Author: maharashtrabreakingnews.com

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वारगेट एसटी स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. स्वारगेट डेपो घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. ह्या अनुषंगाने आजच्या बैठकीत त्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून येथील सुरक्षा कर्मचारी वाढविणे सोबतच एसटी महामंडळात एक सुरक्षा रक्षक कमिटी नेमून त्यात आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमणार असल्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री यांनी एसटी महामंडळ आणि पोलिस अधिकाऱ्यांची शनिवारी आढावा बैठक घेतली. यावेळी डीसीपी अमोल झेंडे, एसीपी वाहतूक अश्विनी राख, प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांच्यासह एसटी, पोलिस आणि आरटीओ विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्या हस्ते सर चंद्रशेखर वेंकटरमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. 21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे. नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -“पिंपरी चिंचवड शहर निर्मितीचा प्रवास” या नाटय प्रयोगामध्ये शहर निर्मितीमध्ये योगदान असलेले देश राज्य व चार खेडेगावांचे सर्व तत्कालीन सरपंच रंगमंचावर येणार आहेत. येत्या मंगळवारी ४ मार्च रोजी पिंपरी चिंचवड शहराच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त शहर निर्मितीच्या प्रवासावर नाट्य प्रयोग सादर होणार आहे. चिंचवड येथील सायन्स पार्क मधील प्रेक्षागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास’ या लेखक विजय जगताप यांच्या ग्रंथावर हे नाटक आधारीत असून याचे दिग्दर्शन गणेश दिघे यांनी केले आहे. यावेळी रे क्रिएशनचे अविनाश आदक यांनी शहरावर बनविलेला दृकश्राव्य माहितीपट, ‘या नगरीला पिंपरी चिंचवड हे नाव कसं पडलं?’ या लिखित…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )-दिल्लीत संपन्न झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत राजन लाखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राजन लाखे हे महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखेचे अध्यक्ष असून पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून लोकप्रिय असलेला कविकट्ट्याच्या प्रमुखपदाचा मान त्यांना आजतागायत म्हणजे आत्ताच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापर्यंत, गेली १० वर्षे सातत्याने मिळाला आहे. हा संमेलनाच्या इतिहासातील विक्रम आहे. यासाठी डॉ. पी. डी. पाटील, महामंडळाचे सदस्य प्रा. मिलिंद जोशी, प्रदीप दाते यांचे सहकार्य मिळाले, असे लाखे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -चाकण औद्योगिक वसाहातीमधील वासुली येथील झेडएफ इंडिया प्रा. लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये परिसरातील सर्वाधिक वेतनवाढ करार करण्यात आला. या करारानुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 20 हजार 100 रुपयांची भरघोस पगारवाढ मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वेतनवाढ करार करण्यात आला. यावैळी स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे सल्लागार रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे उपस्थित होते. या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस कृष्णा रोहोकले, खजिनदार अमृत चौधरी, महादेव येळवंडे, प्रशांत पाडेकर, रविंद्र भालेराव, दत्तात्रय गवारे, यूनिट अध्यक्ष तुषार पवळे, उपाध्यक्ष विक्रम सुक्रे, सरचिटणीस राहुल भोसले, सहचिटणीस अंगद चौधर, खजिनदार आतिब शेख, संघटक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जग झपाट्याने बदलत असून सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी दशेत शिक्षणाला महत्त्व आहे. परंतु अभ्यासाचे दडपण असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. मानसिक सुदृढतेसाठी शिक्षणाबरोबरच खेळांची आवड जोपासली पाहिजे. तरच तंदुरुस्त, खंबीर समाज निर्माण होईल. पालकांनीही याकडे जागरूकपणे पाहण्याची आवश्यकता आहे. सर्वांगीण विकास साधत देशाची भावी पिढी सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांची जबाबदारी आहे, असे मत पीसीईटीचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘युवोत्सव २०२५’ या तीन दिवसांच्या क्रीडा स्पर्धेचा समारोप…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या वार्षिकोत्सवात संदल मिरवणूक धार्मिक परंपरांचे पालन करीत झाली. यावेळी शहरातील सर्व ग्रामदेवता मंदिरात श्रींची पूजा, हारतुरे आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. शनिवारी ( दि.१ )धार्मिक उपक्रमात होम हवन राजेंद्र उगले, विद्या उगले यांचे हस्ते मंगलमय उत्साहात, वेदमंत्र जयघोषात झाला. यावेळी पौरोहित्य प्रशांत जोशी आणि सहकारी यांनी केले. श्रीना अभिषेख महेश गोरे, संतोष भोसले आळंदी ग्रामस्थांचे वतीने उत्साहात करण्यात आला. उत्सवात श्रींचा छबिना पालखी मिरवणूक, सचिन कुऱ्हाडे परिवार तर्फे देवाची काठीसह, ढोल, ताशांचे गजरात काढण्यात आली. यावेळी सवाद्य साई डिजिटल सेवा यावेळी राजू कांबळे यांनी सेवा रुजू केली. माता जोगेश्वरी व श्री…

