ताज्या घडामोडीपिंपरी
संवाद व्यासपीठाच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
वक्तृत्व स्पर्धेत सुजाता नखाते प्रथम


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संवाद व्यासपीठ आयोजित जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


आजची महिला या विषयावर महिलांनी वकृत्त्व द्वारे मनोगत सादर केले.यामध्ये 20 महिलांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक सुजाता नखाते, द्वितीय क्रमांक कोमल गोंडाळकर व तृतीय क्रमांक मनीषा हिंगणे यांना मिळाला तसेच उत्तेजनार्थ सायली नढे मनीषा गटकळ प्रज्ञा हितळणीकर
यांना पारितोषिक देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवाद व्यासपीठचे हरीश मोरे यांनी केले. अनिल राऊत यांनी आभार मानले.










