- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रावेत प्रधानमंत्री आवास योजनेतील निवड यादी व प्रतीक्षा यादी १ व २ मधील लाभार्थ्यांना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” त्या तत्वावर किवळे येथील आर्थिक दुर्बल प्रकल्पातील सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या वतीने करण्यात आले आहे. किवळे येथील प्रकल्पाअंतर्गत एकूण ७५५ सदनिका उपलब्ध होणार आहेत. या सदनिका “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर वाटप करण्यात येणार आहेत. सदनिकेची किंमत ₹13,00,718/- इतकी निश्चित करण्यात आली आहे.या प्रकल्पांमध्ये सदनिकेचा लाभ घेऊ रावेत प्रधानमंत्री…
चऱ्होली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चऱ्होलीतील,काळे कॉलनीतील ॲड. सचिन काळे युवा मंचचे अध्यक्ष ॲड.सचिन काळे यांना भारत सरकारने नुकतीच नोटरी म्हणून नियुक्ती केली असून ते चऱ्होली परीसरातील पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. व्यवसायाने ते वकील असून गेली 17 वर्षांपासून ते वकिली सोबतच गोरगरिबांना मोफत कायदेविषयक सल्ला व सेवा देत असतात. स्मित भाषिक असून साधी राहनी ही त्यांची खासियत असून त्यांनी अनेक अनाथआश्रमात ,वृद्धाश्रमत तसेच गरजूंना अन्नदान ते नेहमी करत असतात . मला “समाजाचे काहीतरी देणे आहे ‘आणि ते दिले गेले पाहिजे “या मानवतेच्या भावनेतून ते नेहमी समाजसेवा मदत करत असतात .यावेळी अँड. सचिन काळे म्हणाले की माझ्या व्यवसायातील काही…
शाहूनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री शाहू वाचनालयाच्या वतीने ग्रंथपूजन करून जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी म. फुले जेष्ठ नागरिक संघाचे भगवान गोडसे व वाचक विद्या रोहन राठोड यांच्या हस्ते ग्रंथपूजन व सरस्वती पूजन करण्यात आले. वाचनालायचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल , उपाध्यक्ष राजेंद्र घावटे , सचिव राजाराम वंजारी , खजिनदार राजेंद्र पगारे, जेष्ठ संचालक भरत गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल अनिता पाटील आणि रवींद्र अडसूळ यांनी केले. यावेळी विविध वक्त्यांनी पुस्तकांचे व वाचनाचे महत्व सांगितले.
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि अधिकारांसंदर्भातील प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या सूचना आणि अनुभव मांडले. नवजात अर्भक चोरी आणि मातेच्या मृत्यूप्रकरणी गंभीर चिंता उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन रुग्णालयांमध्ये होत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. शासकीय व खासगी रुग्णालयांतील बेफिकीरपणामुळे प्रसूतीनंतर मातेच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांकडेही त्यांनी लक्ष वेधले. रुग्णालयांमध्ये नवजात अर्भकांचे अपहरण रोखण्यासाठी व नवजात अर्भकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे, जेणेकरून नवजात अर्भक…
पिंपरी-चिंचवडमधील दुषित पाणी पुरवठ्यावरुन प्रशासनाची ‘धुलाई’ – भाजपा आमदार महेश लांडगे यांनी खडसावले
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणी पुरवठा होत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये शहर आणि उपनगरांमध्ये पिवळसर आणि दुषित पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा विषय गांभीर्याने घ्यावा. कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष खपवून घेणार नाही, अशा शब्दांत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना खडसावले आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे पाणी समस्याही वाढत आहे. शहरातील काही भागांत दुषित पाणी पुवठा होत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र, प्रशासनाकडून स्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केला जात होता. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी जलसंपदा विभाग, महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आंद्रा पाणी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विज क्षेत्रात दर्जेदार सेवा देणारी महावितरण कंपनी व महाराष्ट्रातील सर्वाधिक महसूल मिळवून देणारे पुणे झोन अंतर्गत कार्यरत तांत्रिक कर्मचारी यांचे महावितरण प्रशासना कडून ३ ते ४ वर्षापासून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने दीर्घ कालावधी पासून प्रश्न प्रलंबित आहे. सदर प्रलंबित प्रश्न सोडवणे साठी तांत्रिक कामगार युनियन रजि.नं.५०५९ वतीने महावितरण पुणे झोन कार्यालय , रास्तापेठ समोर बुधवार दि. १६ एप्रिल २०२५ लां प्रचंड द्वारसभा घेऊन निषेध व आक्रोश व्यक्त करण्यात आला. तात्काळ दीर्घ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ पासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार या द्वारसभेच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र महावितरण प्रशासनाने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड मनपा मधील व्यापाऱ्यांच्या एलबीटी आकारणीच्या संदर्भातील समस्यांचे पिंपरी चिंचवड सीए इन्स्टिट्यूट ची शाखा व महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड म न पा कडुन अनेक व्यापारी आणि उद्योजक यांना एल बी टी च्या संदर्भामध्ये आकारणी आदेश प्राप्त झाले असून सदर आकारणी करताना नियमबाह्य ,तसेच बेकायदेशीर पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने हे आदेश पारित करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड मध्येच विक्री आणि खरेदी असलेल्या विक्रीवर एलबीटी म्हणजे हा स्थानिक कर लागू होत नाही, ह्याचा तसेच इतर अनेक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निकालात काढण्यासाठी आम्ही ‘‘वाहतूक कोंडीमुक्त पिंपरी-चिंचवड’’ असा संकल्प केला आहे. त्या अनुशंगाने महानगरपालिका प्रशासन, वाहतूक पोलीस, एमआयडीसी, पीएमआरडीए अशा विविध अस्थापनांच्या एकत्रित पुढाकाराने ‘‘रेड स्पॉट’’ निश्चित केले आहेत. या भागातील वाहतूक सक्षम करण्यासाठी ‘‘मिसिंग लिंक’’चे काम पूर्ण करण्याचा निर्धार आहे. त्यामुळे आगामी काळात वाहतूक सक्षमीकरण सोपे होईल, अशी भूमिका भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी मांडली. महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्त्यावरील ऑटो क्लस्टर ते आयुक्त निवासस्थान दरम्यानच्या इंडोलिंक युरोसिटी औद्योगिक परिसरातील मिसिंग लिंक रस्ता विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.यामुळे काळेवाडी फाटा ते…
उपसभापती कार्यालयात अर्पण करण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायक असून, या घटनेबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पुण्यातील काही पर्यटक काश्मीरमध्ये अडकले असल्याची माहिती समजताच, डॉ. गोऱ्हे यांनी तत्काळ ज्योती झुरंगी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. शासनाकडून लवकरच विमान व्यवस्थेची योजना आखली जात असून संबंधितांना याबाबत लवकरच माहिती कळवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. अडकलेल्या पर्यटकांची जे स्थानिक रहिवासी काळजी घेत आहेत, त्यांचेही त्यांनी मन:पूर्वक आभार मानले. “स्वतःचीही काळजी घ्या आणि महाराष्ट्रात परतल्यावर संपर्क साधा,” असा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू नागरिकांना भारतीय जनता पार्टी (भाजपा) पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. बुधवारी, सकाळी पिंपरी येथील मोरवाडी येथील भाजपा कार्यालय परीसरात या घटनेचा निषेध नोंदवून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आमदार तथा भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. आमदार शंकर जगताप म्हणाले की, पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात पुण्यातील नागरिकांचाही समावेश होता. या घटनेमुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या…