Read More

मोशी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उत्सवाच्या लिलाव बोलीमध्ये लाख रुपयांपासून सुरू झालेली बोली तब्बल २५ लाखांवर येऊन थांबली आणि तिसरा अंतिम पुकार झाला. यात मानाचा वैभवी विडा २५ लाख रुपयांना गेल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी मंदिरात भाविक, ग्रामस्थांनी टाळ्यांचा गजर केला. मानाच्या विड्याची बोली लावलेले भाविक जगदीश श्रीपती जाधव (सस्ते) नागेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. मोशी येथील नागेश्वर महाराज यात्रा व भंडारा उत्सवाच्या निमित्ताने यात्रेतील लिलाव प्रथा उत्साहात पार पडली. मोशीत उत्सवास महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली असून, शुक्रवारी (दि. २८) परंपरागत लिलाव श्रीनागेश्वर महाराज मंदिर सभागृहात झाला. उत्सवात वापरलेल्या व महाराजांच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव…

Read More

प्रकाश आबिटकर व पंकजा मुंडे यांच्याकडून महाआरोग्य शिबिर उपक्रमाचे कौतुक सांगवी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यातील सर्व मुलींना शासनातर्फे गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज केली. राज्याचे अर्थमंत्री लवकरच त्यासाठी आवश्यक तरतूद करून घोषणा करतील, असेही त्यांनी सांगितले. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरात त्यांनी ही घोषणा केली. या उपक्रमाद्वारे लक्ष्मणभाऊंना योग्य श्रद्धांजली वाहण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदनावर दोन दिवस झालेल्या या शिबिराचा लाभ १ लाख २१ हजार ५२३ जणांनी घेतला. अटल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नाशिक फाटा ते लांडेवाडी चौक राष्ट्रीय महामार्ग  जवळपास 2.5  किलोमीटर परिसरातील प्लेगेथाँन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .उपायुक्त सचिन पवार यांच्या आदेशानुसार आभियान राबविण्यात आले. ह प्रभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान राबविण्यात आले .यावेळी ते म्हणाले की,आरोग्य विभाग व बेसिक्स टीमने विशेष जनजागृती स्वच्छता मोहीम गेल्या अनेक दिवसापासून राबवीत असून यापुढेही राबविण्यात येईल. आमच्या या अभियानात नागरिकांनी व संस्थांनी पण स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला त्यामध्ये  विशेषता पुणे प्लॉगर्स, मानवी हक्क संरक्षण जागृती आणि इतर सामाजिक संस्थांनी सहभागी होऊन  3 टन कचऱ्याचे  संकलन करण्यात आले. यामध्ये प्लास्टिक सह बाटल्या घनकचरा मोठ्या प्रमाणात होता नागरिकांनी कचरा…

Read More