Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना मोफत बसपास योजना राबविणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिका व थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रंगानुभूती: पुर्वरंग ते उत्तररंग प्रयोगकला महोत्सव आयोजित करणे आदी विषयांसहविविध विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. इ क्षेत्रीय कार्यालयातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र चाकण, यांच्या वतीने आज  रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे राज्याचे कल्याण आयुक्त  रविराज इळवे मनोज पाटील प्र.सहाय्यक कल्याण आयुक्त,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर येथे  वृक्षारोपण करण्यात आले.सदर कार्यक्रमा करीता प्रमुख पाहुणे वृक्षमित्र, आण्णा जोगदंड गुणवंत कामगार  शंकर नाणेकर गुणवंत कामगार दत्तात्रय दगडे गुणवंत कामगार यांच्या उपस्थित वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कामगार वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये  वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला सदर प्रसंगी विविध जातीची दुर्मिळ औषधी तसेच ग्रामपंचायतीला उत्पन्न देणारी उपयुक्त अश्या 50 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी नागेश दळवी, नितीन पाटील, तान्हाजी दरेकर, पाटिलबुवा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – 
पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय आज लिहिला गेला आहे. भारतीय जनता पक्षाचे अभ्यासू, तरुण आणि लोकसंग्राही आमदार अमित गोरखे विधान परिषदेत प्रथमच तालिकेवर सभापती म्हणून बसले. अत्यंत साधं व्यक्तिमत्त्व, पण ठाम विचार आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असलेले गोरखे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून राज्यराजकारणात ओळखले जातात. आज विधान परिषदेत तालिकेवर पिंपरी चिंचवड शहरातून प्रथमच बसण्याचा मान मिळाल्यावर बोलताना आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, “भारतीय जनता पक्ष हा नेहमीच तरुण, अभ्यासू, शिक्षित नेतृत्वाला संधी देतो. पिंपरी चिंचवडसारख्या उद्योगनगरीतील…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी दै. ‘केसरी’चे नंदकुमार सातुर्डेकर यांची तर सरचिटणीस पदी ‘पीसीबी टुडे’चे अविनाश चिलेकर यांची निवड झाली आहे. मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पिंपरीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. संघाच्या उपाध्यक्षपदी मिलिंद कांबळे (दै.पुढारी) खजिनदारपदी विवेक इनामदार (माय पुणे सिटी न्यूज )यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये गणेश यादव (दै.लोकसत्ता ), पंकज खोले (दै.पुढारी), मिलिंद वैद्य यांचा समावेश आहे.

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील नागरी समस्यांसह वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.१) पाहणी केली. यात नैसर्गिक ओढे – नाल्यांतील पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार त्यांनी अपेक्षित दुरुस्ती केली, की नाही याची पाहणी यादरम्यान करण्यात आली. हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात १३ ठिकाणी ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह परस्पर बदल / अडवल्याचे पुढे आले होते. त्यामुळे संबंधितांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एमआयडीसीतर्फे नोटीस देत पाण्याचा प्रवाह ३० जूनपर्यंत नैसर्गिकरित्या मोकळा करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने मंगळवारी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  सनदी लेखापालांची संस्था ही देशाच्या आर्थिक विकासात फार मोठे योगदान देणारी संस्था आहे. तसेच देशाच्या औद्योगिक आर्थिक विकासात मार्गदर्शन करणारी,महत्वाची भूमिका बजावणारी संस्था