Author: maharashtrabreakingnews.com

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल साेमवारी जाहीर केला असून, राज्यात पुन्हा एकदा काेकण विभागाने ९६.७४ टक्के घेत बाजी मारली आहे. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, यात गतवर्षापेक्षा १.४९ टक्के घट झाली आहे. विशेष म्हणजे, मुलांपेक्षा मुलीच हुशार, हे स्पष्ट झाले. मुलांच्या तुलनेत मुली ५.०७ टक्के अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी याबाबत माहिती दिली. नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला एकूण १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते, त्यापैकी १३ लाख ०२…

Read More

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप शहराध्यक्ष आमदार जगताप यांचे ‘धक्का तंत्र’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून आम आदमी पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यासह ‘आप’ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विभाग प्रमुख प्रदीप महाजन यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात (भाजप) दाखल झाले आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल, आमदार हेमंत रासने, आमदार उमा खापरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरातील १३ मंदिर आणि १९ मशीद तसेच इतर धार्मिक स्थळांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अनाधिकृत बांधकाम काढून घेण्याच्या नोटीस देण्यात आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख विरोधी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी तसेच सामाजिक संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना निवेदन देण्यात आले.यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव जी कांबळे, शिवसेनेचे माजी आमदार एडवोकेट गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, काँग्रेस पक्षाचे विश्वनाथ जगताप, संभाजी ब्रिगेडचे धनाजी येळकर पाटील, सतीश जी काळे, मराठा सेवा संघाचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणाऱ्या लोकशाही दिनानिमित्त आज महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत एकूण ३ तक्रारवजा सूचना प्राप्त झाल्या. यामध्ये महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ च्या काळेवाडी येथील समस्या, लोकशाही दिन अर्जातील समस्या तसेच महत्वाचा दूरध्वनी क्रमांक असणारा फलक बसविणे याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिका-यांना त्याबाबत विविध सूचनाही केल्या. या लोकशाही दिनानिमित्त नागरिकांनी मांडलेल्या समस्यांमध्ये शहरातील सर्व स्मशानभूमी या सुशोभित कराव्यात, शहरातील सर्व…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली – कुदळवाडी भागात महापालिकेकडून टिपी स्कीम राबविण्याबाबत वर्तमानपत्रात नोटीफिकेशन प्रकाशित झाल्यानंतर त्याविरोधात स्थानिक गावकरी एकवटले आहेत.सोमवार(ता.५)रोजी गावकरी,व्यापारी आणि उद्योजक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.या स्कीमला कडाडून विरोध करण्यात येणार असून,वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.यावेळी नोटिफिकेशनची होळी करण्यात येऊन,पालिकेचा निषेध करण्यात आला. गावकऱ्यांना जशी नोटोफिकेशनची खबर लागली,तसेच त्यांनी एकमेकांना सूचित करून तत्काळ बैठकीचे आयोजन केले.जर टीपी स्कीम लादली गेली तर पालिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा बैठकीत वक्त्यांनी दिला.तसेच कुणालाही विश्वासात न घेता,असे नोटीफिकेशन प्रसिद्ध करणे म्हणजे हुकूमशाही मानसिकतेचे द्योतक असल्याचे मत वक्त्यांनी यावेळी मांडले. पालिकेचा कारभार हा लोकशाही…

Read More

सोमाटणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुन्या मुंबई पुणे हायवे वरील सोमटणे टोलनाच्या येथे टीम आयएएसतर्फे सर्व लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी मोफत मुक्काम व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले. जगभरातील सायकल स्वार भारत भ्रमण करत असताना त्यांना अशा व्यवस्थेचा खूप फायदा होतो कारण आतापर्यंत सोसायटीचे सायकलिस्ट संपूर्ण भारतभर यांनी सायकल भ्रमण केले आहे पुणे ते कन्याकुमारी पुणे ते गोवा पुणे ते हम्पी पुणे ते गुजरात सोमनाथ अशा सर्वात मोठे देशातील सर्वात मोठ्या ग्रुप रेड देखील संस्थेतर्फे यशस्वीपणे आयोजित केले गेले आहेत. मागील दहा वर्षापासून “अतिथी देवो भव, वसुधैव कुटुम्बकम” या उक्तीप्रमाणे संस्थेतर्फे जगभरातील ऍथलेट लोकांचे मोफत मुक्कामाची सोय वडगाव मावळ, लोणावळा, खेड शिवापुर,…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जनता दरबारात उपस्थित वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “जनतेशी थेट संवाद आणि त्यांच्या अडचणींचे त्वरित निराकरण हेच खरे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी करत, त्यांचा जनता दरबार उपक्रम पुन्हा एकदा नागरिकांच्या भरघोस उपस्थितीमुळे यशस्वी ठरला. वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात आमदार शेळके यांनी विविध समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे सविस्तर ऐकून घेतले. मागील साडेपाच वर्षांप्रमाणे दर सोमवारी होणाऱ्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रलंबित शासकीय कामे, शैक्षणिक व आरोग्य विषयक अडचणी, योजनांचा लाभ, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा यासंबंधी अनेक तक्रारी व सूचना नागरिकांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमुख  हरेश आबा नखाते यांच्या वाढ दिवसा निमित्त आबा श्री चषक बॅडमिंटन लीग स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. गेली दहा दिवस या स्पर्धा चालू होत्या. या कालावधीमध्ये धनाजी येळकर, हरीश आप्पा मोरे शिव चरित्रकार निलेश मरळ देशमुख, शामराव काळे, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, सचिन काळे, बाळासाहेब तांबे, विलास नढे, छावा संघटनेचे मनोज अण्णा मोरे, सचिन लिमकर, रामभाऊ सूर्यवंशी, संजय कांबळे,अण्णा खोबरे, अक्षय बोडके आदी उपस्थित होते. अ गटातील प्रथम क्रमांकाचे विजेते दिग्विजय…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – माजी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप व पतंजली हरिद्वारचे स्वामी आदित्य देव यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक -18, चिंचवडगाव, केशवनगर, गोयल गरिमा येथील अद्यावत योग प्रशिक्षण केंद्र या इमारतीचे भुमिपुजन झाले. या प्रसंगी  माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर , अश्विनी चिंचवडे , माधुरी कुलकर्णी, डॉ. अजित जगताप, हिरामण भुजबळ, लक्ष्मण जोशी, गतिराम भोईर, पंजाबराव मोंढे, दीपक गावडे सुरेश आगवणे, सुभाष मालुसरे, नुतन चव्हाण, दिपाली कलापुरे, चैताली भोईर,  आदी इतर योग साधक व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन या संस्थांच्या वतीने पुढील महिन्यात होणाऱ्या सातव्या विश्वबंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गजलकार सिराज शिकलगार यांची, तर स्वागताध्यक्षपदी विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षा प्रा. भारती जाधव यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. सिराज शिकलगार यांच्या ४२ साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या असून, त्यामध्ये २८ गजलसंग्रहांचा आणि ९ काव्यसंग्रहांचा समावेश आहे. प्रा. भारती जाधव या भगवान बुद्ध, भगवान महावीर, संत कबीर या महामानवांच्या मूल्यविचारांच्या अभ्यासक आहेत. संमेलनाच्या नियोजनासाठी प्राचार्य डॉ. अरुण आंधळे आणि…

Read More