नाना काटे सोशल फाऊंडेशन व उमेश काटे युथ सोशल फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील महिला भगिनींचा सन्मान


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नाना काटे सोशल फाऊंडेशन व उमेश काटे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाच्या जडणघडणीसाठी बहुमोल योगदान देणाऱ्या माता भगिनींचा, पोलिस दलातील महिला, महापालिकेच्या शिक्षिका, आरोग्यसेविका, नर्सेस व सफाई कर्मचारी महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला.


८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पिंपळे सौदागर परिसरात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला माता भगिनींचा नाना काटे सोशल फाऊंडेशन व उमेश काटे युथ सोशल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सन्मान करण्यात आला.

या सर्व भगिनींचे बहुमोल योगदान अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद असून, आपण सगळेच त्यांचे सदैव कृतज्ञ असल्याचे मत उमेश काटे यांनी व्यक्त केले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, तसेच फाऊंडेशनचे कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या.










