Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या जागतिक ओळखीबद्दल केलेले विधान वृत्तपत्र आणि  “न्यूज चॅनल”वरील बातम्यांमधून माझ्या पाहण्यात आले. हे विधान अत्यंत निंदनीय आणि बेजबाबदार आहे. ज्या शहराने शून्यातून विश्व निर्माण करून जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले, त्या शहराबद्दल अशी मुक्ताफळे उधळणे हा येथील नागरिक आणि भूमिपुत्रांच्या भावनांचा अपमान आहे. “पिंपरी-चिंचवड ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली अन् चापेकर बंधूंसारख्या क्रांतीकारकांच्या बलिदानाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. अशा पवित्र भूमीबद्दल ‘जगात कोणी ओळखत नाही’ असे विधान करणे, म्हणजे या मातीचा आणि संस्कृतीचा अवमान आहे.” “आज…

Read More

क्रेसेंडो २०२६ ला  विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विद्यार्थ्यांनी करिअरच्या वाटचालीत खरेपणाचा  ध्यास धरावा असे आवाहन  प्रसिद्ध अभिनेते,लेखक,दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी   व्यक्त केले.  यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुनाजच्या इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट अँड रिसर्च अर्थात आयबीएमआर यांच्यावतीने आयोजित क्रेसेंडो २०२६  सांस्कृतिक  महोत्सवात  ते विद्यार्थ्यांशी संवाद  साधताना बोलत होते.करिअरच्या प्रवासात केवळ सध्या भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे  जात असतानाच भविष्यातील संभाव्य घटनांचा वेध घेऊन  त्यादृष्टीने आपले व्यक्तिमत्व सज्ज ठेवण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे असेही  प्रवीण  तरडे यांनी  सांगितले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस आणि इन्स्टिट्यूट ऑफ सांस्कृतिक  महोत्सवाला  विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद  लाभला.या कार्यक्रमात …

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपळे गुरव परिसरातील अत्यंत वर्दळीच्या सृष्टी चौकात (Srushti Chowk) आता वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. ‘मराठवाडा जनविकास संघा’चे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, प्रशासनाने या मागणीची दखल घेतली आहे. नेमकी समस्या काय होती? गेल्या अनेक महिन्यांपासून सृष्टी चौकात वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला होता. चौकात सिग्नल नसल्यामुळे वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत होते, ज्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. याचा फटका केवळ नोकरदार वर्गालाच नाही, तर शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही बसत होता. अपघाताची शक्यता वाढल्याने नागरिक चिंतेत होते. अरुण पवार यांचा पुढाकार नागरिकांची ही समस्या ओळखून…

Read More

२९ दिवसांत १५७ कोटींची विक्रमी वसुली, ३१ मार्च २०२६ पर्यंत योजनेचा कालावधी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेचा २९ मार्च २०२६ पर्यंत ५५ हजार ७११ थकबाकीदारांनी लाभ घेतला आहे. ही योजना लागू झाल्यापासून म्हणजेच १ मार्च २०२६ पासून २९ मार्च २०२६ या २९ दिवसांमध्ये तब्बल १५७ कोटी २१ लाख ५३ हजार रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. अभय योजनेचा कालावधी हा ३१ मार्च २०२६ रोजी संपणार असून, ज्या थकबाकीदारांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही त्यांनी तो ३१ मार्च २०२६ पूर्वी भरून अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दापोडी येथील आनंदवन झिरो वेस्ट प्रकल्पात आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन उत्साहपूर्ण व नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, तसेच सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या पथनाट्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शून्य कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे चार प्रकारे विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, ‘आर.आर.आर. सेंटर’ची संकल्पना तसेच घरगुती कंपोस्टिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर नाट्यमय व प्रभावी…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड परिसरातील कुदळवाडी येथे कुदळवाडी स्पोर्टस् क्लब व शिवप्रसाद बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य डे-नाईट ऑल इंडिया व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ उत्साहात पार पडली. ही स्पर्धा दिनांक २७ मार्च ते २९ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये डॉ. संदीप भाजीभाकरे (DCP स्पेशल ब्रांच), शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, सचिन भाऊ पानमंद, नगरसेवक निलेश नेवाळे, राहुल जाधव, विकास साने, यश दत्ता साने, डॉ. कैलास कदम, विठ्ठल साळुंखे, वसंत बोराटे, विशाल आहेर, जितेंद्र यादव, लतिफभाई खान, देवानंद गुप्ता, नियाजभाई सिद्दिकी, युवराज पवार, संगीता ताई ताम्हाणे, शफीउल्ला काझी यांसह…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा (पिंपरी चिंचवड) आयोजित ‘ कलाकार कट्टा ‘ पुष्प ५ , राजमाता जिजाऊ उद्यान, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक २८ रोजी आयोजीत करण्यात आला होता. कलाकार कट्टयात लोककला या विभागात शाहीर वनिता मोहिते यांच्या संजीवनी महिला शाहिरी पथक यांनी पोवाडा, पारंपरिक वाद्यात ऋषिकेश गायकवाड, जय कसबे, योगेश उकिरडे आणि निखिल झोंबाडे या कलाकारांनी ढोल ताशे यांचे सादरीकरण केले. नाट्य विभागात वरि्हा काळे आणि रजत देशमुख या बालकलाकारांनी नाट्यछटेचे सादरीकरण केले. राजू जाधव आणि सविता इंगळे यांनी कविता, जगदीश खोडके, प्रदीप मांडरे यांनी कराओके, ह भ प माई गटणे आणि सहकारी…

Read More

– महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील मालमत्ता हस्तांतरण (Property Name Transfer) शुल्कात करण्यात आलेल्या मोठ्या वाढीविरोधात भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न सिताराम काटे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. यासंदर्भात त्यांनी डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना सविस्तर निवेदन सादर करून सध्याचे ०.५% शुल्क तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. तसेच, महापौर रवि लांडगे यांनाही निवेदन दिले आहे. शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महापालिकेकडून मालमत्तेच्या एकूण बाजारमूल्यावर ०.५% इतके शुल्क आकारले जात असून, ही आकारणी अत्यंत जास्त व अन्यायकारक आहे. घर…

Read More

आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांना मंजुरी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज शहरातील विविध विकासकामे व विभागनिहाय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते. यावेळी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील विविध विकासकामांशी संबंधित…

Read More

कॉपीराईट धाडी विरोधात व्यापाऱ्यांचे बंदचे हत्यार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी कॅम्प मधील व्यापाऱ्यांना कॉपीराईट च्या नावाखाली धाड टाकण्यासाठी आलेले अधिकारी विनाकारण त्रास देतात. कोणत्याही कायद्याचे पालन न करता व्यापारी वर्गाकडून पैसे उकळण्याचा त्यांचा उद्देश असतो, असा प्रकार यापूर्वी तीन वेळा पिंपरी कॅम्प मध्ये घडलेला आहे. त्याची पुनरावृत्ती सोमवारी दुपारी होत होती, परंतु व्यापाऱ्यांच्या एकजुटीमुळे अधिकाऱ्यांना परत फिरावे लागले, व्यापाऱ्यांनी एकजुट दाखवावी व अशा बेकायदेशीर धाडी टाकणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध पुढे येऊन प्रतिकार करावा असे आवाहन पिंपरी मर्चंट फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी केले. सोमवारी (दि. ३०) दुपारी पिंपरी कॅम्प येथील साई चौक परिसरात एका दुकानात कॉपीराईट तपासणीच्या नावाखाली…

Read More