Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार ५० टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी २५ टक्के आपला हिस्सा देतात. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रोजेक्टला गतिमान करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांच्यासाठी एकत्रित काम करणारे सॉफ्टवेअर आवश्यक होते. या इंटीग्रेटेड सॉफ्टवेअरचे काम मे २०२५ मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. आमदार अमित गोरखे आणि आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होतया. आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने जीआयएसईआरपीच्या दृष्टीने ११२ कोटी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एका माणसाने केलेले अवयव दान हे ८ व्यक्तींचे जीवन वाचवू शकते. अवयव आणि रक्त हे आपण कृत्रिमरित्या तयार करू शकत नाही. अवयव दान आणि रक्तदान हे जीवनदान सारखे आहे. याचे प्रमाण वाढले तर हजारो गरजू रुग्णांना मदत होईल. आता अवयव दान आणि रक्तदान हे उपक्रमाऐवजी चळवळ म्हणून चालवली पाहिजे. यासाठी नागरिकांनी व सामाजिक संस्था संघटनांनी जनजागृती करावी असे आवाहन डॉ. स्नेहल गायकवाड यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील पीसीसीओइआर येथे श्री. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या जयंतनिमित्त राष्ट्रीय सेवायोजना अंतर्गत रक्तदान शिबिर व अवयव दान या विषयावर डॉ. स्नेहल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी…

Read More

सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीसुध्दा काऊंटर्स सुरु ठेवण्याचा करसंकलन विभागाचा निर्णय नागरिकांच्या सोयीसाठी करसंकलन विभागाची विशेष सेवा पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना करदात्यांना आपला कर भरण्यास सोयीचे व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने करसंकलन कार्यालये व कॅश काऊंटर्स २९ मार्चपर्यंत सकाळी ९.४५ ते रात्री ०९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत असे करसंकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर, शनिवार २९ मार्च, रविवार ३० मार्च, गुढीपाडव्याच्या दिवशी व ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवटच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत (शेवटचा व्यक्ती येईपर्यंत) कॅश काऊंटर्स सुरु ठेवण्याचा निर्णय करसंकलन विभागाने घेतला असून नागरिकांनी तात्काळ आपल्या कराचा भरणा…

Read More

नवीन आकारणी झालेल्या मालमत्ताधारकांकडे ८७ कोटींचा कर येणे बाकी! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मालमत्ता सर्वेक्षणांतर्गत नव्याने निदर्शनास आलेल्या प्रत्येक मालमत्तेच्या मालमत्ताधारकांना महाराष्ट्र महानगरपालिकेच्या अधिनियमातील तरतूदीनुसार विशेष नोटीस देणेत येऊन आज अखेर ८९,००६ नवीन मालमत्ताधारकांना मालमत्ताकराचे अंतिम बिल प्रथमच वाटप केले असून या मालमत्तांची रुपये १६७ कोटी कराची मागणी निश्चिती कार्यवाही सुध्दा पूर्ण झाली आहे. यापैकी आत्तापर्यंत ४७ हजार ४४८ मालमत्ताधारकांनी ७७ कोटीं कराचा भरणा महानगरपालिकेकडे केला आहे. त्याचबरोबर, ४१,५५८ मालमत्तांधारकांकडे अद्यापही ८७ कोटींचा कर येणे बाकी आहे. त्यांची करवसुली त्यांना एसएमएस, फोन,…

Read More

आमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी द्वारे विधानपरिषदेत मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सध्या माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये अंदाजे साल २००८ पासून ते २०२५ पर्यंत प्रोबिटी सॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड / टेक ९ सर्व्हिसेस हि कंपनी संपूर्ण सॉफ्टवेअर व देखभालीचे काम पाहत असून सदर कंपनी ही जुनी असून महानगरपालिकेच्या कामाचा अनुभव खूप जास्त असताना देखील फक्त आर्थिक हव्यासापोटी महानगरपालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने नव्याने निविदा प्रसिद्ध करून गरज नसताना GIS ERP चे कारण देऊन काम एका कंपनीला दिले आहे. असून यामध्ये महानगरपालिकेच्या गोपनीयतेची अत्यंत जबाबदारीने काळजी घेण्यात आलेली आहे आहे का? हा सवाल आमदार अमित गोरखे उपस्थित केला असता…

