Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील पिंपरी कॅम्प भागातील व्यापारी यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका रस्ता रुंदीकरण करणार असल्याचे निदर्शनास आले. पिंपरी येथील व्यापारी संघटनांनी विधानसभा उपाध्यक्ष आणि पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी संपर्क साधला. तत्पर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यापारी संघटनांशी पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते धनराज असवानी यांच्या कार्यालयात एक बैठक घेऊन व्यापारी आणि नागरिक यांच्या अडचणी समजून घेतल्या. दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, व्यापारी आणि नागरिक यांची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयात बैठक बोलावली. या वेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापालिकेचे उपसंचालक नगर रचना प्रताप गायकवाड ,शहर अभियंता मकरंद निकम व्यापारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते. त्यांचे जीवन, त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार हे आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले त्याग आणि समर्पण हे अतुलनीय आहे. सावरकरांनी ‘हिंदुत्वा’ची संकल्पना मांडून देशाच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञाननिष्ठा, सामाजिक सुधारणा आणि भाषाशुद्धी यावर त्यांनी भर दिला. आजच्या युवा पिढीने सावरकरांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांचे कार्य पुढे नेणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Read More

प्रतिबिंब प्रतिष्ठान’चे  लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 समारंभ उत्साहात संपन्न पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ या सामाजिक उपक्रमाचे  लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 समारंभ रविवारी पुण्यातील JW Marriott हॉटेल येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेरणादायी वातावरणात पार पडला. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी मंत्री जयकुमार  गोरे, आयुषमान भारत मिशनचे डॉ. ओमप्रकाश शेटे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, मंत्रालय तथा विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, डिजीटल मीडिया संघाचे राजा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या दोन दिवसापासून मुळशी येथील हगवणे कुटुंबाच्या विषयामध्ये संकेत नरेश चोंधे या व्यक्तीचे नाव समोर येत आहे.मी संकेत सुरेश चोंधे(   I am Sanket Suresh chaundhe ) राहणार विशाल नगर, पिंपळे निलख.माझा या प्रकरणाशी दुरान्वय कोणताही संबंध नाही. नावातील साधर्म्यमुळे समाजातील विविध स्तरातून मला संपर्क होत आहे परंतु या किंवा तत्सम असल्या कोणत्याही प्रकरणातमाझा काहीही संबंध नाही, असा खुलासा संकेत सुरेश चौँधे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. मी भारतीय जनता पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी असून मी भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभा निवडणूक संयोजक अशा जबाबदारीच्या पदांवर काम केले आहे. माझे वडील…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसएइ) इंडिया आणि जॉन डिअर इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘तिफन २०२५’ या राष्ट्रीय कृषी यंत्रणा स्पर्धेत पीसीसीओईच्या ‘टीम ॲब्युश’ ने प्रथम क्रमांक पटकावून पीसीईटीच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. अहिल्यानगर मधील राहुरी कृषी विद्यापीठ येथे या स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी देशभरातील ७४ नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध संघ, त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. पीसीसीओईच्या ‘टीम ॲब्युश’ने विकसित केलेल्या ‘कृषिरथ ७.०’ ने या स्पर्धेतील सर्व टप्प्यातील सर्व निकष पूर्ण करीत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित २००९ साली स्थापन झालेल्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम)  (S. B. Patil Institute of Management (SBPIM)  ) या नामवंत व्यवस्थापन महाविद्यालयाने आपल्या यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून शैक्षणिक स्वायत्तता (‘अकॅडमिक ऑटोनॉमी’) बहाल करण्यात आली आहे. ही स्वायत्तता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट या १९९० पासून कार्यरत असलेल्या ख्यातनाम शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत कार्यरत आहे. विविध क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली असून    (Pimpri Chinchwad Police Commissioner Vinay Kumar Choubey and Municipal Commissioner Shekhar Singh inspected the Palkhi Marg today, Tuesday (May 27).)    पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पालखी मार्गाची आज, मंगळवारी (२७ मे) पाहणी केली. पिंपरी चिंचवड शहरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी आगमन होणार असून यादिवशी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये २० जून रोजी आगमन होणार असून त्याच दिवशी पालखी पुण्याच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखीचे १९ जून रोजी तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचे २० जून रोजी पिंपरी चिंचवड शहरात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेसह इतर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून सोहळा यशस्वीपणे पार पाडावा, असे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती, संत तुकाराम महाराज देवस्थान समिती, महाराष्ट्र वारकरी महामंडळ, श्री विठ्ठल रुक्मिणी…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मावळ तालुक्याच्या कृषी विकासावर लक्ष केंद्रित करत आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मावळ तालुक्यात शीतगृह, सेंद्रिय शेती, इंद्रायणी तांदूळ व गुलाब फुलांवर प्रक्रिया करणारी केंद्रे उभारण्यासाठी आवश्यक जागा स्थानिक शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत राज्यात १२५० कृषी प्रकल्प मंजूर असून त्यापैकी ५५० प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत. यामध्ये धान्य गोदाम, कांदा चाळ, शीतगृह, राईस मिल, ऑईल मिल, पशुखाद्य युनिट यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ३०…

Read More

आमदार शंकर जगताप यांची लोकाभिमुख भूमिका चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रारूप विकास आराखड्यातील रस्ते व आरक्षणांच्या विरोधात नागरिकांच्या हरकती व सूचना जाणून घेण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी प्रेरणा शाळा मैदान, भोंडवे नगर येथे नुकताच भव्य मेळावा घेतला. नागरिकांनी आपल्या तक्रारी व आक्षेप स्पष्टपणे मांडले असता, आमदार शंकर जगताप यांनी “विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्व नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील,” अशी ग्वाही दिली. महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यानुसार १२, १५ आणि २४ मीटर रुंदीचे रस्ते आरक्षित करण्यात आले आहेत. यामुळे अनेक नागरिकांच्या घरांवर थेट परिणाम होणार असून काहींना बेघरही व्हावे…

Read More