- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
सुर्वे यांनी आपल्या कवितेने मराठीला शुद्ध आणि समृद्ध केले! – डाॅ. श्रीपाल सबनीस पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कविवर्य नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेने मराठीला बळ प्रदान करून तिला शुद्ध आणि समृद्ध केले!’ असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे (गुरुवार, दिनांक १८ जून २०२६) व्यक्त केले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. याप्रसंगी पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अतिशय जुने नावाजलेले आणि लोकप्रिय असलेले संघवी केसरी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, बारावीच्या निकालानंतर अपेक्षित वेळेत ही प्रक्रिया सुरू न केल्याने विद्यार्थी वर्गात पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. याबाबत आज काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने पुणे विद्यापीठातील प्रशासन विभागात, प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची भेट घेत संगवी केसरी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी करत याबाबतचे निवेदन दिले. याबाबत माहिती देताना डॉ काळकर म्हणाले, याबाबत विविध जणांकडून मागणी होत आहे, महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, लवकरच प्रवेश प्रक्रिया पूर्वरत होईल. याबाबत माहिती देताना काँग्रेसच्या शहराध्यक्ष नरेंद्र…
कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दुकानातील आरक्षित भूखंड भाडेतत्त्वावर देत आहोत असा फलक मनपा भवनावर लावावा, तसेच ज्या संस्थेला व ज्या मोठ्या कारभाऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी त्वरित लाभ घ्यावा, असेही आवाहन आयुक्त यांनी करावे अशी उपरोधित टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख चेतन पवार यांनी केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि शिक्षण विभागात असणारा भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वेळोवेळी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या या प्रशासनाला जागे करण्यासाठी गुरुवारी जागर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना…
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. श्री राधा-कृष्णांप्रती असलेले दिव्य प्रेम, भक्तीचा वास असलेल्या प्रेम मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरिता प्रेमभावनेत तल्लीन करणारा आध्यात्मिक प्रवास यानिमित्ताने घडविण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste Generators) घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नियमांची व्यवहार्यता न तपासता थेट दंडात्मक कारवाई केल्यास नागरिकांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण होऊ शकते, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले आहे. महापालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत गृहनिर्माण सोसायट्या व व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत जनभावना प्रशासनासमोर मांडल्या. आमदार जगताप…
कामांच्या प्रगतीचा आढावा; नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मुंबई-पुणे महामार्गावरील सुरू असलेल्या विविध विकासकामांची उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. तसेच कामांदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पीसीएमसी मेट्रो स्टेशन ते निगडी या मार्गावरील विविध विकासकामांच्या अनुषंगाने गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी आयोजित पाहणी दौऱ्यात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली. विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याबरोबरच नागरिकांना होणारा त्रास कमीत कमी ठेवण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कामांमुळे निर्माण होणाऱ्या…
सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे १२ दिवस शिल्लक पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून नागरिकांना देण्यात आलेल्या विविध कर सवलतींचा अधिकाधिक लाभ घेता यावा यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार व रविवारी (२० व २१ जून तसेच २७ व २८ जून) महापालिकेच्या सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांमधील कॅश काऊंटर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १८ जून पर्यंत ३८१ कोटी ६० लाख रुपयांचा कर भरणा झाला आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी आर्थिक वर्षाच्या प्रारंभी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य कन्सल्टंटच्या कामकाजावर नगरसेवक व शहर सुधारणा समिती सदस्य विनोद नढे यांनी गंभीर आक्षेप घेत प्रशासनावर निशाणा साधला आहे. शहरातील विविध विकासकामांमध्ये सल्लागार संस्थेच्या भूमिकेची, कामांच्या गुणवत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. विनोद नढे यांनी दिलेल्या निवेदनात आरोप केला आहे की, महापालिकेच्या विविध विभागांमध्ये स्थापत्य कन्सल्टंटच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. कामांची पाहणी, तांत्रिक तपासणी, अंदाजपत्रक तयार करणे तसेच कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असताना अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये कोणतीही अनियमितता सहन…
शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेषनागाच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रुप पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली. शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात स्वराभिषेकाचे देखील आयोजन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारुन ही सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात…
– आमदार शंकर जगताप यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी – वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा वृद्धिंगत होणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी या पवित्र भूमीला ‘संतभूमी’ म्हणून घोषित करावे, अशी आग्रही मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी आळंदी येथे, तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वास्तव्य आणि वैकुंठगमन देहू येथे झाले आहे. या दोन्ही ठिकाणांमधील १६…
