Author: maharashtrabreakingnews.com

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचा प्रस्ताव; सर्व सदस्यांची एकमताने मंजुरी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कला, क्रीडा व साहित्य समितीची आढावा बैठक कला, क्रीडा व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीत शहरातील कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील धोरणांवर सकारात्मक व सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत शहरातील कलाकार, खेळाडू व साहित्यिक यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन उपक्रम राबविणे, त्यांना योग्य सन्मान देणे तसेच त्यांच्या कर्तृत्वाची दखल शहर, राज्य व राष्ट्रीय स्तरावर कशी घेतली जाईल याबाबत विस्तृत विचारमंथन करण्यात आले. या बैठकीस कला, क्रीडा व साहित्य समितीचे सदस्य…

Read More

नवनियुक्त शहराध्यक्ष विलास कांबळे यांना काम सुरू करण्याचे रामदास आठवले यांचे आदेश पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्वसामान्य जनतेला संविधानाद्वारे हक्क दिले आहेत. याची माहिती घरोघरी पोहोचली पाहिजे. यासाठी मी स्वतः आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी एक मे पासून महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. यामध्ये विभागीय व जिल्हास्तरावर मेळावे आयोजित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिव, फुले, शाहू यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे आदेश आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी मुंबई येथे दिले. पिंपरी चिंचवड आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या वतीने आयआयटी, हैदराबाद येथे आयोजित केलेल्या “नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज हॅकॅथॉन २०२६ अ‍ॅक्सिलरेटिंग हेल्थ क्लेम्स जर्नी” या स्पर्धेत पीसीसीओइच्या टीमने प्रथम क्रमांक पटकावला आणि पाच लाख रुपयांचे बक्षीस मिळवले. या टीम मध्ये तृतीय वर्ष विद्यार्थी अभिषेक निकम, तृप्ती सुकाळे, कोसदा भट आणि द्वितीय वर्ष विद्यार्थी हर्षिल बियाणी व अंश दुधे यांचा समावेश होता. पीसीसीओई चे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. अनुराधा ठाकरे, सह प्राध्यापक डॉ. सांत्वना गुडधे यांनी मार्गदर्शन केले. ही स्पर्धा हैदराबाद येथे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण द्वारा आयआयटी हैदराबाद, एनआरसीइएस, जनरल इन्शुरन्स कौन्सिल, गुगल, इंडिया…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात (दि. १ एप्रिल २०२५ ते २४ मार्च २०२६) तब्बल ८६० कोटी ५९ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कर संकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज, विविध सवलतींची प्रभावी अंमलबजावणी तसेच ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर रवि लांडगे यांनी सर्व करदात्यांचे आभार मानले असून, ज्या थकबाकीदार नागरिकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन तात्काळ कर भरणा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. थकबाकीदार…

Read More

मुख्यमंत्री महोदयांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे प्रश्न मार्गी लागणार – आमदार अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत मांडला अधिवेशनातील कामकाजाचा लेखाजोखा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पिंपरी-चिंचवड शहराच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडण्यात यश आले आहे. केवळ प्रश्न मांडले नाहीत, तर मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून त्याबाबत सकारात्मक कृती आराखडा आणि निधीचे ठोस आश्वासनही मिळवले आहे, अशी माहिती आमदार अमित गोरखे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अधिवेशनानंतर आयोजित या विशेष पत्रकार परिषदेत आमदार गोरखे यांनी शहराच्या विकासासाठी उचललेल्या पावलांचा सविस्तर आढावा घेतला. शहराच्या विस्तारित भागातील रस्ते, उड्डाणपूल आणि पाणीपुरवठा योजनांसाठी राज्य शासनाकडून विशेष निधी…

Read More

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव, चाकण, कान्हे, उर्से, टाकवे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, युवा उद्योजक रणजीत काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.        हा नोकरी महोत्सव येत्या २८ मार्च रोजी सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ या वेळेत तळेगाव दाभाडे येथील यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, इंद्रायणी  महाविद्यालय येथे होणार आहे. या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला इंद्रायणी विद्यमंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, माजी मंत्री संजय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अहिंसा सप्ताहाची सुरुवात कासारवाडी येथील पगारिया सभागृहात भक्तामर पठनाने आणि प्रार्थना करून करण्यात आली. या भक्तामर पठण कार्यक्रमांमध्ये सुमारे अडीचशे भाविकांनी सहभाग घेतला. यावेळी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कासारवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष विलास कुमार पगारिया यांनी उपस्थितांचे  आणि महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत केले. महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी सप्ताहात होणाऱ्या  कार्यक्रमाची  माहिती दिली .आणि कासारवाडी जैन श्रावक संघ आणि पार्श्वनाथ युवक मंडळ यांनी ह्या संयोजनासाठी पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे स्वागत केले.संयोजक  किरण भंडारी ,मयुर पगारिया ,पंकज कांकरिया यांचा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला . याच दिवशी दुपारी भगवान…

Read More

आरपीआय नवीन कार्यकारणी जोमाने काम करेल – बाळासाहेब भागवत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक असणारा मोठा वर्ग पिंपरी चिंचवड शहरात वर्षानुवर्ष कार्यरत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिव, फुले, शाहू यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरात करीत आहोत, हेच काम आणखी जोमाने करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची पिंपरी चिंचवड शहर नवीन कार्यकारणी जाहीर करत असल्याची माहिती आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत यांनी बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.      पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष पदावर विलास कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.…

Read More

पीसीयू येथे सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस प्रमाणपत्र वितरण समारंभ पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  उद्योग संस्था आणि शिक्षण संस्था यांनी एकत्रित येऊन विद्यार्थ्यांना संशोधन, उद्योजकता आणि कौशल्य आधारित करिअरच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) संचालक प्रशांत जोगळेकर यांनी केले. पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे “सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस”(एसआयसी) प्रमाणपत्र वितरण समारंभात जोगळेकर यांनी नवोपक्रम आणि कौशल्य विकासाचे महत्व या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपला वेळ नियोजन पूर्वक पद्धतीने शिकण्यासाठी घालवला तर तुमचा, तुमच्या कुटुंबियांचा आणि देशाचा विकास होईल असेही जोगळेकर यांनी सांगितले. यावेळी सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पसचे प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. शशांक…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणित हे आपल्या सगळ्यांच्या आर्थिक स्थितीशी जोडले गेलेले आहे. या गणितामुळे वास्तव जीवनातील समस्या सोडवण्यात यश मिळते. डेटा अ‍ॅनालिटिक्स व निर्णय प्रक्रियेमध्ये देखील याचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांनी गणित केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात वापरले पाहिजे, असे प्रतिपादन सांख्यिकी तज्ज्ञ व अ‍ॅनालिटिक्स डॉ. दिनेश हेलवाडे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) वतीने रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओइआर) मध्ये मॅथेक्स क्लब तर्फे राष्ट्रीय स्तरावरील गणित प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. किंग्सफॉल्क या संस्थेचे प्रायोजकत्व मिळाले होते. यावेळी प्रख्यात सांख्यिकी तज्ज्ञ व अ‍ॅनालिटिक्स डॉ. दिनेश हेलवाडे, किंग्सफॉल्क संस्था…

Read More