Author: maharashtrabreakingnews.com

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बालगंधर्व रंगमंदिर कलादालनामध्ये सुमारे आठ ते नऊ कलाकारांनी सहभाग घेऊन नुकतेच चित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी चित्र प्रेमिनी गर्दी केली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते नुसतेच झाले. कार्यक्रमाच्या वेळी श्री लाहोटी यांनी दीप प्रज्वलन केले. सहभागी चित्रकार शशिकांत डोळस यांनी सूत्रसंचालन केले. अरुण काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गणेश ढोले प्रमोद कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमा वेळी श्री लाहोटी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व सहभागी कलाकारांचे कौतुक केले . “कलाकारांनी एकत्र येऊन आपल्या कलेची जोपासना करायला हवी ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले.”…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जम्मु कश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या विरोधात गणेश लंगोटे मित्र परिवार व मोहन नगर येथील नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज कमान चौक मोहन नगर येथे गुरुवार दिनांक २४ एप्रिल रोज़ी निषेध व्यक्त करुण या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करण्यसाठी सर्व नागरीक एकत्र आले . या श्रद्धांजली आणि निषेधच्या कार्यक्रमात गणेश लंगोटे, कैलास कुटे, अनिल राऊत, चंद्रकांत मोरे, विष्णु चावरिया, रमेश कोठारी, शरद थोरात आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.

Read More

“दहशतवाद संपलाय, तर हल्ले होतायत कसे?” प्रमोद क्षिरसागर यांचा सवाल निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा गेलेला बळी हा अत्यंत वेदनादायक आणि संतप्त करणारा आहे. या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ निगडी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आणि सर्वधर्मीय नागरिकांच्या सहभागातून कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल रोजी रुपीनगर येथील एकता चौकातून सुरू झालेला हा मार्च आझाद चौक (सेक्टर २२) येथे संपन्न झाला. “पाकिस्तान मुर्दाबाद”, “दहशतवाद मुर्दाबाद”, “भारत जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मेणबत्त्या प्रज्वलीत करून नागरिकांनी मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. शांततेचा आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या मार्चमध्ये…

Read More

परंदवडी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या प्रयत्नातून परंदवडी येथील दलितवस्तीमध्ये ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत बांधण्यात आलेल्या समाजमंदिराचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या उपयुक्त सामाजिक प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांना सामूहिक उपक्रमांसाठी व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी एक छताखाली जागा उपलब्ध झाली आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या आमदार स्थानिक विकास निधी २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत लेखाशिर्ष ४५१५ अंतर्गत सुमारे २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. ठेकेदार ओंकार अनिल टेकवडे यांच्या मार्फत हे काम सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर), पुणे येथील कार्यकारी अभियंता यांच्या देखरेखीखाली संपूर्ण काम मार्गी लावण्यात आले. समाजमंदिराचे हे बांधकाम स्थानिक दलित…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सध्या सर्वत्र तीव्र उष्णतेचा पारा चढला आहे. देशभरात पुढील ४८ तास उष्णतेची लाट, गरम आणि दमट हवामान कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराला देखील या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे. उन्हात बाहेर पडताना डोकं झाकून ठेवावं, पुरेसे पाणी प्यावं आणि थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करावा असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार २६ एप्रिलनंतर महाराष्ट्रात उष्णतेची लाट ओसरण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत गरम हवामानाचा सामना करावा लागणार आहे. म्हणून तीव्र उन्हाच्या…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागामार्फत शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना थकीत रक्कम भरणेबाबत यापूर्वीच मालमत्ता कर थकबाकीदारांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, प्रकरण ८, नियम ४१ व ४२ अन्वये जप्तीपूर्वीची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. तथापि चालू वर्षाचे मालमत्ता कराचे बिलाचे वाटप सुरू असून मागील आर्थिक वर्षात मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत पहिल्या सहामाहीसाठी ३० सप्टेंबर आणि दुसऱ्या सहामाहीसाठी ३१ डिसेंबर अशी होती अशा ७१,९९९ (एका हत्तर हजार नऊशे नव्यांनऊ ) थकबाकीदारांनी निर्धारित वेळेत कर भरलेला नसल्यामुळे,या थकबाकीदारांवर प्रत्येक महिन्यासाठी २ टक्के शास्ती (दंड) लागू करण्यात आली आहे. जी संपूर्ण थकबाकी भरणेपर्यंत लागू राहणार आहे. अशा…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यातील विकासकामांचा दर्जा अबाधित राहावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आज पार पडलेल्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कामांच्या गुणवत्तेबाबत जोरदार भूमिका मांडत, दर्जामान्य विकासासाठी उपाययोजना राबवण्याचा आग्रह धरला. या मुद्द्यावर त्यांनी यापूर्वीही विधानसभेत आवाज उठवला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सुमारे १३७९ कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यात विकासकामांच्या गुणवत्तेसाठी विशेष भर देण्यात आला. महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे: जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १५ लाख रुपयांपेक्षा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरीतील अक्वाटेक सिस्टम्स आशिया प्रा. लि. या कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांनी गेल्या काही काळात भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत योग्य तोडगा निघावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासत्व स्वीकारले आहे. या कामगारांच्या मागण्या व अडचणींच्या पार्श्वभूमीवर दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी कंपनीच्या प्रांगणात द्वारसभा पार पडली. या वेळी युनियन बोर्डचे अनावरण करण्यात आले. भोसरी विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकार अक्षय शिंदे व तुषार सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली युनियन बांधणीच्या उपक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे साहेब, पिंपरी-चिंचवड शहर मनसे अध्यक्ष सचिन चिखले, उपशहरअध्यक्ष विशाल मानकरी, कामगार सेनेचे शशांक तिकोने यांचे मार्गदर्शन लाभले. या बैठकीदरम्यान…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर सोमवारपासून (दि.२१) कारवाई करण्यात येत आहे. यात हवेली आणि मुळशी तालुक्यात तीन ठिकाणी एकाच वेळी अनधिकृत होर्डिंगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे संबंधितांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी प्राधिकरणाकडे ४८ लाखांची रक्कम जमा केली आहे. हवेली तालुक्यातील वडकी, मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथून कारवाईस सुरूवात करण्यात आली. या कारवाईमुळे होर्डींगधारक व ॲडव्हरटायझिंग कंपनी यांनी धसका घेतला असून प्राधिकरणाच्या विकास परवानगीकडे अंतिम चलणे भरण्यास सुरुवात झाली आहे. २२ एप्रिलपर्यंत एकूण १० होर्डींगधारकांनी अंतिम चलणाची रक्कम ४८ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. संबंधित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर…

Read More

तळेगाव दाभाडे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- तळेगावकरांची नाट्यगृहाची मागणी पूर्ण होणे अवघड नाही. ‘तळेगाव दाभाडेमधील लाडक्या बहिणींनाच नाट्यगृह हवं आहे’, असे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना सांगा म्हणजे लवकर निधी मिळेल, अशी मिश्किल टिपणी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केली. दरम्यान, जगभरातील दहशतवाद्यांच्या धर्माविषयी कल्पना काढून टाकून त्यांचा ब्रेनवॉश करण्याचे ईश्वराला साकडे घालतो, असेही अनासपुरे म्हणाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे तळेगाव दाभाडे शाखेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेते अनासपुरे बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात नांदी, गणेश वंदना व मैत्र यमन रागात सादर झालेल्या सतार वादनाने झाली. दरम्यान, यंदाचा कलागौरव पुरस्कार हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक…

Read More