ताज्या घडामोडीपिंपरीमावळ

ग्लोबल सायकलिस्टसाठी इंडो ऍथलेटिक्स सोसायटी तर्फे सोमाटणे येथे मोफत मुक्काम व्यवस्थेचे उद्घाटन

Spread the love

 

सोमाटणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुन्या मुंबई पुणे हायवे वरील सोमटणे टोलनाच्या येथे टीम आयएएसतर्फे सर्व लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी मोफत मुक्काम व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले. जगभरातील सायकल स्वार भारत भ्रमण करत असताना त्यांना अशा व्यवस्थेचा खूप फायदा होतो कारण आतापर्यंत सोसायटीचे सायकलिस्ट संपूर्ण भारतभर यांनी सायकल भ्रमण केले आहे पुणे ते कन्याकुमारी पुणे ते गोवा पुणे ते हम्पी पुणे ते गुजरात सोमनाथ अशा सर्वात मोठे देशातील सर्वात मोठ्या ग्रुप रेड देखील संस्थेतर्फे यशस्वीपणे आयोजित केले गेले आहेत.

मागील दहा वर्षापासून “अतिथी देवो भव, वसुधैव कुटुम्बकम” या उक्तीप्रमाणे संस्थेतर्फे जगभरातील ऍथलेट लोकांचे मोफत मुक्कामाची सोय वडगाव मावळ, लोणावळा, खेड शिवापुर, पुणे, पिंपरी चिंचवड ठिकाणी करण्यात आली आहे. आता यामध्ये अजून एक ठिकाण सोमाटणे टोल नाका समाविष्ट करण्यात आले, उद्घाटन प्रसंगी आयर्न मॅन सचिन वाकडकर, निलेश म्हेत्रे साहेब, महादेव तूपारे साहेब, सुरवसे साहेब आदी मान्यवर तसेच इंडो ऍथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील, गिरीराज उमरीकर, श्रीकांत चौधरी उपस्थित होते, भविष्यामध्ये संपूर्ण देशामध्ये अशाप्रकारे सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे इंडो अथलेटिक सोसायटी संस्थेतर्फे सांगण्यात आले. तसेच आपण प्रत्येक टोल नाक्यावर नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया माध्यमातून संपूर्ण देशभर टोलनाक्यावर अशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

याप्रसंगी मुकुंद दांगट पाटील, युवराज पाटील, संदीप परदेशी, सुनील जी चाको, कैलास शेट तापकीर, मदनजी शिंदे, अविनाश चौगुले, मारुती विधाते, अजित गोरे, किरण भावसार, महेंद्र पाटील, नागना इंडी, तुषार पाटील, सतीश भोसले आदी मान्यवर तसेच सोमाटणे टोल प्लाजा येथील चे कर्मचारी देखील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button