आहे. असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले. निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने सीए दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आयसीएआयचे केंद्रीय माजी सदस्य डॉ शिवाजी झावरे, प्रादेशिक कौन्सिलचे माजी सदस्य डॉ अशोक पगारिया, इनरव्हील क्लब निगडी प्राईडच्या अध्यक्षा कमलजीत दुलत, आयसीएआयचे शाखाध्यक्ष सीए वैभव मोदी, उपाध्यक्षा सीए सारिका चोरडिया, सचिव सीए मनोज मालपाणी, खजिनदार सीए महावीर कोठारी, विद्यार्थी संघटना…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) जागांवर होर्डिंग व डिजिटल जाहिराती देताना नियमबाह्य पद्धतीने परवाना देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या संदर्भातील ओपो ट्रेडिंग जाहिरात परवाना घोटाळ्याचा मुद्दा आमदार शंकर जगताप (चिंचवड) यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोषींवर कठोर कारवाई व काळ्या यादीत टाकण्याचे आश्वासन दिले. टेकसिद्धी अ‍ॅडव्हर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 23 मार्च 2024 ते 22 फेब्रुवारी 2029 या कालावधीसाठी एसटीच्या जागांवर जाहिरात लावण्याचा परवाना देण्यात आला होता. यासाठी कंपनीने वार्षिक 12 कोटी 22 लाख 20 हजार रुपये (GST वगळून) भाडे भरायचे होते. तथापि,…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “ई – चलन कार्यप्रणाली” ही माल व प्रवासी वाहतूकदार व्यवसायिकांची गळचेपी करणारी यंत्रणा आहे, याकडे तसेच वाहतूकदारांच्या इतर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व वाहतूक व्यावसायिक मंगळवारी (दि. १ जुलै) मध्यरात्री १२ पासून स्व – इच्छेने बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू करणार आहेत. या आंदोलनात राज्यातील ३० पेक्षा जास्त वाहतूक व्यवसायिकांच्या संघटना स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत अशी माहिती सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स, पुणे या संस्थेचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी दिली. यावेळी असोसिएशन ट्रान्सपोर्टर्स पुना (रजिस्टर) या संस्थेचे कार्याध्यक्ष गौरव कदम, कार्याध्यक्ष अनिल शर्मा, उपाध्यक्ष सुमित धुमाळ, सचिव अनुज जैन, खजिनदार…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या मागील जागेत मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांचे यथोचित स्मारक लवकरात लवकर उभारावे, तसेच यासाठीचा आवश्यक ३५ कोटीचा रुपयांचा निधी जाहीर करून या स्मारकाचे भूमिपूजन करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मातोश्री रमाई आंबेडकर स्मारक निर्माण समितीचे अध्यक्ष प्रमोद क्षीरसागर व समन्वयक राहुल डंबाळे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसे पत्र संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना सोमवारी देण्यात आले. यावेळी महेंद्र सरवदे, राहुल सोनवणे, बुद्धभूषण अहिरे, गौतम पटेकर, प्रशांत नाटेकर, मंथन गायकवाड, सिद्धार्थ मोरे, विशाल मांजरे, पंकज भेंडे, अक्षय करंडे, सन्मुख हदीमणी,…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे येथील  एसआरए  (स्लम पुनर्वसन प्राधिकरण) कार्यालयात निगडी, संजय नगर पुनर्वसन प्रकल्पासंदर्भातील सुनावणी पार पडली. 1563 बैठी घरे सेक्टर क्र.22 कृती समितीने सादर केलेल्या हरकतीवर ही सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत  सीईओ गटणे  व एसआरएचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कृती समितीचे ॲड. संतोष शिंदे यांनी नागरिकांच्या वतीने दुबार पुनर्वसनास विरोध करत सर्व कायदेशीर पुरावे व माहितीच्या आधारे ठोस युक्तिवाद मांडला. 1989 रोजी महापालिकेच्या मार्फत झालेल्या पुनर्वसनानंतरही बिल्डर लॉबीने खोट्या 3क आदेशांद्वारे व दिशाभूल करून दुबार पुनर्वसनाचा प्रस्ताव पुढे आणल्याचा आरोप करण्यात आला. सुनावणी दरम्यान, लाभार्थी म्हणून नाव नोंदवलेले अनेक रहिवासी देखील या प्रकल्पास विरोध…

Read More