- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केशवनगर, चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडांगण परिसरात नागरिक व खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या सुलभ शौचालयांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. व्यायामासाठी तसेच सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या महिलांना आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सदर शौचालयांचे काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण झाले असले तरी सध्या तेथील कमोड खराब, बॉक्स तुटलेले, वापरण्यात येणाऱ्या बादल्या जर्जर स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर गैरसोयीबाबत नागरिकांनी महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मधुकर बच्चे यांनी स्वतः जाऊन पाहणी केली असता अनेक त्रुटी उघड झाल्या. वापरण्यात आलेले साहित्य दर्जाहीन असल्याचे स्पष्टपणे दिसून आले असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने क्षेत्रीय कार्यालयांसाठी आरोग्य सोयीसुविधांच्या अनुषंगाने व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये ड क्षेत्रीय कार्यालयाने प्रथम, फ क्षेत्रीय कार्यालयाने द्वितीय, अ क्षेत्रीय कार्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला आहे. या तिन्ही कार्यालयांचा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, नगर सचिव मुकेश कोळप, उप आयुक्त सचिन पवार तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत महापालिका पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झेमिनेशन इन मेडिकल सायन्सचे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिक्षण सुरू करणे, अ,क,ड,ग,क,फ,ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विविद उद्यानांची देखभाल दुरूस्तीची कामे करणे, सेवानिवृत्त/मयत कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे निकाली काढण्यासाठी लेखा विभागामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी मानधनावर नियुक्त करणे, महापालिका हद्दीतील भुमिगत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यंदा सामाजिक क्रांतीचे अग्रदूत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन आले आहे. चिंचवड येथील छत्रपती संभाजी नगर येथील साई मंदिर उद्यान येथे २५ व २६ जून रोजी प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आज (बुधवार ) सायं. ७.०० वाजता साई मंदिर उद्यान, छत्रपती संभाजी नगर येथे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी या आपल्या पुण्याचे, कलेचे वैभव आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यांची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू, असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांनी आज दिला. केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर च्या वर्ध्यापानदिना निमित्त ‘ बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी मोहोळ बोलत होते. या प्रसंगी मा.आमदार उल्हासदादा पवार, अ.भा मराठी नाट्य परिषदचे अध्यक्ष प्रशांत दामले, डॉ. संजय चोरडिया,…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाजीनगर येथील सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात सिद्धिविनायक मंदिर येथे योगासन ची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. योगशिक्षक अरविंद वाडकर यांनी योगासन व प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून दाखवले आणि योगासनांचे महत्व सांगितले. पतंजली चा अष्टांग योग जीवनाला दिशा देतो असे ते म्हणाले. सायंकाळच्या सत्रात जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांचे *”जगणे सुंदर आहे”* या विषयावर व्याख्यान झाले. राजेंद्र घावटे म्हणाले की, “मनाला मिळते ते समाधान, शरीराला मिळते ते सुख, आणि आत्म्याला मिळते तो आनंद. भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंद महत्त्वाचा आहे. आचार, विचार, आहार, विहार यांच्या द्वारे आदर्श आचरणाने…
तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळेगाव दाभाडे शहराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांची एकमताने निवड करण्यात आली. आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते धोत्रे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पदनियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, सुरेशभाऊ चौधरी, माजी नगरसेवक दर्शन खांडगे, दिलीप खळदे, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश धोत्रे १९८५ पासून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत सलग सक्रिय असून, त्यांनी १९९७ आणि २०११ अशा कार्यकाळात नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात तळेगाव दाभाडेमध्ये अनेक विकासकामे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जिजाऊ माँसाहेबांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून पुणे शहराला वसवले. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची आणि सामाजिक न्यायाची शिकवण दिली.उध्वस्त झालेल्या पुण्याचं पुनर्वसन करण्याचा आणि रयतेत नविन आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी स्त्री-शक्तीचे प्रतीक म्हणून आणि एक दूरदृष्टी असलेल्या नेत्या म्हणून समाजाला दिशा दाखवली. त्यांचे नाव पुणे रेल्वे स्टेशनला देण्यात यावे अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज जिजाऊंचा नाव देणे बाबत कामगारांनी आग्रही मागणी केली यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश सचिव तुषार घाटूळे उपाध्यक्ष राजेश माने, मनपा सदस्य सलीम डांगे,रंजना तुरुकमारे,उषा लांडगे,लता धुळे,नयन तोडकर,भाग्यश्री माने,यास्मिन तांबोळी,सुनिता भोले,रेशमा काटे उपस्थित होते. नखाते म्हणाले…
चिखली, (महाराष्ट्र) – टाळगाव चिखली येथील प्रसिद्ध व जुने श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर, हे गावाचे ग्रामदैवत असून श्रद्धेचे केंद्र मानले जाते. काही दिवसांपूर्वी या मंदिरात चोरीची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, चिखली पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम पथकाने जलद गतीने तपास करत ही चोरी उकलण्यात यश मिळवले असून चोरी गेलेले दागिने व इतर मौल्यवान वस्तू पुन्हा मंदिराच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ही परतफेड पोलीस निरीक्षक राजेश मासाळ यांच्या हस्ते मंदिर समितीकडे करण्यात आली. या महत्त्वपूर्ण प्रसंगी मंदिर समितीचे सदस्य किशोर बालघरे, बाळासाहेब मोरे, सिताराम मोरे, प्रकाश चौधरी तसेच स्थानिक नगरसेवक मा. दिनेश यादव उपस्थित होते.…
कुदळवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या एकात्मतेसाठी प्राणार्पण करणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनेश लालचंद यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम राष्ट्रभक्तीने भारलेला आणि प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर, राष्ट्रहितासाठी केलेल्या संघर्षावर आणि बलिदानावर प्रकाश टाकण्यात आला. या वेळी प्रमुख उपस्थितीत दिनेश लालचंद यादव,महेश मोरे,महेश डोंगरे ,सोहन गुप्ता यांच्यासह परिसरातील नागरिक, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात बोलताना दिनेश यादव म्हणाले, “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं योगदान भारतीय लोकशाही, एकात्मता आणि राष्ट्रवादासाठी अनमोल आहे. त्यांचे ‘एक देश –…
