Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपळे निलखमध्ये ‘हरित क्रांती’ची सुरुवात आम आदमी पार्टी चे युवक शहरध्यक्ष रविराज काळे यांच्या पुढाकाराने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्यातून वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपळे निलख परिसरात हरित क्रांतीची प्रेरणादायी सुरुवात करण्यात आली. “वृक्ष रुपी हिरवी ओळख” या संकल्पनेतून आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या पुढाकाराने व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या सहकार्यातून वृक्षारोपण उपक्रम पार पडला. या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, उद्यान अधिक्षक योगेश वाळूंज,सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड, उद्यान सहाय्यक अनिल गायकवाड, तसेच पिंपळे निलख…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरीमधील मासुळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालयाने नेत्र उपचार सेवांमध्ये भरीव सुधारणा करत नवीन नेत्र शस्त्रक्रिया कक्षाची उभारणी केली आहे. या कक्षाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यामुळे आता दररोज ३० ते ३५ शस्त्रक्रिया करणे शक्य होणार असून, यापूर्वीची २० ते २५ शस्त्रक्रियांची सरासरी क्षमता लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे. परिणामी, रुग्णांच्या प्रतीक्षेचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वेळेवर उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या नवीन शस्त्रक्रिया कक्षात उच्च दर्जाचे मायक्रोस्कोप आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री बसविण्यात आली असून हे साहित्य कॉटकॅम इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. या संस्थेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत उपलब्ध…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) –  पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृह प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘ग्रीन सोसायटी’ हा उपक्रम सुरू केला आहे. स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश असून, हे पाऊल पर्यावरणस्नेही परिसर आणि जबाबदार नागरी जीवनशैली निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सोसायट्यांचे मूल्यांकन करण्यासाठी काही प्रमुख निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे, सोसायटीमध्ये सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्टिंग करणे, सौरऊर्जेचा वापर करणे, पावसाचे पाणी साठवणे (रेन वॉटर हार्व्हेस्टिंग), आणि सांडपाण्याची शुद्धीकरण व पुनर्वापर यंत्रणा बसविणे. प्रत्येक निकष पूर्ण केल्यावर सोसायटीला एक ‘ग्रीन स्टार’ दिला जाईल. सर्व…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहराचे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी तसेच हवा, वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ सारखे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. ‘वॉक विथ कमिशनर’ (चालता-बोलता) या उपक्रमांतर्गत आज पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान येथे आयुक्त श्री. सिंह यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला.  (Under the initiative ‘Walk with Commissioner’ (Chalata-Bolta), Commissioner Shri. Singh visited Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Udyan in Purnanagar today and interacted with the citizens.)  यावेळी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५’ नुसार वृक्षसंवर्धनाच्या उपाययोजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने “वृक्षारोपण सप्ताह २०२५”  (“Arbor Day 2025”)  आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ०५ जून २०२५ रोजी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान येथे करण्यात आली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता ३२ वृक्षांचे रोपण करून अभियानाची औपचारिक सुरुवात झाली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त अण्णा बोदडे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग  न्यूज) –  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाने भारले होते. भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहरभर विविध संस्था, राजकीय पक्ष आणि प्रशासकीय विभागांनी सहभागाने वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले. आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न  काटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमांमध्ये स्थानिक नेते, प्रशासकीय अधिकारी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. ‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’तर्फे पिंपळे सौदागर येथे वृक्षारोपण  (Tree plantation at Pimple Saudagar by ‘Shatrughan Kate Youth Foundation’) पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे ‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’ने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, पिंपरी, पुणे (dr. Dy patil dental college and hospital) येथील सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास कुलपती डॉ. पी. डी. पाटील , प्र-कुलपती भाग्यश्री  पाटील ,  (Chancellor Dr. P. D. Patil, Pro-Chancellor Bhagyashree Patil )   कुलगुरु डॉ. एन. जे. पवार , प्र-कुलगुरु डॉ. स्मिता जाधव मॅडम आणि कुलसचिव डॉ. जे. एस. भवाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दंत महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे उपक्रम यशस्वीपणे पार पडले. यंदाच्या जागतिक तंबाखूविरोधी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरी समस्या, विकास प्रकल्प, वाहतूक आणि पायाभूत सुविधांसंदर्भातील अनेक मुद्यांवर आमदार शंकर जगताप आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यात विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत महापालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीस सहआयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त मनोज लोणकर, पाणीपुरवठा व स्थापत्य विभागाचे प्रमुख अभियंता प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता देवअण्णा गट्टूवार व बापू गायकवाड, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, पर्यावरण विभागाचे प्रमुख अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहशहर अभियंता मनोज शेटीया आणि स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांच्यासह संबंधित अधिकारी…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अहिल्यादेवी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त  व तीनशे झाडे लावण्याचा संकल्प हाती घेतला तसेच नक्षत्रांची झाडे लावण्याचा एक उपक्रम ट्रान्सपोर्ट नगरी येथील सूर्यमुखी मंदिराच्या उद्यानामध्ये केला. कार्यक्रमाचा नियोजन मंडलाध्यक्ष जयदीप खापरे तसेच हनुमान मंदिराचे ट्रस्ट व सर्व पदाधिकारी प्राधिकरणातील जेष्ठ नागरिक यांनी केले. वृक्षारोपण विधान परिषद आमदार अमित गोरखे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळीक तसेच हास्य क्लब प्राधिकरणाचे अध्यक्ष जगन्नाथ वैद्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच माजी उपमहापौर शैलेजा मोरे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेविका शर्मिला राजू बाबर, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक माऊली थोरात,…

Read More

लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोणावळा शहरात विविध विकासकामांचा पाहणी दौरा व आढावा बैठक आज (गुरुवारी) पार पडली. आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या उपस्थितीत या बैठकीत शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या दौऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या संदर्भात जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना आदेश देत येत्या सोमवारपासून हे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली: * *लोणावळा भाजी मंडईची दुरुस्ती व व्यवस्थापन*, * *खंडाळा माध्यमिक शाळेच्या जागेचा वापर* * *रिक्षा…

Read More