- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
इंग्लिश एज सेकंड लॅग्वेज (ईएसएल) उपक्रम ठरतोय उपयुक्त पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने २०२२ साली इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गापासून सुरू केलेल्या इंग्लिश एज सेकंड लॅग्वेज (ईएसएल) उपक्रमामुळे शाळांमध्ये एक सकारात्मक बदल घडतो आहे. या उपक्रमामुळे इंग्रजी हा विषय शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास, अभिव्यक्ती आणि आनंदाचे माध्यम ठरत आहे. आजपर्यंत २७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला हा उपक्रम सरकारी शिक्षणातील शिक्षक संचालित बदलांचे प्रभावी उदाहरण ठरत आहे. या उपक्रमाअंतर्गत सुमारे २०० प्राथमिक शिक्षकांना मासिक कार्यशाळांमधून प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये फॉनिक्स, परस्परसंवाद, आणि प्रिंट-समृद्ध वर्गखोल्यांच्या निर्मितीवर भर देण्यात आला. हा उपक्रम शिक्षकांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरत आहे. याबाबत…
पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तरल स्वरांचा लयदार ताना… मनाला रुंजी टाकणारे शास्त्रीय राग… रसिकांची भरभरून दाद… अशा सुरमयी वातावरणात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांनी श्रोत्यांना स्वरमग्नतेच्या सागरात अगदी आकंठ बुडवले. आसमंताला साद घालणाऱ्या शब्दसुरांचा संगीतमय जादुई स्वरांच्या वर्षावाने रसिक मंत्रमुग्ध झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांसह नागरिक हैराण असून हिंजवडी, मान, म्हळुंगे, मारुंजी येथील रस्त्याच्या भूसंपादनाअभावी शेतकऱ्यांसह नागरिकांना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणा एमआयडीसीने तातडीने पावले उचलत याबाबात आपला प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याचे निर्देश, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. याबाबत आमदार शंकर मांडेकर यांच्यासह संबंधित शेतकरी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. म्हसे यांनी गुरुवारी आकुर्डी कार्यालयात आढावा बैठक घेतली. मान रोडसह इतर काही महत्त्वाच्या रस्त्यासंदर्भात एमआयडीसीकडून भूसंपादनाची प्रक्रिया रखडल्याने वाहनधारकांसह नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित मार्गादरम्यान किती शेतकऱ्यांच्या जमिनीचे…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. वाचनालयाचे सचिव राजाराम वंजारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक भरत गायकवाड हे होते. जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर माहिती सांगितली. प्रास्ताविक मनीषा पाटील यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे महादेव पवार आणि वाचक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, सहायक ग्रंथपाल प्राजक्ता पवार, रवींद्र अडसूळ, गणेश सहाणे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गणेश सहाणे यांनी केले.
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हडपसर पोलिस स्टेशन व चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी शिबिर आयोजित करण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी साप्ताहच्या प्रसंगी अमली पदार्थाचे दुष्परिणाम , व जनजागृती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रसंगी पो नि अश्विनी जगताप,सपोनि हसीना शिकलगार यांनी अंमली पदार्थांचे सामाजिक, मानसिक आणि शारीरिक परिणाम याविषयी मुलींना मार्गदर्शन केले. तसेच अमली पदार्थ व्यसनमुक्त समाज घडवण्याची प्रतिज्ञा करत संकल्प केला. सदर कार्यशाळेकरिता PI अश्विनी जगताप API हसीना शिकलगार, HC समीर पांडुळे LPC धनश्री बांडे PC महादेव कुंभार, तसेच शाळेचे मुख्याध्यापक उर्मिला पाटील, उपमुख्याध्यापक आनंद करे पर्यवेक्षक पौर्णिमा सावंत, तृप्ती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत (पीएम-जेएवाय) पुणे जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालये हे आयुष्मान योजनेचे कार्ड काढलेल्या रुग्णांना लाभ देत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे केली आहे. त्यावर या रुग्णालयांची तत्काळ माहिती घेण्याचे आदेश नड्डा यांनी सचिवाला दिले आहेत. त्यामुळे ज्येष्ठांना मदत न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होईल, असे बारणे यांनी सांगितले. याबाबत खासदार बारणे यांनी दिल्लीत मंत्री नड्डा यांची भेट घेतली. पुणे जिल्ह्यातील आयुष्मान भारत योजनेत असलेल्या १४८ रुग्णालयांची माहिती दिली. या योजनेत आणखी रुग्णालयांचा समावेश करण्याची मागणी केली. खासदार बारणे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती राजर्षी शाहू महाराज, हे एक दूरदर्शी समाजसुधारक होते. त्यांनी शिक्षण, आरक्षण, विधवा पुनर्विवाह, अंतर्जाती विवाह आणि उन्नत महिला-स्वास्थ्य यांसारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. १९०२ मध्ये त्यांनी गरिब, मराठा, दलित, कुणबी इत्यादींना सरकारी नोकऱ्या व शिक्षणात ५०% आरक्षण दिले—भारताच्या सामाजिक न्यायातील पहिल्या पायऱ्या पैकी एक. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार मराठवाडा जनविकास संघ ( महारास्ट्र राज्य )पिंपरी चिंचवड शहर पुणे श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त आहेत. यावेळी नागरिक उपस्थित होते.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळा अध्याय’ असलेल्या आणीबाणीत लोकशाही मूल्यांसाठी असीम त्याग आणि संघर्ष करणाऱ्या मीसाबंदी व लढवय्यांचा ‘सन्मान सोहळा’ पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड येथील गोखले हॉल येथे मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात, आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, भाजपाचे प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी यांनी आणीबाणीच्या काळावर अत्यंत कठोर शब्दांत भाष्य केले. “आणीबाणी म्हणजे इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा केलेला खून!” या शब्दांत त्यांनी तत्कालीन परिस्थितीवर घणाघाती टीका केली. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात आणीबाणीच्या काळातील…
हिंजवडीसह सात गावे महापालिकेत घेण्याची हीच योग्य वेळ खासदार श्रीरंग बारणे यांची राज्य शासनाकडे मागणी
पिंपरी – महापालिकेच्या हद्दी लगत आणि विकासापासून वंचित असलेल्या हिंजवडी, माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे महापालिका घेण्याची हीच योग्य वेळ आहे. या गावांमध्ये नियोजनबद्ध विकास होत नाही, बकालपणा वाढत आहे. अनधिकृत बांधकामे वाढत असून नैसर्गिक नाले बुजविले जात आहेत. त्यामुळे हिंजवडीतील रस्ते जलमय होत आहेत. त्यासाठी निवडणुकीपूर्वी ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत घ्यावीत अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीलगत हिंजवडी, मारूंजी, नेरे, जांभे, सागंवडे, गहुंजे ही गावे आहेत.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस शाळेचे शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार सर तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता दहावीच्या व नववीच्या विशाखा खाडे , स्वराली शिंदे व मंथन जाधव या विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांच्या विषयी माहिती दिली. तसेच शाहू महाराजांच्या जीवनावरती पोवाडा गायला, उपस्थितना मार्गदर्शन करताना शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत म्हणाले; माणसांवर माणूस म्हणून प्रेम करणारे शाहू महाराज हे मोठ्या मनाचे राजे होते,…
