- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत आक्रमक आणि धडाडीच्या शिवसेना नेत्या आणि माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी अखेर ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उबाळे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीमध्ये सुलभा उबाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उबाळे गेल्या 36 वर्षांपासून सक्रीय राजकारणात आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या, गटनेत्या म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. तसेच, शिरुर लोकसभा प्रमुख आणि पुणे जिल्हा संघटिका म्हणून त्या ठाकरे गटात कार्यरत होत्या. शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ…
– शहरातील महाविकास आघाडीला आणखी एक धक्का पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत आक्रमक आणि धडाडीच्या शिवसेना नेत्या आणि माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी अखेर ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उबाळे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीमध्ये सुलभा उबाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उबाळे गेल्या 36 वर्षांपासून सक्रीय राजकारणात आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या, गटनेत्या म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. तसेच, शिरुर लोकसभा प्रमुख आणि पुणे जिल्हा संघटिका म्हणून त्या ठाकरे गटात कार्यरत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी विधान परिषद निवडणूक – (दि.२७ मार्च २०२५) मध्ये पिंपरी चिंचवड शहराला विधान परिषद सदस्य म्हणून योग्य त्या कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी पिंपरीतील कार्यलयात झालेल्या बैठकीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा ची महत्वाची बैठक आज बुधवार, दिनांक, १२ मार्च, २०२५ रोजी मध्यवर्ती पक्ष कार्यालय, पिंपरी येथे संपन्न झाली. आगामी महाराष्ट्र राज्यातील विधान परिषद निवडणूक ही दि.२७ मार्च २०२५ रोजी होणार असून, दिनांक १० ते १७ मार्च दरम्यान नामनिर्देशन पत्र भरण्यात येणार असून त्यासाठी पिंपरी चिंचवड शहराला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी सदर बैठकीत विषय घेण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता शहरात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. उपनगरांमध्ये गृहप्रकल्प उभारले जात आहे. धूळीचे साम्राज्य आणि हवा प्रदूषणामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी. तसेच, हवा प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी पर्यावरण मंत्री मुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील सोसायटीधारकांनी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढला आणि हवा प्रदूषणाबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधले…
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध महत्त्वाच्या विषयांवर परखड मते मांडली. मावळ मतदारसंघातील रस्ते विकास, आरोग्य सुविधा, सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि उद्योग क्षेत्रातील समस्या यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. रस्ते विकास आणि टिकाऊपणाचा मुद्दा आमदार शेळके यांनी स्पष्ट केले की, गेल्या १५ वर्षांपासून रखडलेला रस्ते विकासाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. अनेक उद्योगपती, स्थानिक नागरिकांनी या कामाचे कौतुक करत सरकारचे आभार मानले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध योजनांतर्गत रस्ते बांधले जात आहेत. मात्र, या रस्त्यांची गुणवत्ता टिकाऊ असली पाहिजे. काही रस्त्यांचे काम होताच ते वर्षभरातच खराब होतात, रस्ते खड्ड्यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ठाकरेंच्या शिवसेनेची गळती थांबायचे नाव घेत नाही. शिवसेनेचा पिंपरी चिंचवड शहरातील अभ्यासू, निर्भीड, आक्रमक चेहरा म्हणून परिचित असलेल्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी अखेर उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र केला आहे. तीन महिन्यांपासून त्यांच्या पक्षांतराची चर्चा होती. उपमुख्यमंत्री एकनथ शिंदे यांच्या उपस्थितीत असंख्य समर्थकांसह आज सायंकाळी त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. अत्यंत कठोर अंतःकरणाने विकास कामे होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या बरोबर राहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संघटन शहरात मजबूत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवड महापालिकेत १९९७ च्या निवडणुकित सर्वसाधारण जागेवर त्या शिवसेनेकडून नगरसेविका म्हणून प्रथम विजयी झाल्या. तीन…
चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना चिंचवड विधानसभेच्या संघटन बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पक्षाचे कट्टर कार्यकर्ते संतोष सौंदणकर यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत, शहर संघटक पदाचा राजीनामा दिला आहे. ते आज बुधवारी सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत शिवसेनेच्या जिल्हा संघटिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे, भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी शहराध्यक्ष रामभाऊ उबाळे यांच्यासमवेत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शहर शिवसेना बॅकफुटवर गेली आहे. अशा वेळी शहराध्यक्षांना मोठी भुमिका पार पाडावी लागते. ढासाळलेल्या गडाची डागडुजी अपेक्षित असते. मात्र, पक्षात…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कला ही सार्वभौम असून तिला कुठल्याही एका साच्यात बांधता येत नाही. कला ही माणसाला सामाजिकरित्या जिवंत ठेवते. कलाच माणसाला सुखी, समृद्ध आणि आनंदी जीवन जगायला भाग पाडते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाबरोबर कुठली तरी एक कला आत्मसात करावी. सध्याचा काळ चित्रपटांनी २००, ५०० कोटींचा व्यवसाय केला, हे सांगणारा आहे. त्यात सध्या मनोरंजन क्षेत्राचे सोनेरी दिवस चालू असून कलाकारांना प्रचंड करिअर संधी प्राप्त होत आहेत. त्यामुळे तरुणांनी या क्षेत्राकडे वळायला हवे, असे मत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांनी मांडले. एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या सातव्या ‘पर्सोना फेस्ट-२५’ या वर्षातील सर्वांत मोठ्या कला महोउत्सवाच्या उद्घाटनात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय, राज्यमार्गावरील अनधिकृत बांधकामावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. गत ९ दिवसात विविध भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईमुळे जवळपास २ हजार अनधिकृत बांधकामे काढण्यात आल्याने साधारण दोन लाख चौरस मीटरवरील संबंधित रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. परिणामी संबंधित भागातील वाहतुक कोंडीचा प्रश्न निकाली निघत असल्याचे समाधान वाहनधारकांसह नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पुणे शहरासह परिसरात काही दिवसापासून अनाधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण होत असून नागरिकांसह वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी पीएमआरडीएसह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दूरदृष्टी नेतृत्व, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनरेटा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली त्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली, केंद्रीय संरक्षण मंत्री उदारमतवादी नेते होते एमआयडीसी ची स्थापना करून संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून करोडो ना रोजगार दिले असे मत कामगार नेते काशिनाथ यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त असंघटित कष्टकरी कामगारांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, माधुरी जलमुलवार, किरण साडेकर,वंदना मोरे,अनिता घोगरे, विजया पाटील, वैजयंती कदम आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यामध्ये…
