Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ठाणे येथून बेपत्ता झालेला ‘आकाश’ नावाचा मुलगा भारतीय जनता युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड मंडळ अध्यक्ष विवेक बारोट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुरक्षितपणे आपल्या कुटुंबाकडे परतला आहे. तब्बल १८ दिवसांच्या शोधानंतर या मुलाची घरवापसी झाली असून, बारोट यांच्या सोशल मीडिया मोहिमेचा यात मोठा वाटा ठरला. नेमकी घटना काय? आकाश हा मुलगा २ मार्च रोजी ठाणे येथून बेपत्ता झाला होता. त्याचे कुटुंब सर्वत्र त्याचा शोध घेत होते, मात्र १८ दिवस होऊनही त्याचा पत्ता लागत नव्हता. दरम्यान, तो पिंपरी-चिंचवडमधील मोहननगर परिसरात भटकत असताना विवेक बारोट आणि त्यांच्या टीमला रात्री ९:४० च्या सुमारास आढळला. असा लागला शोध: पहिली मदत:…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगभरात अल्लाच्या आज्ञेप्रमाणे मुस्लिम बांधव रमजान ईद निमित्त महिनाभर उपवास करतात. भल्या पहाटेपासून दिवसभर पाणी, अन्न न पिता , खाता पकडलेला उपवास सायंकाळी नियोजित वेळेला सोडण्यात येतो . दिवसभरातील पाच वेळेची नमाज रात्रीची तराबी सामुदायिक नमाज होते. कुराणपठण केले जाते . गोरगरीबांना मदत केली जाते. महिन्यानंतर चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते . रमजान ईद आज पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधव आज सकाळी नवीन कपडे परिधान करून सुवासिक तेल , अत्तर कपड्याना परीसरातील मसी दीत एकत्र जमले . मौलानांनी प्रवचन देवून सामुदायिक नमाज पढविला .…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मावळ मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) नवनियुक्त आयुक्त अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत लोणावळा शहरातील मुख्य रस्ता, स्कायवॉककडे जाणारा रस्ता तसेच देहूफाटा ते येलवाडी या मार्गांवरील रखडलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. ही कामे तातडीने पूर्ण करण्याची आग्रही मागणी आमदार शेळके यांनी केली. याशिवाय मावळ तालुक्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी अद्याप कन्सल्टंट नेमणूक न झाल्याने कामे रखडली असल्याची बाबही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच ‘इंद्रायणी व पवना नदी…

Read More

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव परिसरातील रामनगर येथून CME सैन्य दलाच्या सीमेला लागून जाणाऱ्या रस्त्यावर ब्लू डार्ट ते मयूर नगरी चौक दरम्यान फूटपाथवरील झाडांची दयनीय अवस्था समोर आली आहे. पाण्याअभावी ५ ते १५ फूट उंचीपर्यंत वाढ झालेली सुमारे २५ झाडे जळून गेल्याचे निदर्शनास आले असून, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेकडून शहरात तब्बल ३२ लाख झाडे असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात वाढलेली झाडेही जिवंत ठेवण्यात अपयश येत असल्याची टीका होत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त असताना झाडांची अशी नासाडी होणे चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. फुटपाथ विकसित करताना झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंटचे आवरण…

Read More

नगरसेवक  ​शत्रुघ्न (बापू) काटे,नगरसेविका  अनिता काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे यांच्या प्रदीर्घ पाठपुराव्याला यश; नागरिकांकडून समाधान ​ पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत कळीचा मानला जाणारा, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे प्रलंबित असलेला १८ मी. ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नगरसेवक श शत्रुघ्न (बापू) काटे,नगरसेविका  अनिता काटे आणि नगरसेविका  कुंदा भिसे यांच्या अथक परिश्रमातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम आज प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. ​अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली… पिंपळे सौदागरच्या मध्यवर्ती भागातून जाणारा हा रस्ता अनेक गृहप्रकल्पांना जोडणारा मुख्य दुवा आहे. मात्र, जमिनीचे…

Read More

पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव पिंपरी (, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘धन्य आजी दिन | झाले संतांचे दर्शन | झाली पापा तापा तुटी | दैन्य गेले उठाउठी ||’ श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे (शुक्रवार, दिनांक २० मार्च)  सकाळी ह. भ. प. सुप्रिया साठे – ठाकूर यांनी कीर्तनसेवा रुजू केली. याप्रसंगी नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक मधू जोशी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती सदस्य गतिराम भोईर, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर…

Read More

विद्यार्थ्यांना नवोन्मेष, डिझाईन व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची नवी दारे खुली पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे आणि रायन आंतरराष्ट्रीय संस्था समूह यांच्यात शैक्षणिक सहकार्य, नवोन्मेषाधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. एमआयटी शैक्षणिक संकुलातील इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या प्रा. एच. के. व्यास सभागृहात दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा करार औपचारिकरीत्या संपन्न झाला. या सहकार्याद्वारे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण यांमध्ये शैक्षणिक दुवा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असून, डिझाईन थिंकिंग, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा प्रारंभिक शिक्षणात समावेश करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून कार्यशाळा, प्राध्यापकांचे…

Read More

– भाजपा आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती – देव-देश-धर्मासाठी जागृत राहण्याचा संकल्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपलिका प्रभाग क्रमांक ११ मधील कृष्णानगरमध्ये हिंदु नववर्षारंभ अर्थात गुढी पाडवाच्या निमित्ताने देशभक्ती, हिंदुत्व आणि अभिमान यांचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला. या वेळी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते ५१ फुटी भव्य भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण करण्यात आले, ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात नवीन उत्साह निर्माण झाला. ध्वजारोहण सोहळा कामगार नेते सचिन लांडगे यांच्या शुभहस्ते पार पडला. आकाशात झेपावलेला भगवा ध्वज पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत अभिमान व्यक्त केला. या भव्य उपक्रमाची संकल्पना जगदंब प्रतिष्ठान, कृष्णानगर यांनी केली असून, स्थानिक नगरसेविका रिटा सचिन…

Read More

– मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणेकर आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘मेट्रो लाईन ३’ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्याचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीए प्रशासनाने निश्चित केले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (दि. १९) प्रत्यक्ष ‘ऑन ग्राउंड’ जात पाहणी केली, व या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, या प्रकल्पाचे काम आता ‘मिशन मोड’वर सुरू झाले आहे. पीएमआरडीएच्या औंध येथील कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीनंतर,…

Read More

शिवतेजनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शिवतेजनगर येथील स्वामी समर्थ मंदीरात स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरतीची तयारी सुरू असताना अचानक बाल स्वरूपातील स्वामी समर्थ प्रकटले. स्वामी समर्थ यांची वेशभूषा केलेल्या दोन वर्षाच्या बालकाचे स्वामी भक्तांनी स्वागत केले. कु. अबीर प्रतिक घावटे याने ही वेषभूषा केली होती. अबीर याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, दीपक पाटील, राजू गुणवंत आणि सेवेकारी मंडळाने विशेष कौतुक केले.

Read More