Read More

– २२ के.व्ही. रोहित्राचे ११ के.व्ही. रोहित्रांमध्ये रूपांतरण करा – आमदार महेश लांडगे यांचे निवेदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील महावितरणच्या २२ के.व्ही. स्तराच्या रोहित्राचे ११ के.व्ही. रोहित्रांमध्ये रूपांतरण करावे आणि अखंडित वीज पुरवठा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी गाव, तळवडे, चिखली, च-होली, दिघी, मोशी या भागात दाट लोकवस्ती आहे. तसेच, भोसरी एम.आय.डी.सी जे. एफ. एस व डी ब्लॉक, सेक्टर १० आणि १२ या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी येथे राहतात. भोसरी मतदार संघामध्ये लघुदाब…

Read More

बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वपक्षीय सहमती तळेगाव दाभाडे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ-मुळशी तालुक्यातील प्रतिष्ठेची बनलेली संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत सहमती दर्शवली आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडेल, यावर सर्वपक्षीय शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तथापि, संचालक मंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या मागणीमुळे काही फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. संचालक मंडळात नव्या चेहऱ्यांची मागणी आमदार सुनील शेळके यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाला आव्हान दिल्याचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शेळके यांनी हे स्पष्ट केले की, “नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाचा आदर असून, फक्त नव्या चेहऱ्यांना संधी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ग.दि. मांडगूळकर सभागृहात आर्किटेक, इंजिनियर, बांधकाम संघटनांच्या पदाधिकारी आण‍ि सदस्यासाठी चर्चासत्र घेण्यात आले. यात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी पीएमआरडीएच्या अधिकाधिक सेवा या ऑनलाइन करण्यावर भर देण्यात येत आहे. यावेळी उपस्थ‍ित मान्यवरांचे पीएमआरडीएची रचना, कार्यप्रणालीचा समावेश असलेली उपयुक्त दिनदर्शिका देत स्वागत करण्यात आले. प्रशासकीय स्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, प्रकल्प आणि सेवाबाबत अध‍िकाध‍िक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाकडून शंभर दिवसाच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि.20) पीएमआरडीएतर्फे ग.दि. मांडगूळकर सभागृहात इज ऑफ लिविंगच्या अनुषंगाने आर्किटेक, इंजिनियर्स…

Read More

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “नागरिकांच्या समस्या सोडवणे ही आमची जबाबदारी असून, ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधून समस्यांचे निराकरण करण्यावर आमचा भर राहील.” असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १६, १७ आणि १८ मधील नागरिकांसाठी “आमदार आपल्या दारी – संवाद | सेवा | समर्पण” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवार, २२ रोजी सकाळी चिंचवडे लॉन्स, बिर्ला हॉस्पिटल जवळ, चिंचवडगाव येथे संपन्न झाला. या वेळी आमदार शंकर जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताला दैदिप्यमान सांस्कृतिक, सामाजिक परंपरा लाभलेल्या आहेत. सांस्कृतिक वारसा जोपासत हा अमूल्य ठेवा देशातील जनतेसमोर आणण्यासाठी सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमांमधून नव्या पिढीला सांस्कृतिक परंपरांची माहिती मिळते. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, भारत सरकार उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत आयोजित केलेल्या लोकोत्सवामुळे पिंपरी चिंचवडकरांना महाराष्ट्र व ओरिसा मधील आदिवासी कला, संस्कृती पाहण्याची संधी मिळाली. यासाठी पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशने समन्वयाची उत्तम भूमिका पार पाडली आहे, असे मत विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र…

Read More