Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ८ व ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पिंपरी बाजार परिसरात (साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक) अशा प्रकारचा पहिलाच वाहन-मुक्त दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद अबालवृद्धांनी घेतला. लहान मुले, महिलांचा देखील मोठा सहभाग या उपक्रमात दिसून आला. वाहन मुक्त दिनानिमित्त रस्ते सुरक्षा, कमी प्रदूषण क्षेत्र, पादचारी मार्ग व सायकल ट्रॅकचे महत्त्व, सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांच्या सहभागावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. सर्व वयोगटांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रम देखील येथे पार पडले. कार्यक्रमस्थळी संपूर्ण ५०० मीटर रस्त्यावर…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिला आता कुठल्याही क्षेत्रात मागास राहिलेल्या नाहीत. मुली उच्च शिक्षण घेत आहेत, प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमठवत आहेत. मात्र, तरीही कामाच्या ठिकाणी आजही महिलांना दुजाभावाचा सामना करावा लागतो. तरीही, योग्यवेळी संधी, कुटूंबाचा भक्कम पाठिंबा मिळाल्यास महिला कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतात, इतकी ताकद त्यांच्यात असते, असे मत औद्योगिक शिक्षण मंडळ शिक्षण समूहाच्या (एएसएम) ट्रस्टी डाॅ. प्रिती पाचपांडे यांनी व्यक्त केले. त्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्याचा आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम व त्यानिमित्त आयोजित कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण समारंभात बोलत होत्या. याप्रसंगी, रिलायन्स लाइफ सायन्सच्या व्यावसायिक प्रमुख डाॅ.शैलजा सक्सेना, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल विधवा महिलांचा ओटी भरण व सत्कार समारंभ कशिधाम मंगल कार्यालय चिंचवड येथे आयोजित केला होता. सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात महिलांचे योगदान उल्लेखनीय आहे. सदर योगदानाच्या स्मरणार्थ जागतिक महिला दिन हा सर्वत्र साजरा केला जातो तसेच यानिमित्त महिलांच्या सबलीकरणासाठी सुद्धा आव्हान केले जाते समाजात अशा बऱ्याच महिला आहेत ज्या एकल आहेत म्हणजे विधवा आहेत बऱ्याच ठिकाणी काही समाज अंधश्रद्धेपोटी त्यांना शुभ कार्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच आर्थिक दृष्ट्या अतिशय दुर्बल आहेत परंतु त्यांनी हिम्मत न हरता पडेल ती काम करून आपल्या मुलाबाळांचा…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर लाईफ पॉइंट हॉस्पिटल वाकड आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे गट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कॅन्सर विषयी मार्गदर्शन शिबिर कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर चिंचवड येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर जयपाल रेड्डी कॅन्सर तज्ञ यांनी उपस्थित सभासदांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आणि त्यावर उपाय होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले डॉक्टर मृणाल फोंडेकर यांनी आहार विषयी मार्गदर्शन केले कामगार कल्याण केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे यांनी कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १७५५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिरामध्ये १७ रक्तपेढी सहभागी झाल्या होत्या. रसिकलाल एम. धारिवाल इंटरनॅशनल स्कुल आणि संघवी केशरी महाविद्यालय व रसिकलाल एम धारिवाल फार्मसी कॉलेज या दोन ठिकाणी एकाच वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, शांतीलाल कटारिया, कार्याध्यक्ष शांतीलाल लुंकड, सचिव अ‍ॅड. राजेंद्रकुमार मुथा, खजिनदार प्रकाश चोपडा, संयुक्त सचिव प्रा. अनिलकुमार कांकरिया, व राजेशकुमार साकला, विश्वस्त सतीश चोपडा, प्रवीण लुंकड, वालचंद संचेती, प्रकाश बंब, सर्व विश्वस्त, रुबी हॉल…

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “शिक्षक हा आपल्या आचार , विचार आणि कार्यपद्धतीद्वारे समाज घडवण्याचे काम करतो. ध्येयवादी शिक्षकांची पिढी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांचे कार्य पुढील पिढीने नेटाने पुढे न्यावे. सामाजिक भावनेने शिक्षण देत गरीब मुलांना आधार देत मदत मिळवून देणाऱ्या तसेच इंग्रजी भाषा विषयात संस्थेचा नावलौकिक निर्माण करणाऱ्या जयश्री घावटे यांचा वारसा चालवावा.” असे गौरवोद्गार नवनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्रा. गोविंदराव दाभाडे यांनी काढले. पर्यवेक्षिका जयश्री घावटे यांना बत्तीस वर्षाच्या अखंड सेवेनंतर भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. दाभाडे बोलत होते. सरस्वती पूजन करून ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ. घावटे इंग्रजी विषय शिकवत असताना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना रहाटणी काळेवाडी आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त काळेवाडी परिसरातील महानगर पालिकेच्या २५ महिला आरोग्य सफाई कर्मचारी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सर्व महिलांना दुपट्टा देऊन यथोचित असा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून योग गुरु सुरेश विटकर, सुजाता हरेश आबा नखाते, तसलीम शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी दत्तात्रय भट, एकनाथ मंजाळ, एकनाथ काटे, लक्ष्मण टोणपे, शंकर जाधव, मनपाच्या आरोग्य अधिकारी आत्माराम फडतरे, कृष्णा येळवे, बाळासाहेब येडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी केले. आभार चंद्रकांत गायकवाड यांनी मानले.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नाना काटे सोशल फाऊंडेशन व उमेश काटे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाच्या जडणघडणीसाठी बहुमोल योगदान देणाऱ्या माता भगिनींचा, पोलिस दलातील महिला, महापालिकेच्या शिक्षिका, आरोग्यसेविका, नर्सेस व सफाई कर्मचारी महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पिंपळे सौदागर परिसरात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला माता भगिनींचा नाना काटे सोशल फाऊंडेशन व उमेश काटे‌ युथ सोशल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सन्मान करण्यात आला. या सर्व भगिनींचे बहुमोल योगदान अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद असून, आपण सगळेच त्यांचे सदैव कृतज्ञ असल्याचे मत उमेश काटे‌ यांनी व्यक्त…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संवाद व्यासपीठ आयोजित जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आजची महिला या विषयावर महिलांनी वकृत्त्व द्वारे मनोगत सादर केले.यामध्ये 20 महिलांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक सुजाता नखाते, द्वितीय क्रमांक कोमल गोंडाळकर व तृतीय क्रमांक मनीषा हिंगणे यांना मिळाला तसेच उत्तेजनार्थ सायली नढे मनीषा गटकळ प्रज्ञा हितळणीकर यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवाद व्यासपीठचे हरीश मोरे यांनी केले. अनिल राऊत यांनी आभार मानले.

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आई हिच सर्वांची प्रथम गुरू आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्री कर्तुत्वशील असते. ती आपल्या कर्तुत्वाने माता, गुरू, बहिण, मुलगी, मैत्रीण अशा विविध भूमिका साकारत कुटुंबाच्या विकासासाठी व सन्मानासाठी समर्पण भावनेने योगदान देत असते. प्रत्येक माता या मुलांना योग्य संस्कार देण्याचे काम करतात. मुलांना कुटुंबात, समाजात कसे वागावे, बोलावे हे प्रथम आई मुलांना शिकवते. योग्य-अयोग्य गोष्टी समजावून सांगते. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्री काम करत आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने प्रत्येक मुलाने महिला दिनाच्या दिवशी आपल्या मातेची पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतला पाहिजे असे मार्गदर्शन भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळाचे अध्यक्ष वसंत नाना लोंढे…

Read More