उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांच शक्तीप्रदर्शन पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भगवा फडकवण्याचा संकल्प


राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीला उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा राजकीय प्रवास नेहमीच प्रेरणादायी राहील – शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद



पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘सामान्य कार्यकर्ता ते लोकांचा लोकनाथ’ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवास माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना जनसेवेची प्रेरणा देतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मुशीत तयार होण्याचं भाग्य या रत्नास लाभल. या परीसाच्या सहवासात अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्ते घडले. असंख्य कार्यकर्त्यांना मोठी पद देऊन त्यांनी त्यांचा सन्मानही केला. मी सुद्धा एक सामान्य कामगार नेता होतो. मला शिंदे साहेबांनी उपनेता बनवलं. ही माझ्या कामाची पावती आहे, अशी भावना कामगार नेते तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांनी व्यक्त केली.

राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभा मतदारसंघात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना इरफानभाई सय्यद बोलत होते. दरम्यान कार्यकर्त्यांनी आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भगवा फडकवण्याचा संकल्पही यावेळी केला.
कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख भगवानशेठ पोखरकर, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे,भोसरी विधानसभा प्रमुख संभाजी शिरसाट, युवासेना उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड, महिला संघटीका मनिषा परांडे,संदिप जाधव,संकेत चावरे,दत्ता औराळे,नुर शेख,आशिष गौंड,रोहीत जगताप,नागेश हनवटे,समर्थ नायकवडे,अमित पासलकर,बबन काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व शिवसेना अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना इरफानभाई म्हणाले, मुख्यमंत्रीपदी विराजमान असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यात विशेष लोकप्रिय झाली ती ‘लाडकी बहिण योजना’. या योजनेमुळे कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि घरातील बहिणींचे ते आज लाडके भाऊ झालेत. मोठ्या पदावर राहुन देखील त्यांच्यातील एका सामान्य कार्यकर्त्याने नेहमीच जनसेवकाची भुमिका पार पाडली. राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीला त्यांचा राजकीय प्रवास नेहमीच प्रेरणादायी राहील.
दरम्यान वाढदिवसानिमित्त श्रेयश ऑप्टिशियन्सच्या सहकार्यातुन शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रूपीनगर येथील नवमहाराष्ट्र विद्यालय, प्रबोधनकार ठाकरे शाळा, अजंठानगरची माता रमाबाई भीमराव आंबेडकर प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. दिघी येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी, गोळ्या-औषधांचे वाटप, कृत्रिम अवयव, मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आळंदी शहरात महिलांना परंपरा आणि एकतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.








