध्यक्ष महेशभाई शहा, गोपाळे गुरुजी, प्राचार्या वासंती काळोखे, पर्यवेक्षक शरद जांभळे, मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी किशोर आटरगेकर, मालोजी भालके, बळीराम माळी यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात आवळा, जांभूळ, सीताफळ,…

Read More

प्रा.अप्पासाहेब खोतांच्या कथाकथनाने रसिकांच्या एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्या डोळ्यात आसू..! तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आई-वडील, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण या नात्यांमध्ये वितुष्ट यायला लागले आहे. ही नाती जपली जाऊन मने जुळली पाहिजेत, असे सांगतानाच ‘कोंबडी’ कथेने रसिकांमध्ये हास्यकल्लोळ, तर ‘महापूर’ कथा रसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेली. एकप्रकारे एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू, असे चित्र तळेगावकर रसिकांमध्ये पाहायला मिळाले. निमित्त होते, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अप्पासाहेब खोत यांच्या कथाकथन कार्यक्रमाचे. तळेगाव दाभाडे येथील हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या २७व्या वर्धापनदिनानिमित्त कै. अॅड. विश्वनाथराव दाभाडे स्मृती हिंदमाता व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफत प्रा. खोत यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या व्याख्यानमालेचे उद्घाटन…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज च्या वतीने महाविद्यालयात ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष जाहीर केल्या प्रित्यर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) सर्वांसाठी यात कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट्स कसे काम करते ,त्याच्या प्रभावी वापर कसा करता येईल यासाठी फेसबुक व युटूबवर थेट प्रक्षेपणाद्वारे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे संस्थापक सचिव डॉ़. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले . कृत्रिम बुद्धिमत्तेचे तज्ञ व व्याख्याते नाशिक येथील प्रा. किरणकुमार जोहरे यांच्या हस्ते रिमोट द्वारे विद्युत दीप प्रज्वलना द्वारे एकदिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन करण्यात आले .याप्रसंगी…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाला रोइंग या क्रीडा प्रकारासाठी प्रतिभावान खेळाडूंचा (मुले व मुली) शोध घेणे व त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) कडून खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र (निवासी) म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. अशाप्रकारे, क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘साई’ची मान्यता मिळणारे एमआयटी एडीटी विद्यापीठ हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठातील क्रीडा संकुल हे जागतिक सोईसुविधांनी सुसज्ज आहे. विद्यापीठातील डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी स्पोर्ट्स अकादमीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांकडून रोइंग, बॉक्सिंग व जलतरण या खेळांसाठी अकादमीची स्थापना करत खेळाडूंना प्रशिक्षणाचे काम केले जाते. त्याच्या परिणामतः रोइंग अकादमीतील खेळाडूंनी आजवर राष्ट्रीय…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2025 बारावी परीक्षा आजपासून 11 फेब्रुवारी सुरू होत आहे. यंदा परीक्षा नियोजित वेळेपेक्षा 10 दिवस आधी सुरू होत असून निकालही लवकर जाहीर करण्याचा मानस आहे. 15 मेपर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. राज्यात 9 विभागीय मंडळांत परीक्षा, 3376 केंद्रांवर आयोजन राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांत परीक्षा घेतली जाणार आहे. 3373 मुख्य परीक्षा केंद्रे आणि 3376 परीक्षा उपकेंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. विद्यार्थ्यांची…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गिलियन बेरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खाजगी आरओ तसेच एटीएम वॉटर प्लांट्सची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आढळून आलेल्या आज अशा सात आरओ आणि वीस एटीएम वॉटर प्लांटसवर महापालिकेने कारवाई केली असून संबंधित चालकांना प्लांट तात्काळ बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली.

Read More

राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीला उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा राजकीय प्रवास नेहमीच प्रेरणादायी राहील – शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘सामान्य कार्यकर्ता ते लोकांचा लोकनाथ’ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवास माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना जनसेवेची प्रेरणा देतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मुशीत तयार होण्याचं भाग्य या रत्नास लाभल. या परीसाच्या सहवासात अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्ते घडले. असंख्य कार्यकर्त्यांना मोठी पद देऊन त्यांनी त्यांचा सन्मानही केला. मी सुद्धा एक सामान्य कामगार नेता होतो. मला शिंदे साहेबांनी उपनेता बनवलं. ही माझ्या कामाची पावती आहे, अशी भावना कामगार नेते तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांनी व्यक्त…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथील कुदळवाडी भागात आज सलग तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण कारवाई करण्यात आली. ७७ एकर क्षेत्रामध्ये झालेल्या या कारवाईदरम्यान आज एकूण ६८२ बांधकामे निष्कासित करण्यात आली. शहरातील नियोजित विकास आरक्षणे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या जागेवरील अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून यापुढेही ती चालू राहणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि क्षेत्रीय धडक कारवाई पथकांमार्फत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये आज ३३ लाख ५८ हजार १३० चौरस फूट बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ६८२ बांधकामांचा समावेश होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सेवा संप्रदाय, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने चिंचवड गावातील काशीधाम मंगल कार्यालयात गोंदवलेकर महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी ते रविवार दिनांक 9 फेब्रुवारी या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. पहिल्या दिवशी श्री महाराजांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली व श्रींची प्रतिष्ठापना केली. या उत्सवात श्रीपाद बुवा अभ्यंकर, विलास बुवा गरवारे, चिन्मय बुवा देशपांडे, व श्रेयस बडवे यांची कीर्तन सेवा झाली तसेच मोहन बुवा रामदासी, चंद्रशेखर निलाखे, सोना बुवा रामदासी, यांची प्रवचने झाली. काकड आरती पंचपदी यासह दररोज सामुदायिक नामजप करण्यात येत होता. संगीत स्वरालय, गजानन महिला भजनी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील अनधिकृत रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट्समुळे वाढत्या हवा आणि ध्वनी प्रदूषणाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पर्यावरण विभागाची परवानगी न घेता हे प्लांट सुरू असल्याने श्वसनाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, चिंचवड मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन अशा अनधिकृत प्लांट्सवर तातडीने कारवाई करण्याची आणि ते त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. चिंचवड मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू असून, बांधकामांसाठी रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट्स वापरले जात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर,…

Read More