- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आयुष्य प्रचंड आव्हानात्मक आहे. मात्र आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला ‘ऑल इज वेल’ म्हणत विद्यार्थ्यांनी धीराने तोंड द्यायला हवं. यासह, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्यात करिअर करायला हवं. आवडीचे क्षेत्र ठरल्यानंतर परिणामाची चिंता न करता ‘नेवर गिव अप’ वृत्ती स्विकारुन यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका आणि यश प्राप्तीनंतर त्यात झोकून देऊन आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. या प्रक्रियेत ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्यांचाच विचार करावा व ज्या नाहीत त्यांची चिंताच करू नका, असे आवाहन प्रसिद्ध सिनेअभिनेते शरमन जोशी यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या सातव्या ‘पर्सोना फेस्ट-२५’ या वर्षातील सर्वांत मोठ्या…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महपालिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने विचार विनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन सोमवार, दि. १७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. तरी या बैठकीस विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये स्त्री-पुरुष समानता साध्य करणे आणि महिला व बालकांवरील हिंसाचार रोखण्यासाठी न्याय व्यवस्थेत ठोस सुधारणा आवश्यक आहेत,” असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. जागतिक महिला आयोगाच्या ६९ व्या सत्रानिमित्त स्त्री आधार केंद्राने ऑनलाइन चर्चासत्र आयोजित केले होते. या परिसंवादात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत तज्ज्ञ, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा पाठक यांनी केले. *शिक्षण, महिला चळवळ आणि साहित्याचे महत्त्व – तारा भवाळकर* साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी यावेळी सांगितले की, “पूर्वी महिलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असे, परंतु…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील अतिक्रमणविरुद्ध मोहिम यशस्वी पूर्ण होत असून आता दुसऱ्या टप्प्याची आखणी १७ ते ३० मार्चदरम्यान करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर धडक कारवाई करत ते जमिनदोस्त करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पीएमआरडीएच्या संयुक्त कारवाईमध्ये पुणे शहर पोलीस, पिंपरी चिंचवड शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, एमएसईबी आदी विभागांमार्फत ३ ते १३ मार्चपर्यंत २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजाला कशाची गरज आहे ते विचारात घेऊन मार्गदर्शन करणारा कीर्तनकार हा दिशादर्शक असतो. स्वतः अंध असून भाऊसाहेब विठोबा गोरे यांनी पत्नी सुवर्णा व चिरंजीव रामचंद्र यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली हा त्यांच्यातला सदगुण आहे. अशा सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे. दुर्गुणांना समाजाने लांब ठेवले पाहिजे. आज काही कीर्तनकार ओंगळवाणे प्रदर्शन करत कीर्तन करतात आणि वाहव्वा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असे परखड मत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले. संत तुकाराम महाराज वाङमय संशोधन मंडळाद्वारे गाथा मंदिर प्रकल्प अंतर्गत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमन…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी येथिल डायनोमर्क कंट्रोल उद्योगांमध्ये 54 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सांगता करताना ज्येष्ठ विचारवंत,साहित्यिक सूर्यकांत मुळे यांच्या “सुरक्षितता हाच जीवनाचा सुरक्षित मार्ग” या पुस्तकाचे प्रकाशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, प्रत्येकाने काम करत असताना आपल्याबरोबरच आपल्या सहकारी कामगाराची पण काम करताना काळजी घेतली पाहिजे, 5 S. ही जापनीज संकल्पना आत्मसात केली पाहिजे आपले कोणीतरी घरी वाट बघत आहे.आई-वडील,पत्नी, मुले याची जाणीव ठेवून सुरक्षित काम करावे ,एखादे काम माहिती नसेल त्या समजल्याशिवाय किंवा माहिती घेतल्याशिवाय ते काम न करण्याचा सल्ला राऊत यांनी दिला. ज्येष्ठ विचारवंत ,साहित्यक सूर्यकांत मुळे…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्म चे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर…
श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ३७५ व्या सोहळ्याची वर्षपूर्ती सांगता देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ३७५ व्या बीज सोहळ्याची वर्षपूर्ती अर्थात त्रीशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्याचे सांगता आणि ३७६ वा श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा रविवारी ( दि. १६ ) देहू नगरीत साजरा होत आहे. या सोहळयाचे दिनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज संस्थान तर्फे श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करीत सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री संत तुकाराम…
तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज (गुरुवारी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) येथे आयुक्त योगेश म्हसे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मावळ तालुक्यातील पर्यटन विकास, क्रीडा संकुल, वाहतूक, नदी सुधार योजना आणि अन्य पायाभूत सुविधा विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली. पर्यटन विकासासाठी निधीची तरतूद मावळ तालुका हा निसर्गरम्य स्थळांसाठी प्रसिद्ध असून, येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्यामुळे किल्ले तिकोना, तुंग, लोहगड आणि राजमाची या ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे सुधारणा करण्यासाठी आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उभारण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडी पुलाजवळील त्रिलोक स्मशानभूमीमधील डिझेल शवदाहिनीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, या ठिकाणी पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्यात येणार आहे. या कामासाठी अंदाजे सहा महिने कालावधी लागणार असल्याने सदर शवदाहिनी या कालावधीत बंद राहणार आहे, अशी माहिती विद्युत विभागाचे सहशहर अभियंता संजय खाबडे यांनी दिली आहे. डिझेल शवदाहिनीऐवजी गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामामुळे प्रदूषणास आळा बसणार आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आणि प्रदूषण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिनी ऐवजी नूतनीकरणाच्या कालावधीत नागरिकांनी पर्यायी स्मशानभूमीचा वापर करावा, असे आवाहन विद्युत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
