ताज्या घडामोडीपिंपरी
निगडी सेक्टर क्र. 22 मधील दुबार पुनर्वसन प्रकल्पास नागरिकांचा तीव्र विरोध – एसआरए कार्यालयात सुनावणी दरम्यान कृती समितीची ठाम भूमिका

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे येथील एसआरए (स्लम पुनर्वसन प्राधिकरण) कार्यालयात निगडी, संजय नगर पुनर्वसन प्रकल्पासंदर्भातील सुनावणी पार पडली. 1563 बैठी घरे सेक्टर क्र.22 कृती समितीने सादर केलेल्या हरकतीवर ही सुनावणी घेण्यात आली.
या सुनावणीत सीईओ गटणे व एसआरएचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कृती समितीचे ॲड. संतोष शिंदे यांनी नागरिकांच्या वतीने दुबार पुनर्वसनास विरोध करत सर्व कायदेशीर पुरावे व माहितीच्या आधारे ठोस युक्तिवाद मांडला.
1989 रोजी महापालिकेच्या मार्फत झालेल्या पुनर्वसनानंतरही बिल्डर लॉबीने खोट्या 3क आदेशांद्वारे व दिशाभूल करून दुबार पुनर्वसनाचा प्रस्ताव पुढे आणल्याचा आरोप करण्यात आला.
सुनावणी दरम्यान, लाभार्थी म्हणून नाव नोंदवलेले अनेक रहिवासी देखील या प्रकल्पास विरोध करत असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने संजयनगरमधील नागरिक उपस्थित होते. प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रशांत नाटेकर, शिवाजी साळवे, ॲड. संतोष शिंदे, सुलतान तांबोळी, बसवराज नाटेकर, प्रमोद क्षीरसागर, अक्षय करांडे, सचिन उदागे, रमेश शिंदे, सुधाकर म्हस्के, अरुण जोगदंड, सनमुख हादिमणी, रवी पाटोळे, विकास गालफाडे, जावळे, शुभम शिंदे, बुद्धभूषण अहिरे यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती.
ही सुनावणी संजयनगर रहिवाशांच्या हक्कांसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी लढणाऱ्या कृती समितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे.












