- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पीसीसीओइआर येथे “एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीज” संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्योजकता म्हणजे नव कल्पना, नेतृत्व गुण, जोखीम स्विकारण्याची तयारी आणि समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्याची वृत्ती विकसित करणारी एक चळवळ आहे, असे गणित अंक प्रा. ली.कंपनीचे चे संस्थापक अंकुश झनवर यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओइआर), रावेत येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन, अँड इंटरप्राईज (सीआयआयइ) यांच्या सहकार्याने “एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीज कन्वर्सेशन विथ यंग आंत्रप्रेन्यूअर्स” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेक्सवीटेक इंडिया प्रा.ली.चे संचालक सुजीत लोमटे, पीसीसीओइआरचे संचालक प्राचार्य डॉ.…
उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी महापौरांचे निर्देश, सर्वंकष उपाययोजना करण्याचे आयुक्तांना दिले आदेश
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्हाळा हंगाम समीप येत असून उपलब्ध जलसाठा, भूजल पातळीतील घट व वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता शहरात संभाव्य पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापौर रवि लांडगे यांनी महापालिका आयुक्तांना तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना नियमित, समतोल व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा सुनिश्चित करणे ही महापालिकेची वैधानिक जबाबदारी असून त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. महापौरांनी प्रशासनाला उन्हाळा पूर्व कृती आराखडा (Summer Action Plan) तयार करून प्रत्येक विभागाला स्पष्ट जबाबदाऱ्या सोपविण्याच्या सूचना केल्या. तसेच उपलब्ध धरण साठा, जलशुद्धीकरण केंद्रे व वितरण यंत्रणेचे सखोल परीक्षण करून पाणीपुरवठ्याचे…
पिंपरी, दि. २८ मार्च २०२६) पिंपरी कॅम्प मधील रहिवाशी ॲड. विजयकुमार रामचंदानी यांना राजस्थान, झुंझुनू येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबरेवाला विद्यापीठाने पीएचडी ही पदवी प्रदान केली आहे. त्यांनी अर्थशास्त्र या विषयात “अ स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स ग्रोथ ट्रेंड्स अँड डेव्हलपमेंट ऑफ द रियल इस्टेट सेक्टर ड्युरिंग २०१३ ते २०२३ विथ रेफरन्स टू पुणे सिटी” या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यास मान्यता देण्यात आली आणि २३ मार्च २०२६ रोजी ॲड. विजयकुमार रामचंदानी यांना पीएचडी प्रदान करण्यात आली.
पीसीयू मध्ये आयइइइचा शपथविधी संपन्न पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तंत्रज्ञान हे जागतिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. आज जागतिक तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या टप्प्यावर आहे. एआय, जेनरेटिव एआय आणि एजेंटिक एआय हे एआय चे टप्पे आहेत. एआय हे स्पर्धक नसून सहकार्य करणारे साधन आहे. मात्र एआयचा वापर करताना नैतिकतेला महत्व द्या असे मार्गदर्शन ग्लोबल सीआयओ अँड टेक्नॉलॉजी व्हिजनरीचे आनंद कुमार सिन्हा यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठच्या (पीसीयू) स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तर्फे आयइइइचा (आय ट्रिपल इ – IEEE) शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयइइइ एसीएम टीम…
पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सोपा, कमी खर्चिक आणि परिणामकारक असा “फ्लश सेव्ह वॉटर अभियान” हा उपक्रम उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आला असून, याची सुरुवात पिंपरी-चिंचवड येथील पारस रिवेरा सोसायटीत करण्यात आली आहे. पाणी बचतीबाबत पुढाकार घेऊन सर्व सामान्य नागरिकांमध्ये पाणी वापराबाबत जाणीव जागृती निर्माण करणे हा त्यामागे मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत घरातील टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये एक लिटर पाण्याने भरलेली प्लास्टिकची बाटली ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक फ्लशवेळी साधारण एक लिटर पाणी कमी वापरले जाते आणि मोठ्या प्रमाणावर पाणी बचत साध्य होते. पारस रिवेरा सोसायटीतील ४० फ्लॅट्समध्ये हा उपक्रम…
निरोगी जीवनासाठी नैसर्गिक बॉडी बिल्डिंग महत्त्वाची – महापौर लांडगे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शरीरसौष्ठव घडवताना स्टिरॉइड्ससारख्या औषधांचे सेवन करून कृत्रिम पद्धतीने शरीर बनवण्याच्या ऐवजी तरुणांनी नैसर्गिक बॉडी बिल्डिंगकडे लक्ष देत आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पिंपरी चिंचवड अमेच्यूर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने ‘महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६’ चे आयोजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.…
अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात (दि. १ एप्रिल २०२५ ते २९ मार्च २०२६) मालमत्ता कर वसुलीत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ९०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अगदी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असून थकबाकीदारांना लवकरात लवकर मालमत्ता कर भरुन महापालिकेच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. मालमत्ता कर विभागाचे नियोजनबद्ध व लक्ष्यवेधी कामकाज, तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून उपलब्ध करून दिलेल्या सुलभ सेवांमुळे मालमत्ता कर वसुली ९०० कोटीपेक्षा जास्त…
सभापती राणीमाई पठारे यांनी घेतला ‘दिव्यांग भवन’च्या कामकाजाचा आढावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिव्यांग नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असून, त्यांचे जीवन सुलभ, सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणीमाई अशोक पठारे यांनी केले.महानगरपालिका संचलित ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’ ला समितीच्या वतीने सदिच्छा भेट (दि.२७) देण्यात आली. यावेळी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या वेळी माजी नगरसेविका श्रद्धाताई रवीभाऊ लांडगे, महिला व बालकल्याण समितीच्या सर्व सदस्या, दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, पूजा भापकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या भेटीदरम्यान सभापती राणीमाई पठारे आणि…
पीसीयूमध्ये राष्ट्रीय आयडियाथॉन ३.० संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपण जुन्या विचारांकडे परत जाऊ शकत नाही, नवकल्पना हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. जिथे भूतकाळ अडथळा नसून त्यापासून शिकवण घेऊन भविष्य घडवण्याची ताकद या नवकल्पनांमध्ये आहे असा विश्वास टाटा टेक्नॉलॉजीसचे प्रकल्प संचालक बालाजी मुंढे यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे राष्ट्रीय स्तरावरील आयडियाथॉन ३.० आयोजित करण्यात आली होती. यावेळी टाटा मोटर्स जनरल मॅनेजर डॉ. रंगा श्रीनिवास गुंटी, पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे तसेच डॉ. अनिल महेश्वरी, डॉ.…
पिंपरी चिंचवड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुरुष आणि महिलांच्या पोषण गरजा वेगळ्या असतात. मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीमुळे महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे तिला पोषण आवश्यक असते. त्यामुळे लोह, कॅल्शियम, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारख्या पोषक घटकांची आवश्यकता भासते. संतुलित आहाराबरोबर नियमित व्यायाम, पुरेसे पाणी पिणे, योग्य झोप घेणे आणि मानसिक आरोग्य यांना महत्त्व आहे. तिचे कष्ट, रोजची धावपळ, इतरांची काळजी घेणे यासाठी तिचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे असे इंडियन असोसिएशन फॉर पॅरेंटरल अँड इंटरल न्यूट्रिशन (आयएपीइएन) चीफ प्रोग्राम ऑफिसर डॉ. मानसी पाटील यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी)…
