- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अभय योजना लागू केल्यापासून २० दिवसांमध्ये तब्बल २७ हजार ८४० मालमत्ता कर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेत भरलेल्या मालमत्ता कराची रक्कम तब्बल ८० कोटींहून अधिक आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ (रात्री १२ पर्यंत) सुरू राहणार असून, अद्याप ज्या मालमत्ताधारकांचा मालमत्ता कर भरणे बाकी आहे, अशा थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना १ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी,…
स्वच्छतेसोबत सौंदर्याला मिळतोय नवा आयाम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जागतिक पुनर्वापर दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयांसाठी ‘वेस्ट टू वंडर’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत ३२ प्रभागांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, शहर स्वच्छतेवर भर देतानाच वस्तूंचा सुयोग्य पुनर्वापर करून कलात्मकता जोपासण्याचा दुहेरी उद्देश या उपक्रमामागे आहे. टाकाऊ वस्तूंना नवसंजीवनी देत स्वच्छतेसोबत…
आज पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन येथे व्याख्यान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वीर शहीद हुतात्मा भगतसिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांचे शुक्रवारी (दि. २० मार्च) सकाळी १० वाजता, पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन पिंपरी येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती पिंपरी आर्य समाज चे अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे. “शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या विषयावर किरणजीत सिंग हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी डॉ. नयन कुमार आचार्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी किरणजीत सिंग आर्यसमाज पिंपरी येथे होम हवन विधी मध्ये सहभाग घेणार आहेत अशी माहिती पिंपरी आर्य समाजचे मंत्री…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालयात वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात महिला सन्मानासोबतच महिला प्रबोधन आणि नेत्र आरोग्याविषयी मार्गदर्शन अशा उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाज प्रबोधनकार शारदा मुंडे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत महिलांना मार्गदर्शन करत समाजातील महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला ईशा नेत्रालय, चिंचवड स्टेशनच्या सेंटर हेड ध्रुवशी पाटील, ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. रश्मी लोंढे तसेच पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी मनीषा माळी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “ उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात परीसंवाद पार पडला. या एकदिवसीय परिसंवादाचे सकाळच्या सत्रात उद्घाटन एसपीपीयू महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख व वक्त्या डॉ . गीता शिंदे , प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉ . चित्रा सोहनी याच्या समवेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्याचा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. उद्घाटन सत्रामध्ये शिक्षण क्षेत्रातील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विविध विकास कामे निधीअभावी रखडली आहेत. पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छतेचा अभाव आहे. असुविधांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीत संरक्षण विभागाच्या महानिदेशक शोभा गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खासदार बारणे यांनी महानिदेशक गुप्ता यांची भेट घेऊन देहूरोडमधील रखडलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. मावळ लोकसभा मतदारसंघात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे. मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, स्ट्रीट लाईट (पथदिवे), पिण्याचे पाणी, प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती करणे आवश्यक आहे. भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन…
लोकवस्तीत पाच दिवसांपासून कचऱ्याचे ढीग लोणी-काळभोर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायती तसेच परिसरातील काही गावांकडून बेकायदेशीरपणे दररोज कचरा टाकला जात असल्याच्या निषेधार्थ एमआयटी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचे ‘कचरा बंद’ आंदोलन पाचव्या दिवशीही कायम आहे. परिणामी, दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लोकवस्तीत गेल्या पाच दिवसांपासून कचरा न उचलल्याने अक्षरशः कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी प्रथम दि. ४ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘कचरा बंद’ आंदोलन करत कचरा वाहून नेणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ट्रॅक्टरांना कॅम्पसमधून नदीपात्राकडे जाण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर पोलिस उपआयुक्तांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी संबंधित…
पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर परिसरात बांधकाम क्षेत्रात एक अभूतपूर्व कामगिरी समोर आली असून, केवळ १०० दिवसांत १४ मजली उंच निवासी इमारत उभी करत बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रा. लि. यांनी इतिहास घडवला आहे. या विक्रमी कामगिरीची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स कडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने सेक्टर-१२, चिखली येथे तब्बल ६,४५२ घरांच्या प्रकल्पातील एका इमारतीचे काम अवघ्या १०० दिवसांत पूर्ण करण्यात आले. सुमारे ८०,४५३ स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीत अत्याधुनिक ३एस प्री-फॅब तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान भारत सरकारच्या केंद्रीय लोकनिर्माण विभागाकडून (BMTPC)…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आणि निष्ठेने काम केले. या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. प्रभागातील पॅनेल प्रमुख तसेच माजी विरोधी पक्षनेते मा. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली, पिंपळे सौदागर येथील हॉटेल व्यावसायिक आणि त्यांचे खंदे समर्थक श्री. संतोष मल्हारी काटे उर्फ महाराज यांनी कार्यकर्त्यांसाठी आकर्षक बक्षीस योजना जाहीर केली होती. या अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नवीन बुलेट दुचाकी बक्षीस ठेवण्यात आले होते. प्रभागातील सुमारे ३०० सक्रिय कार्यकर्त्यांमधून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘नाना…
आरोग्य विभाग राबवत आहे अभिनव उपक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक पुनर्वापर दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने राबविलेला ‘वेस्ट टू आर्ट’ हा उपक्रम थेरगाव परिसरात नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. २३ मधील संजीवनी कॉर्नर येथे टाकाऊ वस्तूंमधून साकारलेल्या आकर्षक कलाकृतींनी परिसर अक्षरशः बहरून गेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून “कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण (आर.आर.आर.) या संकल्पनेचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत…
