चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड परिसरातील कुदळवाडी येथे कुदळवाडी स्पोर्टस् क्लब व शिवप्रसाद बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य डे-नाईट ऑल इंडिया व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ उत्साहात पार पडली. ही स्पर्धा दिनांक २७ मार्च ते २९ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये डॉ. संदीप भाजीभाकरे (DCP स्पेशल ब्रांच), शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, सचिन भाऊ पानमंद, नगरसेवक निलेश नेवाळे, राहुल जाधव, विकास साने, यश दत्ता साने, डॉ. कैलास कदम, विठ्ठल साळुंखे, वसंत बोराटे, विशाल आहेर, जितेंद्र यादव, लतिफभाई खान, देवानंद गुप्ता, नियाजभाई सिद्दिकी, युवराज पवार, संगीता ताई ताम्हाणे, शफीउल्ला काझी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील नामांकित व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. एकूण आठ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. खान स्पोर्ट्स क्लब, रेहमानी स्पोर्ट्स क्लब, आझमी स्पोर्ट्स क्लब, शाह स्पोर्ट्स क्लब, गुप्ता स्पोर्ट्स क्लब, ABK फाइटर, चौधरी स्पोर्ट्स क्लब आणि स्टार स्पोर्ट्स क्लब या संघांचा समावेश होता.
अंतिम सामना आझमी स्पोर्ट्स क्लब व ABK फाइटर यांच्यात रंगला. या सामन्यात आझमी स्पोर्ट्स क्लबने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ३-० अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परवेज सिध्दीकी, प्रविण मौर्या, खैरु चौधरी, मुज्जफ्फर सिध्दीकी, अनिल यादव, संभाजी यादव, साहेबअली रहमानी, साजिद सिद्दिकी, गुलजार सिद्दिकी, इसरार व इजहार रेहमानी, अशफाक सिध्दीकी, मनोज गुप्ता, जमीर व एजाज चौधरी, वहीद खान आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाकिबभाई खान व दत्ताभाऊ यादव यांनी केले.

